अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
व्हिडीओ काढा
व्हिडीओ काढा
आशुचँप
आशुचँप
टाकलाय इन्स्टाग्रामवर
टाकलाय इन्स्टाग्रामवर
पण आता त्याला साधारण अंदाज आलाय
पहिलीच रिएक्षकन लाजवाब होती
हाहा ओडिन ला स्क्विकी टॉयज
हाहा ओडिन ला स्क्विकी टॉयज ची सवय नाही का? बहुतेक सगळी खेळणी तसला काहीतरी आवाज करतात ना.
माउई ला हल्ली बबलरॅप चे फार वेड लागले आहे. ते बब्ल्स फोडण्यातली मजा लक्षात आलेली आहे! तोंडाने किंवा उडी मारून टपाटप ते बबल्स पॉप करत बसतो ही पहा छोटी क्लिप.
https://www.instagram.com/p/CRKVcVPJT57/
मजा म्हणजे त्याला वाटते अॅमेझॉन वरून आम्ही बबल रॅपच मागवतो सारखे त्यामुळे काहीही पॅकेज आले की हा पहिला पुढे उड्या मारत!
(No subject)
हाहाह भरीच
हाहाह भरीच
माऊई म्हणजे कार्टून आहे फुल्ल
ओडीन ला स्विकी टॉय पहिलेच हे
मुळात आम्ही त्याला जास्त खेळणी आणली च नव्हती
एक बॉल, आणि आणि आता एक काँग टॉय एव्हढेच काय
त्याची खेळणी म्हणजे पायपुसणी, चपला, रिकाम्या प्लास्टिक च्या बाटल्या आणि नारळ
ते एक भारी सोलून देतो तो
अक्खा नारळ दिला की आवडीने पार गोटा करून देतो
माऊई च्या आवडी अगदी
माऊई च्या आवडी अगदी माझ्यासारख्या आहेत त्याला मारी बिस्कीट आवडतं का हेही तपासून बघ.
माऊई कसला क्यूट आहे!!!
माऊई कसला क्यूट आहे!!!
ओडीनचा किस्सा भारीये. खूप हसले वाचून.
अक्खा नारळ दिला की आवडीने पार गोटा करून देतो >>> हे फार आवडलं
एकेक किस्से ऐकले की हसून हसून
एकेक किस्से ऐकले की हसून हसून मुरकुंडी वळते आहे. ध्यानं आहेत ध्यानं.
ओडिन आणी माउई चे किस्से भारिच
ओडिन आणी माउई चे किस्से भारिच!
अक्खा नारळ दिला की आवडीने पार गोटा करून देतो>>> मग चान्गलय्,कामसु आहे पोरगा
मजा म्हणजे त्याला वाटते अॅमेझॉन वरून आम्ही बबल रॅपच मागवतो सारखे>>> ह.ह.पु.वा.
टाकलाय इन्स्टाग्रामवर?>>
टाकलाय इन्स्टाग्रामवर?>> लिन्क द्या इथे
अक्खा नारळ दिला की आवडीने पार
अक्खा नारळ दिला की आवडीने पार गोटा करून देतो >> बाबो मस्तपैकी पसारा होत असेल ना मग शेंड्यांचा !!
माऊई च्या आवडी अगदी माझ्यासारख्या >> हो ना, मला पण फार आवडतं बबल रॅप पॉप करत बसायला हल्ली माव्या हाती लागून देत नाही काही.
आईईग्गं काय गोंड्स किस्से
आईईग्गं काय गोंड्स किस्से आहेत ओडीन आणि मावू
साधना, आमच्याकडे एक मांजर
साधना, आमच्याकडे एक मांजर होती, घरी श्रीरामपूरला. एकदा खूप जबरदस्त अपघात झाला होता तिला आणि बहुधा त्यावेळी तिच्या गर्भाशयाला काही दुखापत झाली असावी पण त्यानंतर तिला पिल्ल झाली नाहीत. बरी झाल्यावर काही महिन्यांनी तिनं दुसर्याच एका मांजरीचं पिल्लु घरी आणलं होतं. आम्हाला आधी वाटलं उंदीर आणला की काय पण पिल्लु होतं आणि व्यवस्थित तोंडात धरून घेऊन आली होती. मग २-३ दिवसांनी समजलं की त्या पिल्लाची आई त्याच दरम्यान मेली. ते पिल्लु पण नीट रहायचं आमच्या मांजरीबाईंसोबत.
