समिधा...

Submitted by aksharivalay 02 on 26 June, 2021 - 10:16

समिधा..

पहाटे पाच वाजता मोबाईल वर अलार्म वाजल्याने समिधाला जाग आली. ही तिची बागेत जायची वेळ होती. नोकरी निमित्त बेंगलोरला राहायला आल्या पासून ती नियमितपणे पहाटे बागेत जाऊन बसायची. ती बागेच्या शेजारच्या सोसायटी मध्ये आठ महिन्यापासून राहत होती.
समिधा अत्यंत हुशार, कष्टाळू अशी आय टी क्षेत्रातील पदवीधर मुलगी. लग्नानंतर सहाच महिन्यात तिने आपला नवरा शेखरला गमावले. वडिलांच्या आग्रहास्तव केलेलं लग्न ज्यामुळे तिला तिची पुण्यातली नोकरीही सोडावी लागली. शेखर नाशिकच्या एका मोठया व्यवसायिक कुटुंबातला मुलगा, इच्छा नसतानाही तिला लग्नानंतर नाशिकला राहायला जावं लागले. शेखरच्या कुटुंबात बायकांना घरकाम एवढं एकच काम करण्याची परवानगी होती. शेखर गेल्यानंतर प्रचंड ताणतनावाच्या वातावरणात पुन्हा नोकरी करण्याच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी समिधाला एक महीना लागला. पण आयुष्यातल्या सगळ्यात कठीण निर्णय घेत तिने सगळ्यांपासून दूर बेंगलोरला नोकरी पहिली. मग नोकरी करायला लागल्यामुळे शेखरच्या घरच्यांनी तिच्याशी सगळे संबंध तोडले आणि तिच्या आईबापाची तिने दुसरे लग्न करावे ही इच्छा तिने पूर्णपणे नाकारल्यामुळे तेही तिच्यावर रागवलेले होते. तिने सगळ्यांपासून दूर नोकरी करण्याचा निर्णय तर घेतला होता पण गेली आठ महिने ती पूर्णतः एकटी पडली होती. हा प्रवास इतका खडतर असेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. पण एकदा वडिलांचं ऐकून केलेली चूक पुन्हा करायची नाही हे तिने मनाशी पक्के केले होते.
कोणावरही अवलंबून न राहता आता आपल्या प्रवासाची दिशा आपण ठरवायची हे ठरवून ती इतके दूर तर आली पण हा प्रवास इतका खडतर असेल याची तिने कल्पनाच केला नव्हता. इथे बोलायला, ऐकायला कोणी नसायचं. ऑफिसमध्ये काहींशी बोलण्याचा प्रयत्न केला जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या व्यक्तीने आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढल्याचा अनुभव तिने घेतला आणि या मुळे तिलाच त्रास झाला. लोकांच्या वाईट नजरा, चुकीच्या भावनेने जवळीक साधण्याचा प्रयत्न. या सगळ्याला ती लवकरच कंटाळी होती. यातूनही तिचे एक दोन मित्र झाले पण त्यातल्या काहीना तिची परिस्थिती, मनस्थिती ऐकण्यासाठी वेळच नसे तर काही फक्त सल्ले देण्यासाठीच ऐकत. या सल्ल्यांचा, मतांचा वगैरे तिला कंटाळा आला होता. समोरच्याने कुठलेही अनुमान, तर्कवितर्क, न काढता, कसलेही मत, सल्ले न देता माझ्या मनातल्या गोंधळाला वाट रिकामी करून द्यायला मला मदत करावी इतकीच तिची इच्छा होती. पण आपलं दुःख कुठलेही अनुमान, तर्क, मत, सल्ले न देता शांत ऐकून घेणार कोणी मिळेल याची आशाच आता तिने सोडली होती. अनेकदा आत घुटमळत असलेलं दुःख सहनच होत नसल्यामुळे आणि एकटेपणा असाह्य होत असल्यामुळे तिच्या मनात आत्महत्येचा विचार देखील येऊन जाई पण प्रत्येकवेळी तीन यातून स्वतःला सावरलं.
एकदिवस बागेत अश्याच विचारांच्या गर्दीत बुडालेली असताना समोरून तिच्या दिशेने चालत येणाऱ्या आजोबांच्या खिश्यातुन पडलेल्या वस्तू कडे तीचं लक्ष गेलं. तिने आजोबांना खुणावून त्यांची वस्तू पडल्याची जाणीव करून दिली. आजोबा वस्तू उचलत तिच्या दिशेने चालत येऊन हसतहसत तिला काहीतरी बोलले आणि पुढे निघून गेले. भाषा ओळखीची नसल्यामुळे तिला त्यांचं बोलन कळालं नाही.
दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीच्या वेळी ती बागेच्या प्रवेशद्वारातून आत आली आणि तिने आपल्या रोजच्या बसण्याच्या जागेवर नजर टाकली तिला तिथे तेच आजोबा बसलेले दिसले. इतर कोणी असते तर ती तिथे बसलीच नसती पण आजोबांच कालच मंद हसू आठवत तिने आपल्या रोजच्या जागी बसायचे ठरवलं. तिने आजोबांना दुपारच्या वेळी एकदा दोनदा सोसायटी मध्ये पाहिलं होत.
