वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे

Submitted by स्ट्रेंजर on 23 July, 2020 - 10:53

आजकाल कोणीही काहीही धागे काढू लागलेत. तसेच काही धाग्यांवर काही आयडी असंबंध प्रतिसाद देत आहेत. तर तुम्हाला कोणत्या आयडीजना ब्लॉक केलेलं आवडेल आणि का त्यासाठी हा धागा आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काही लोक दिवसभर प्रतिसाद देत असतात. मला तर प्रश्न पडतो एवढा वेळ त्यांना मिळतो तरी कसा. टाळेबंदी आधीही असंच होतं.
हे लोक जे काही काम करत असतील ते मन लावून करत असतील का? त्या कामातून एवढा वेळ तरी कसा मिळतो.

काही लोक कामात हुशार असतात. जे काम ऑफिसात इतरांना करायला अर्धा तास जातो तेच काम ते दहा मिनिटांत करतात आणि मग उरलेल्या वीस मिनिटांत असा टाईमपास करतात.

मी काही हुशार नाही सध्या आमचं काम बंद आहे म्हणून मी पडिक आहे. चालू झालं की मलापण वेळ मिळत नाही..

वैधानिक इशारा:
यु नो हू चे नाव घेताना हॅरी पॉटर च्या पाठीशी भरभक्कम डंबलडोर होता.

पण गडबड आइडी गुढी पाडव्यालाच उडवलेत वेमांनी. आता कुणाला गप्प करायचे? बाकी संयमित प्रतिसाद येतात भराभर तर आपण काय करणार?
घाबरण्यासारखं काही दिसत नाही. चर्चा धाग्यांत भरकटते मान्य पण धोरण सोडत नाहीत, शिविगाळ, आरोप नसतात.
ठीक आहे.

जुन्या चित्रपटांत डायलॉग असायचा "इनिसपेक्टर, गिरफ्तार कर लो इसे" तसे "वेबमास्तर, ब्लॉक कर दो इसे" Happy

वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे. >>>
आयडी - इच्चुकाटा.
कारण - गणेशोत्सव स्वयंसेवक धाग्यावर टाकलेला पहिलाच प्रतिसाद. उत्सवाच्या सुरुवातीस नतद्रष्ट पोस्ट टाकून रसभंग केला

कोणतेही जातीयवादी लेखन किंवा पोस्ट टाकणारे आयडी लगेच ब्लॉक करावेत. माबोवर सर्वात जास्त असंतोष जातीयवादी आणि राजकारण यावरूनच असतो. बाकी छोटेमोठे चिमकुटे, वाद गुडी गुडी वातावरणात थोडा मसाला ऍड करतात, ते चालून जातं.

वेळोवेळी साफसफाई करतच असतात की वेमा वगैरे मंडळी!!
पण ते ब्लॉक केलेले आयडी परत येतातच वेगवेगळी नावे घेऊन त्यामुळे त्या ब्लॉकचा तसा काही उपयोग आहे असे वाटत नाही!

कोणता आयडी कोणत्या आयडीला प्रतिसाद देतो, कोणता आयडी कुणाला देत नाही याचा फावल्या वेळेत अभ्यास केला की कोण कुणाला ब्लॉक करायची मागणी करतो हे पाहताना मनोरंजन होते.

मला ब्लॉक केले तर चालेल, पण एक दोन महिन्यांनी अनब्लॉकची रिक्वेस्ट पाठवली की २४ तासात अनब्लॉक करायला पाहिजे. किंवा ४८ तासात.
७२ पेक्षा जास्त नको.

वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे>>>
त्यापेक्षा निबंध लिहा, मी एका दिवसासाठी ऍडमिन/वेमा झालो तर..

देजाऊ.
असं आव्हान दिलं गेलं होतं आणि कुणी तरी ते स्विकारून धागा काढला होता. मला असे वाटतेय कि घडलेय हे?
बहुतेक Admin यांनी उडवला तो धागा.

Pages