लहानपणापासून इतक्या मांजरी पाळल्या आणि इतरांच्या बघितल्या आहेत, माझ्याकडे भरपूर किस्से आहेत असे.
माऊई फारच लहान बाळासारखा इनोसन्ट चेहरा करून असतो.
गोड फोटो आहे मैत्रेयी.
गोड फोटो आहे मैत्रेयी.
आशुचँप, कॅमेरा रेडी ठेवत जा बरं.
हो ना, नेमके मोमेंट्स मिस
हो ना, नेमके मोमेंट्स मिस होतात
ओडीन चा इंस्टा अकाउंट
Odin_the_god_of_hunger
आजचे दोन व्हीडिओ टाकलेत
आजचे दोन व्हीडिओ टाकलेत
ओके , बघते नविन व्हिडियोज पण
ओके , बघते नविन व्हिडियोज पण
इथल्या सर्व भुभू आणि माउ आणि
इथल्या सर्व भुभू आणि माउ आणि इतर बाळांच्या गोष्टी वाचून कधीपासून सीलूच्या गमती जमती लिहायच्या होत्या. आज एक वेगळाच अनुभव लिहितोय सर्वाना सावध करण्यासाठी.
आमचा निष्काळजीपणा म्हणा किंवा अज्ञान सीलूच्या जीवावर बेतू शकला असता. आमच्या बैकयार्डमध्ये आधीच्या माणसानी लावलेली "sago palm”ची 4/5 झाडे आहेत. साधारण 5/6 फुट वाढतात. ह्या जीवघेण्या अनुभवामुळे कळलं की ही झाड़े प्रचंड विषारी असतात आणि वेळेत उपचार मिळाले नाहीत तर pets काय humans देखील जिव गमावु शकतात.
गेल्या शुक्रवारी संध्याकाळी सीलू बाहेर होता. मी 2 मिनिटे आत आलो तेवढ्यात त्याने त्या पामचि बी खाल्ली आणि आत आला. जेऊन झाल्यावर त्याला बाहेर नेला तेव्हा थोडे तुकडे दिसले त्यावरून संशय आला पण पुढे काय याचा अंदाज आला नाही. अक्षरशः 10 मिनिटात त्याने खाल्लेल सगळं उलटून पडलं. परत 5 मिनितात अजुन एकदा उलटी झाली. संध्याकाळ झाल्याने त्याचे नेहमीचे vet क्लिनिक बंद झालं होतं. मग pet Emergency hospital ला गेलो. तिथे पोचेपर्यंत त्याला जवळ जवळ ६/७ वेळा उलट्या झाल्या. शेवटी शेवटी फक्त पाणि येत होतं. प्रचंड थकला होता. गेल्या गेल्या सर्व सांगितल्यावर डॉक्टरांनी विचारलं “sago palm” होतं का? फोनवर पाहून हो म्हटल्यावर त्यानी कल्पना दिली की काहीही होऊ शकतं. पण वेळेत नेल्यामुळे तातडीने उपचार सुरु केले. आमच्या नशिबाने सीलू दोन दिवसात बरा होऊन घरी आला.
सगळेच इतके नशिबवान नसतात. दर वर्षी अनेक pets ह्या झाडाच्या बिया किंवा इतर भाग खाल्याने मृत्युमुखी पडतात. दुकानात हे झाड विकताना त्यावर वार्निंग बऱ्याच वेळा नसते. खुप ठिकाणी हे झाड़ लैंडस्केपिंग करता वापरतात. आपल्या घरीच नाही तर आजु बाजुलाही लक्ष ठेवा.
https://www.aspca.org/pet-care/animal-poison-control/toxic-and-non-toxic...
