कुरडूची भाजी (डोंगराळ भाजी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 July, 2009 - 02:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ जुड्या कुरडूची पाने खुडून, धुवून (तिन ते चार पाण्यात धुवावीत)
२ कांदे बारीक चिरुन
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२-३ मिरच्या चिरुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
१ टोमॅटो बारीक चिरुन
पाव वाटी ओल खोबर करडवुन
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
२ चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. आता लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेउन जरा शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मिठ, साखर घालावी. परत ढवळून ३-४ मिनीटांनी ओल खोबर घालाव व गॅस बंद करावा.
SDC10286.jpgSDC10287.jpg

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही भाजी डोंगरात मिळते. बाजारात कातकरणी घेउन येतात. चव साधारण माठाच्या भाजी प्रमाणेच असते. ह्यात चणाडाळ, मुगडाळ घालुनही ही भाजी करता येते. टोमॅटोच्या ऐवजी अर्धा लिंबूही चालेल.

माहितीचा स्रोत: 
भाजीवाली कातकरीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्त झालाय व्हिडीओ, छान दिसतेय भाजी. सोबत आवाज असेल तर आवडेल.

कढई भारी आहे, अशी मी पहिल्यांदाच बघितली. कुठल्या मटेरियलची आहे.

Pages