भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो ते नॅचरल आहे ते म्हणजे इतर कुत्र्यांब रोबर आपल्याला पण मिळायला हवे हेच असते. मी भटक्यां ना भरवते तेव्हा एक मूठ पेडिग्री माझ्या कुत्र्या समोर पण टाकते. ते गृप बिहेविअर आहे नाहीतर आपला लाडाचा कुत्रा हिरमुसला होतो. माझ्या हक्काचे मला का मिळत नाही अशी शंका त्याच्या डोक्यात येते. तिच्या ट्रीट त्यांना अर्ध्या अर्ध्या तुकडा करून दिल्या तरी तिच्या डोळ्यात विश्वास घाताचा भाव येतो.

वर बिलिडिंग मधले कोणी ओरडले तर मेरा कुत्ता भी खा रहा है उनके साथ असे म्हणता येते.

मोठे एग्रेसिव भटके असले तर हे बारके लांब कुत्रे हळूच एक बिस्किट तुकडा घेउन पळवून लिफ्ट पाशी येउन उभे राहते. त्यांच्या त्यांचतली गंमत अस्ते ती.

सध्या इथे मस्त वार्म वेदर आहे, त्यामुळे जिकडे तिकडे भरपूर किडे, प्राणी, पक्षी दिसताहेत. माउईची मजा येते. सिकेडाज नावाचे मोठे किडे/पाखरं खूप आली होती मधे. ते स्लो असतात. तसेच काजवेही बरेच स्लो असतात. त्यामुळे माउई ला हे दोन पकडता येत होते त्याचेच त्याला अप्रूप वाटले आधी. पकडतो पण ते खायचा वगैरे हेतू नसतो त्याचा Happy तोंडात त्यांनी फडफड केली की थुंकून टाकतो. मग ते उठून उडून जातात! एकदा तर काजवा तोंडात पकडला अन याचं तोंडच एक क्षण लाइट अप झाले. हॉरर मूव्ही सारखे दॄष्य होते Lol
बॅकयार्डात झाडांचे वाफे आणि स्टोन पॅटिओ याच्यामधे बॉक्सवुड च्या दाट झुडपांची बॉर्डर आहे. माउई दोन दिवस सारखा तिकडे वाकून बघत होता. भुंकत पण होता. शेवटी परवा क्युरिओसिटी असह्य झाल्याने त्या झुडपात घुसलाच आणि दे दणादण खणायला अन उचकापाचक सुरु केली त्या झुडपात. मला एकदम किच किच किच असा स्क्विकी टॉय सारखा आवाज आला म्हणून बाहेर बघितले तर त्या झुडपाखालून सश्याची अगदी लहान ४-५ पिल्लं बाहेर आली होती! माउई ला ती खेळण्यासारखीच वाटली असावी. त्यांच्या मागे धावत होता. मी ओरडेपर्यन्त एक पिल्लू त्याच्या पंज्यात सापडले! त्याला कुतुहलाने हलताना बघत होता, पंज्याने ढोसत होता! बिचारे ते पिल्लू. मी बाहेर आले म्हटल्यावर आता मी खेळंणं काढून घेणार हे समजल्यामुळे माव्या ते पिल्लू तोंडात पकडून पळत सुटला पण मी ओरडल्यावर मग टाकले खाली. काहीतरी चुकले हे कळले असावे, मग गिल्टी चेहर्‍याने बघत बसला माझ्याकडे. मी पाहिले तर चक्क ते पिल्लू ठीक होते. उचलून परत त्याला त्या झुडपाजवळ ठेवले तर सुर्रकन गेले पुन्हा आत!! आता पिले मोठि होऊन निघून जाईपर्यन्त माव्याकडे लक्ष दिले पाहिजे जरा. आता बाहेर गेला की एकदा त्या झुडपाकडे, एकदा माझ्याकडे बघतो. नो! असं ओरडले की मग सुमडीत पुढे निघतो तिथून Happy

एकदा तर काजवा तोंडात पकडला अन याचं तोंडच एक क्षण लाइट अप झाले. हॉरर मूव्ही सारखे दॄष्य होते >>> Lol तुफ्फ्फान हसलेय हे इमॅजिन करून.

आई ग.. ससुल्याचे पिल्लू तोंडात ऐकून माझा जीव गेला इकडे..
माझे ससुल्याचे पिल्लू पण अगदी इवलुसे आहेत..खूपच नाजूक असतात ते. एकदम मऊ..

