भयाण (भयकथा ) भाग 1

Submitted by shrinand kamble on 23 October, 2018 - 15:13

रात्रीचा 1चा प्रहर. आकाशात विजांचा कडकडाट होत होता. पाऊस खूपच जोराने पडत होता. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता.एक कार रस्त्यावरून भरधाव वेगाने धावत होती. कारच्या हेडलाईटला दुरून पाहिल्यानंतर असं वाटत होत जणू प्रकाशाचे दोन गोळे रस्त्याने भरधाव धावत आहेत. हेडलाईटच्या प्रकाशात ती कार भरधाव वेगाने धावत होती.गावापासून अलीकडेच असलेल्या छोट्याशा टेकडीवर एक पडका वाडा विजा चमकताच दिसायचं आणि क्षणात अंधारात गडप होऊन जायच. ती कार थेट त्या वाड्यापाशि येऊन बंद पडली.
'' काय झाल राज गाडी बंद का पडलीय ? ''
सुमित्रा राजकडे पाहत म्हणाली.
'' कही नाही गं डिझेल सम्पलय वाटतं ''
तो डिझेल काट्याकडे पाहत म्हणला.
'' शट यालापण आत्ताच संपायच होतं का?''
राज स्टेअरिन्गवर हाथ आपटत म्हणला .
" आता काय करायच राज ?''
सुमित्रा राजकडे पाहत म्हणाली .
आता काय करायच हा विचार करत असताना सहजच राजची नजर त्या पडक्या भयानक वाड्याकडे गेली रात्रिच्या काळोखात अन विजेच्या लक्खकन चमकणाऱ्या प्रकाशात तो वाडा खूपच भीतीदायक भासत होता. वाड्याच्या अंगणात एक वाळलेल झाड होतं त्यावरती एक विचित्र घुबड बसलं होत ते पाण्याने पूर्णपणे भिजलं होत.वाळलेल्या तुटक्या फांदीवर बसलेलं ते घुबड खूपच भीतीदायक वाटत होत.
'' मला वाटतं आजची रात्र आपल्याला इकडेच काढावी लागेल ''
राज सुमित्राकडे पाहत म्हणाला.
'' ईकडेच म्हणजे म्हणायचय काय तुला ?''
सुमित्रा प्रश्नार्थक वाक्य करत म्हणाली.
क्रमशः
© श्रीनंद कांबळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता काय होणार त्या वाड्याचं?? चिंता लागून रायली राव..लवकर येऊंद्या पुढचा भाग..
धन्यवाद पुढील भाग लवकरच येईल.

लिखाण चांगलं आहे पण प्लिज भाग मोठे टाका... आणि प्रभास चा फोटो बघून तर दिल गार्डन गार्डन हो गया >>> धन्यवाद ...तुम्हीपण प्रभासचे चाहते आहात वाटतं

शट यालापण आत्ताच संपायच होतं का?''
'शट' हे अशे शब्द नका वापरू.
शक्यतो मराठीच शब्द वापरा.
आणि कथा सुरू झालीकी लगेच संपली.
लांबी वाढवा.