आजोबांना हिंदी कळत असेल असं समजून ती त्यांच्या कडे पाहत बोलली "आप यही सामनेही रेहेते हो क्या ?" तिचा प्रश्न संपल्यानंतर आजोबा तिच्याकडे पाहत फक्त हसले पूढे तिच्या दोनतीन प्रश्नांनाही आजोबांनी याच पद्धतीने हसण्या द्वारेच उत्तर दिले एव्हणा तिच्याही लक्षात आलं होते की आजोबांना हिंदीही समजत नाहीये. कालही तिने त्यांना तेलगू तामिळ वगैरे आश्या कुठल्या तरी भाषेत बोलताना ऐकले होते आपण बोललेले यांना काही कळणार नाही याचा अंदाज आल्याने तिने तिथून उठून जायचं ठरवलं.
सलग पूढेचे काही दिवस ते आजोबा तिच्या आधी त्या बाकावर येऊन बसलेले असायचे. दोघांन मध्ये भाषे अभावी कुठला संवाद तर घडत नसे. पण दोघांनीही जागा बदलण्याचं कष्ट नाही घेतलं.
एकदिवस समिधाच्या ऑफिस मध्ये एका विचित्र प्रसंग घडला. वाढत चाललेला मनातला गोंधळ, एकटेपण यामुळे तिने पहिल्यांदाच एका मित्राने दिलेला सल्ला ऐकत ऑफिस पार्टी मध्ये दारूला हात लावला. आणि नंतर त्याच मित्राने तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट तिला खटकली आणि ती घरी निघून आली. मग रात्रभर तिने केलेल्या चुकीसाठी स्वतःला दोष दिला आणि रात्र जागूनच काढली. सकाळी बागेत जावं कि नाही जावं या विचारातच असतांना अखेर जायचं ठरवत तिने घर सोडलं. तिला उशीर झाला होता पण नेहेमीप्रमाणे आजोबा त्या बाकावर बसलेले होतेच. रात्रभराच विचारचक्र असाह्य होत चालल्याने तिने आदल्यादिवशी घडलेला प्रसंगाच्या रागात आजोबांच्या शेजारी बसून स्वतःशीच बडबड करायला सुरवात केली. तिचे बोलणे थांबले की आजोबा फक्त हसत. पण या सगळ्याच्या परिणामस्वरूप आज बागेतून परतत असताना तिला मन थोडं हलकं हलकं जाणवलं. आज बऱ्याच दिवसाने तिने आपल्या आयुष्यातील घटना कोणालातरी सांगितली आणि समोरच्या व्यक्तीनेही सल्ले न देता मत न मांडता ती फक्त ऐकून घेतली. पुढे अजून एकदा दोनदा तिने असंच केलं आणि आता तिला हे आवडू लागलं. ही एकतर्फी बडबड तिला समाधान देऊ लागली. पुढे हे रोजच झालं. ती आजोबांचा शेजारी बसून दोनदोन तास बडबड करू लागली. तिने शेखर बरोबरच आपलं भावशून्य नातं, घरच्यांनी हट्टाने लावून दिलेलं लग्न, शेखरच्या घरच्यांचे बुरसटलेले विचार ते ऑफिसमध्ये तिच्या कडे वाईट नजरेनं बगणारा तिचा बॉस वगैरे असे एक ना अनेक प्रसंग आजोबांजवळ सांगितले. पार्टी मध्ये घेतलेल्या दारूच्या पाहिल्या घोटा आणि नंतर घडलेला प्रकार सांगायला ती विसरली नाही. असे एक ना अनेक विनोदी खाजगी कुठेही व्यक्त न केलेले प्रसंग तिने पहाटे त्या बाकावर बसून आजोबांना सांगितले आणि तिच्या अपेक्षे प्रमाणे प्रत्येक प्रश्नानंतर आजोबा फक्त अर्थ शून्य हसले. प्रत्येक पहाटे एखाद ओझं हलकं होतंय असं तिला वाटू लागलं.
एकदिवस बागेत कोणाशीतरी आजोबा हिंदी भाषेत बोलताना तिने ऐकलं. मग आजोबानी रोजची बडबड फक्त ऐकून का घेतली ते कधीच काहीच का बोलले नाहीत असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात घर करू लागले. काही वेळ तर तिला भीतीही वाटली आपण काय काय बोलून गेलोय आपलं बोलणं जर त्यांना कळालं असेल तर. तिने आजोबांना विचारायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी आजोबांच्या शेजारी बसतच तिने त्यांच्या दिशेने प्रश्नांचा भडीमार केला. तीच सगळं ऐकून घेतल्यानंतर आजोबा हळुवार हसत बोलले " मुझे तुमारी बातो से पता लगा की तुम सिर्फ सूननेवाला धुंड रही थी ओर बदकिस्मतीसे मुजसे बात करनेवाला कोई नही था तो मे बस तुम्हारी बातो को सून लेता था वैसेभी मुझे जादा कुछ समज नही आता और जो आता वो मे यहा से उठते समय यही छोड जाता." आजोबांचं बोलणं संपताच काही मिनटं त्या बाकावर फक्त शांतता होती समिधाला काय बोलावं सुचलं नाही मग काही मिनिटांन नंतर समिधा न कालचा दिनक्रम आजोबाना सांगायला सुरवात केली आणि यावेळी आजोबांना तीच बोलणं कळतही होत कारण यावेळी ते संभाषण आजोबांना कळत्या भाषेत सुरु होत.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अक्षरवलय छान गुंफली आहे एकाकी मनाची कथा!
आयुष्यात आपल्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो.कधी आपल्या मनाप्रमाणे होत तर कधी आपल्या मनाप्रमाणे नाही.मग उगाच मन घुटमळत असतं भूतकाळात. वाटतं कुणीतरी आपल्या जवळ असावं आपल्या मनातले विचार त्यांनी ऐकून घ्यावे पण जेव्हा असं कोणी भेटत तेव्हा मन आनंदाने गहिवरून जातं!

पुलेशु!