अण्णु (नाट्यछटा)

Submitted by सामो on 26 July, 2021 - 02:19

आज सकाळी सकाळी उठलो तेच मोठ्या धाडधाड आवाजाने . पहील्यांदा वाटलं काल जरा जास्त चढलेली त्याचा परिपाक असावा. तेजायला परिपाकम्हणे. अण्णा मोकाशाची जड जड शब्द वापरायची घाणेरडी सवय लागलीय मला. आयुष्य गेलं गल्ल्यावर बसण्यात. खाणावळीतलं जर असले साजूकतुपकट शब्द वापरायला लागलो ना तर कामवाली पोट्टीपाट्टी हसतील मला. म्हणतील दादा निपाणीकर सठीया गया हे. या साल्यांना ढुंगणावर पोकळबांबुचे रट्टेच हवे. ऊठता लाथ बसता बुक्की. नाहीतर हाटेल विुकुन मलाही विकतील भोसडीचे.
काय साली कटकट हे सकाळी सकाळी म्हुन दार उघडलं तरचौकात हे लोक जमलेले. मयतच झालं जणू म्हणुन विचारलं तर कळलं अण्णु मोकाशा किती का ठोठवा दार उघडत नाही. च्यायला अण्णु गचकला का काय वाटुन करंट बसतो न बसतो तो शेजारच्या भिडे काकू म्हणाल्या “ अण्णांच्या मुलाला फोन लावायचा का?” यावर लाटकर काका करवादले “कश्शॅला अमेरीकेतुन तो येइपर्यंत इथे दुर्गंधी सुटेल त्याचे काय!” यावर लाटकर काकुंनी नजरेनेच त्यांना दाबले. पाहीले ना मी. काही सुटत नाही माझ्या बारीक नजरेतुन. संध्याकाळी आधी गावंड्यंचा संदीप गच्चीवर जातो तदुपरांत ( तेजायला परत जड शब्द!) मान्यांची सीमा वर जाते. माझी गणपतीहुन परत यायचा टाइम असतोय. एकदा गच्चीवर जाउन फोडुन काढणारे एकेकाला. आमच्या वेळी असं नव्हं. आपला बाप यवढा कडक असलं काही करायची टापच नव्हती आपली. नुसताहग्या दम नाही, बुकलून काढता आपला बाप. तशी पलिकडच्या गल्लीतली शरु आयटम होती, खव्याची बर्फी. आपल्याला ढीलही द्यायची. गल्ल्यावर बसलो की रस्त्यावरुन तिरपा कटाक्ष टाकत ये-जा करायची. एकदा एकटी गाठुन बोलायचा प्रयत्नही केलेला. पण ततपप पुढे शब्द फुटला नाही. अण्णु म्हणतो तेच खरं "गाढवाच्याxxx गेलेलं आपलं तारुण्य. "
अण्णु गचकला असेल का पण? अण्णु आपला लंगोटी यार. लहानपणी जेवताना आपल्याकरता घास काढुन ठेवणारा. त्याची बायको गेली तेव्हा मुलाला काही येतां आले नाही याची सल आहे त्याला. विसास्टॅंपिंग च्या भानगडीमुळे यायला जमलं नाही म्हणे. अरे भाडमधे गेलं तुमचं विसा स्टॅपिंग. एव्हढा पैसा कमावला पण मायबाप विसरलात. भाड्यात गेला पैसा. कुठं फेडाल हे पाप. अण्णु म्हणते-"एकट्यानं फक्त कुत्री- मांजरी खातात." मुकाटयाने खानावळीत येउन जेवतो. तेवढीच तुझी सोबत म्हणतो. जिगरी दोस्तहे अपला. अण्णु दार उघड अण्णु. तोडा रे दार. तोडा नक्की झोपलाय अण्णु….. ऊठ मित्रा तुझ्या आवडीचा मेनु आहे आज - मसुर आमटी, दुधीची डाळघातलेली भाजी. एवढं तरी नक्की करु शकतो मी. पण तू उठ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!