..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/१०९
समीर हैदराबाद मधे नोकरीनिमित्त एकटा राहत असतो.गोपाळ त्याच्या कडे स्वंयपाकी असतो.गोपाळ छान,चविष्ट स्वयंपाक बनवत असतो पण अचानक त्याला उद्याच नोकरी सोडून त्याच्या गावी जावे लागणार असते कायमचे.समीर ला फार वाईट वाटते, त्या दिवशी संध्याकाळी समीर छोटीशी पार्टी अरेंज करतो.त्या पार्टीत गोपाळला उद्देशून समीर कुठले गाणं गाईल????

7/109
तू कल चला जायेगा तो मै क्या करुंगा?
'नाम'चं गाणं. हे आहे का उत्तर?

श्रद्धा, तुमची आतापर्यंतची कामगिरी पाहता मी कोडं न घालताच तुम्हाला बक्षीस जाहीर करतो! तुम्ही म्हणालात ती सिल्क कुठे मिळते?

७/११०
संजना नावाची एक खूप सुंदर सेल्सगर्ल असते. गोरीपान , समुद्रासारखे गहिरे काळे डोळे, नागिणीसारखे सळसळणारे लांबसडक काळेभोर केस, चाफेकळी नाक... बघणारा अगदी प्रथमदर्शनीच प्रभावित व्हायचा.
एकदा ती 'मन लेले' नावाच्या मुलाच्या सोसायटीत कॉस्मेटिक विक्रीसाठी जाते. मन तर तिला बघताच फिदा होऊन जातो. मनची आई म्हणजे लेलेकाकू तिच्याकडून गुलाबी लिपस्टिक, पावडर विकत घेतात. त्यांचेच शेजारी, म्हणजे सागर काळे मोती साबण , तर सूरज गोरे बायकोसाठी लाल लिपस्टिक घेतात.
मनची नजर तर संजनावरुन हटतच नसते. हे लेलेकाकूंच्या लक्षात येतं. मग लेलेकाकू संजनाला उद्देशून कोणतं गाणं गातील?

काली नागिन के जैसी जुल्फे 'तेरी काली काली
सागर को मोती, और सुरज को तू देती है लाली
देखे जो तुझको मन मेरा डोले

हे कोडं तसं जुनं आहे, त्यामुळे लवकर लक्षात आल्यास क्षमस्व.

७/१११
एक सिरीयल किलर असतो. तो स्वतः सिरीयल किलर असल्याचं एका गाण्यात कबूल करतो. ते गाणं कुठलं?

क्लु शिवाय गाणं क्लीकच होत नाही.. पण थांबा इतरांना येत असेल बिना क्लुचे..अजून कुणी मागितला तरंच द्या.

७/१११ - >>
चार बार मारेंगे, एक बार गिनेंगे
एक एक एक एक दो दो दो दो
तीन तीन तीन तीन चार चार चार चार

किंवा
कुछ कर गुजरने को
खून चला खून चला

७/११२
जीवन आणि प्रितम हे व्यवसायातील प्रतिस्पर्धी! दोघांचाही हार्ड्वेअर चा व्यवसाय होता.... लोखंडी तारा, गज, दोरखंड, खिळे, पत्रे..नाना वस्तू दोघांच्या ही दुकानात होत्या. आपलाच माल कसा उच्च प्रतिचा असे दोघेही छाती ठोक पणे सांगत...!
जीवनची मैत्रिण- धारा हिने प्रितमचा काटा काढायचे ठरविले..... आणि एका रात्री तिने प्रितम ला जीवनच्याच दुकानात बोलावून दुकानातच करकचून बांधून ठेवले.....
व ती मुक्त पणे गाऊ लागली..........

७/११२ - >>
तुझे जीवन की डोर से बाँध लिया है
??

Pages