अमृताक्षर हो वाटलेच मला, सॉरी Happy नशीबाने सुखरूप निसटले ते पिल्लू.
सध्या इथे सशांच्या पैदाशीचा सीझनच आहे . जिकडे तिकडे गवतात सशांची पिल्ले दिसतात. आश्चर्य म्हणजे बिळात वगैरे नसतात ती. उघड्यावरच असतात .केमोफ्लाज करडा-ब्राउन रंग हे एकमेव प्रोटेक्शन असतं त्यांना. अर्थातच अतिशय वल्नरेबल असतात. कुत्री, मांजरं, कोल्हे तर आहेतच पण गिधाडं आणि तत्सम शिकारी प्क्षीही खूप आहेत इथे.

बाप रे ऐकूनच अंगावर शहारे आले . जमल्यास फोटो पाठवणार का ब्राऊन ससे कसे दिसतात पाहिले नाही कधी.. तुम्ही कुठे राहता?

ओरीओ ला गवत ठेवलेली टोकरी दिसली तर तो टुणकन उडी मारून बसला टोकरी मधे. मागोमाग त्याचे भावंडं पण आले. पहिले गवत पाहत बसला मग दोन्ही हाताने उकरून झालं . शेवटी थोडस खाऊन पाहिलं आणि त्याला जमलच नाही खायला तेव्हा पळून गेला त्याच्या आईजवळ.
IMG_20210624_002523.jpgIMG_20210624_002509.jpgIMG_20210624_002453.jpgIMG_20210624_002203.jpgIMG_20210624_002357_0.jpg

अमृताक्षर : कसले क्यूट फोटो आहेत पिल्लांचे!!
बायदवे हे पहा असे दिसतात इथले ससे. आम्ही अमेरिकेत, न्यू जर्सीत रहातो
rabit.jpg

एकदा तर काजवा तोंडात पकडला अन याचं तोंडच एक क्षण लाइट अप झाले. हॉरर मूव्ही सारखे दॄष्य होते >>>>>>>>> अग्गं काय Rofl

माऊई आणि ओडीन Lol

सध्या ज्योईला एक नवीन मैत्रिण मिळाली आहे. तिचं नाव जॅस्मिन. तीन-चार महिन्यांची आहे. अजून फार ट्रेनिंग वगैरे पण झालं नाहीये. लिशवर चालत नाही. तिचे पालक तिला सॅकमध्ये घालून सगळी कडे नेतात.
जॅस्मिन पुढे ज्योईपेक्षा मोठी होईल आकाराने पण सध्या बरोबरीची आहे. ज्योई तिच्यासमोर एकदम नाजूक साजूक मुलीच्या दांडगट बॉयफ्रेंडसारखा वागत असतो !
WhatsApp Image 2021-06-24 at 8.10.13 AM.jpegWhatsApp Image 2021-06-24 at 8.10.13 AM(1).jpeg

ज्योई आणि जॅस्मिन पहिल्यांदा भेटले आणि एकत्र खेळले तेव्हा आमच्या घरचे बाकीचे सदस्य भयंकर खुष झाले होते. बायको म्हणे, ती जॅस्मिन इतकी क्युट आहे की मला अगदी तिला सुन करुन घरी आणावं असं वाटतय!! म्हटलं हो सुन आणा आणि मग मुलगा आणि सुन दोघांनाही सकाळ संध्याकाळ शि-शु करायला बाहेर घेऊन जा.. Proud

मुलगा आणि सुन दोघांनाही सकाळ संध्याकाळ शि-शु करायला बाहेर घेऊन जा. >>>> Rofl
जोई भलताच खूष दिसतोय फोटोत. Happy जास्मिन बाकी खरंच क्यूट आहे! कोणतं ब्रीड आहे?

एकदा तर काजवा तोंडात पकडला अन याचं तोंडच एक क्षण लाइट अप झाले. हॉरर मूव्ही सारखे दॄष्य होते >>> Lol तुफ्फ्फान हसलेय हे इमॅजिन करून.>>>
मी पण, माव्याने म्हणजे किस्साच केलाय पार
फुल्ल टू धमाल

