अध्यात्मिक लावणी!

Submitted by यक्ष on 4 August, 2021 - 06:12

तु-नळिवर 'दे रे कान्हा' हे गाणे शोधता शोधता एका ठिकाणी 'अध्यात्मिक लावणी' असा सन्दर्भ आढळला.

थोडी-बहुत कल्पना आली पण आकलन नाही झाले......

ह्याचा अध्यात्मिक अर्थ कळू शकेल काय?

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देहाहुन ही मुक्त भावना

देहाहुन ही मुक्त भावना
शरणागत बापुडी !
हात जोडिता बंधन तुटले
अता जिवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी !

लावणीतून सांगितलेले अध्यात्मिक ज्ञान. इथे याबाबत विस्तृत विश्लेषण केलेले दिसत आहे. भेदीक लावणी, अध्यात्मिक लावणी वगैरे:

http://lib.unipune.ac.in:8080/jspui/bitstream/123456789/7476/10/10_chapt...

ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
कृष्णानं भुलवल्या
यमुनेवर गौळणी....

ओपनिंग ष्टेटमेंटात सांगितले आहे ना, 'अध्यात्माची कहाणी" म्हणून?
अन शेवटच्या कडव्यात

आत्म्याने जणू परमात्म्याला वगैरे म्हणून ते आणलंय ना तिथे? मास्तर भुलला की तिथंच! पब्लिक पण खुश अन मास्तर पण.

जौद्या. गटारीच्या मुहूर्तावर अन ते ही या इतक्या वाजता तुम्हाला अध्यत्म समजवून सांगणे म्हणजे जरा कठीण आहे. अहो, आधी आत्मा येतो तिथे अध्यात्म. आत्माराम थंडा झाला की झालं सगळं.

त्याच सिनेमातील दुसरी एक लावणी आहे.

मी एकलीच निजले
रात्रीच्या अंधारात
नको तिथंच पडला
अवचित माझा हात
हाताखालती
नांगा काढून
वैरिण ती बसली..

बघा आता. यात अश्लिल अर्थ आहे का काही ?

पिवर अध्यात्म!

चिअर्स!