अरे बाप रे!!!
अरे बाप रे!!!
अरे बाप रे! डेन्जर अनुभव!
अरे बाप रे! डेन्जर अनुभव! नशीब वेळेत उपचार झाले!! आता कसा आहे सिलू?
बर्याच ठिकाणी लँडस्केपिंग मधे पाहिलेले आहे हे झाड. हे विषारी असण्याबद्दल माहित असण्याची शक्यता नव्हतीच. आता लक्षात राहील मात्र.
बापरे
बापरे
इतके विषारी आहे?माणसांना/लहान मुलांना पण?
अरे बापरे, थोडक्यात निभावल
अरे बापरे, थोडक्यात निभावल
खूप धन्यवाद या माहितीसाठी
हे झाड कुठं दिसलं तर लक्षात राहील
ओड्या ला बाहेर नेलं की मनमुरादपणे पाला खातो
कितीही ओरडल तरी ऐकत नाही
आणि जास्त खाल्ली की ओकून सगळा पाला बाहेर काढतो
व्हेट ना विचारलं तर म्हणाला की ते पोटात गडबड असेल तर करतात
पण हे फारच डेंजरस आहे
बापरे! sago palm बद्दल माहिती
बापरे! sago palm बद्दल माहिती नव्हतं. आता कसा आहे सीलू?
अमेरिकेत कुत्रा कुठून घ्यावा
अमेरिकेत कुत्रा कुठून घ्यावा या बद्दल कुणाला काही माहिती आहे का? पेट शॉप मध्ये खूपच महाग विकतात हे लोकं.
आमच्या बागेत आहेत ४-५ झाडं.
आमच्या बागेत आहेत ४-५ झाडं. पाळीव प्राणी नाहीत पण तरी भिती वाटली. काढून टाकावं का विचार करते. सांगितल्याबद्दल थँक्स समीर. आता ठीक आहे का?
अक्खा नारळ दिला की आवडीने पार
अक्खा नारळ दिला की आवडीने पार गोटा करून देतो >> कामसू आहे ओडीन
सागो पामच्या विषारीपणाबद्दल नवीनच कळलं. सीलू लवकरच बागडता खेळता होवो ..
गवत खाण्याबद्दल आम्हाला एका vet ने सांगितले की कधी तरी थोडा फार (अर्थात बिनविषारी ) गवत , पाला भू भूने खाल्ला तर हरकत नसते. स्वतःचे अंग , पंजे चाटल्यामुळे जे केस त्यांच्या पोटात जातात ते गवत खाल्ल्यामुळे बाहेर पडतात.
अरे बापरे! बिचारा सिलू काळजी
अरे बापरे! बिचारा सिलू काळजी घ्या.
माहितीकरता धन्यवाद!
आता सिलू बरा आहे. कालपासून
आता सिलू बरा आहे. कालपासून जरा नीट जेवायलाही लागालाय. पहिले २/३ दिवस अगदिच थोडं खात होता.
ओह गुड! आता अॅक्चुअल गमती
ओह गुड! आता अॅक्चुअल गमती जमती येऊ दे सिलूच्या.
अमेरिकेत कुत्रा कुठून घ्यावा >>>> हरितात्या, पेट शेल्टर्स मधे भरपूर पेट्स अव्हेलेबल असतात अॅडॉप्शन साठी ते सगळ्यात बेस्ट. तिथे फी पण नॉमिनल असते. तुमच्या जवळच्या शेल्टर्सच्या वेबसाइट्स पहा. चांगल्या ब्रीडर्स कडुन घेणे हा दुसरा ऑप्शन. कोणी रेफरन्स दिल्यास उत्तम. ते ही महाग असू शकतात मात्र. पपी मिल्स आणि इर्रिस्पॉन्सिबल ब्रीडर्स पासून मात्र दूर रहा.
Pages