ओडीन चा आजचा किस्सा
बुलेट च्या बाबाने एक लेसर लाईट आणलेला
मला म्हणाला याना खेळायला होईल
म्हणलं मांजरे खेळतात हा खेळ पण भुभु कितपत खेळतील माहिती नाही पण दोघांना जाम आवडला तो इकडे तिकडे पळणारा हिरवा ठिपका आणि जाम पळापळ, उड्या मारून तो पकडायचा प्रयत्न केला
तुफान दमले तरी खेळ बंद नव्हता करायचा त्यांना
आणि त्याची असली मजा झाली
मित्राने बास आता म्हणून लाईट बंद केला आणि नेमका तो बुलेट च्या पायात असताना बंद झाला
याचा ओडीन महाशयांना आला राग
त्याला वाटलं हे हिरवा (त्यांना ते काय वाटत होतं देव जाणे) खेळणे बुलेट ने खाऊन टाकलं
आणि चिडून त्याच्यावर भुंकयला लागला, पंजाने त्याला ढकलून द्यायला लागला आणि कहर म्हणजे बुलेट ला कळत नव्हतं की काय घोळ झालाय
तो बिचारा गोल गोल फिरून पायात तो ठिपका कुठे गेलाय ते शोधत होता
आता मारामारी होईल या भीतीने आम्ही तो लाईट परत सुरू केला आणि कॅम्पउड भिंतीवर मारून मग बंद केला
झालं म्हणलं गेला पळून तो
पण तरीही या दोघांचे समाधान झालेच नाही
ते डोकावून डोकावून शोधत राहिले कुठे गेला आणि निषेध म्हणून दोघांनीही भिंतीवर तंगड्या वर करून प्रसाद दिला

मी पोट दुःखेपर्यंत हसलोय आज
त्याचे अफाट एक्सप्रेशन्स होते

Rofl आशुचँप, फारच धमाल किस्सा आहे.
त्याला वाटलं हे हिरवा (त्यांना ते काय वाटत होतं देव जाणे) खेळणे बुलेट ने खाऊन टाकलं
आणि चिडून त्याच्यावर भुंकयला लागला, पंजाने त्याला ढकलून द्यायला लागला आणि कहर म्हणजे बुलेट ला कळत नव्हतं की काय घोळ झालाय >>> Lol

मुलगा आणि सुन दोघांनाही सकाळ संध्याकाळ शि-शु करायला बाहेर घेऊन जा. >>> Biggrin

आमच्या यार्डमध्ये पण सशांनी पिल्ल दिली आहेत. पाच आहेत एकूण. ते 'घरटं' म्हणून जे काही बांधलेलं असतं ते गवत आणि फीमेल सश्याच्या अंगावरची फर वापरून बनवलेलं असतं. पिलं दिल्यावर दोन आठवडे सशीण एकदा पहाटे आणि एकदा संध्याकाळी येऊन त्यांना खाऊ घालते. अ‍ॅडल्ट सश्यांच्या वासावर कोल्हे-कुत्रे येतात म्हणून ती फारसं फिरकत नाही पिलांकडे. तेवढ्या २ आठवड्यात पिलं स्वतंत्र होउन बागेची नासधुस करायला रेडी होतात.

3FB0169E-0212-4C96-A9DC-779D7AC73158.jpeg

लांब उभं राहून, झूम करून फोटो घेतला आहे त्यामुळे फार स्पष्ट नाही.

054C6978-35A5-444D-8940-11A7DFAA5C76.jpeg

पग्याच्या सूनबाईंवरून आठवलं. आमच्या आईच्या घरी एक बोका होता. त्याच्या आईची २-३ पिलं होती बहुतेक, त्यातला हा एक आमच्या घरी राहिला. एक दिवशी अचानकच एका सुंदर, नाजूक मांजरीला घेऊन आला घरी आणि मग दोघं एकदम जोडीनं रहायला लागले. आईनं दूध-पोळी दिली की तिचं खाऊन झाल्याशिवाय हा खायचा नाही. बेडच्या एका कोपर्‍यात हा ताणून द्यायचा, त्याची एकदम आवडती जागा होती तर ती जागा पण त्या भवानीला दिली. मांजरांची माहिती असेल तर हे खूप अनयुजवल वागणं आहे. आमची फारच करमणूक झाली त्या दिवसांमध्ये. पण थोड्याच दिवसांनी लक्षात आलं की या सूनबाई नाहीत तर जावईबापू आहेत Biggrin हा दुसरा बोका बहुतेक त्याच मांजरीचं पिलू असावं असा अंदाज कारण दोन वेगळ्या आयांची पिलं असलेले बोके मैत्री करून सलोख्यानं रहाणं अशक्य आहे.

पण थोड्याच दिवसांनी लक्षात आलं की या सूनबाई नाहीत तर जावईबापू आहेत >>>> Rofl

Pages