देवमाणूस

Submitted by _गार्गी_ on 18 November, 2020 - 00:25

सत्य घटनेवर आधारित आहे.
वेगवान कथा मांडणी आहे. सर्व नवोदित कलाकारांचे अभिनय उत्तम.
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर!

Group content visibility: 
Use group defaults

चंपा कोण असते ? >> भाजप प्रदेशाध्यक्ष>> Rofl Rofl Rofl Rofl Rofl

तो सांगाडावाला भाग मी गेल्या आठवड्यातच बघितला होता मग जुना कसा. वंदी स्वतःच्या घरी जातच नाही का, नेहमी वाड्यातच असते.

देवमाणूसचा आणि रा.खे.चा. (सिझन १) चा दिग्दर्शक सेम आहे. ... राजू सावंत. त्यामुळे जसे राखेचा सिझन १ गुंडाळला होता तसेच देवमाणूस करतील असे वाटत होते व तसेच झाले. कुठल्याही गोष्टीचा शेवट व्यवस्थित करायचा नाही व नंतरही लोकांनी त्यावर चर्चा करत रहावे अशी अपेक्षा असते बहुतेक...

खरंतर देवीसिंगला व्यवस्थित अडकवले असे दाखवता आले असते पण उगाचच प्रत्येक भागात सरू आजी, टोण्या यांची तिच तिच प्रकारची भांडणे, वंदी व तिचा नवरा यांचे अतिशियोक्तीचे बोलणे, बजा व नाम्या यांचा काही तरी सिन आणि नंतर ते "एका बुक्कीतच.." हे दाखवून दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहिला. त्या सरू आजीला प्रत्येक वेळी डॉ. ला शिव्या देणे आणि त्याच त्याच म्हणी म्हणणे हेच काम होते.

अगदीच आवडून घ्यायचे झाले तर टोण्या आवडायचा आणि त्या वंदीच्या नवर्‍याचे डॉयलॉग आवडायचे.

Pages