पाऊस

Submitted by deepak_pawar on 9 June, 2021 - 11:21

झरझर झरती धारा, भिरभिर वाहे वारा
धुंद होऊन रानात नाचतो, फुलवून मोर पिसारा.

घुमू लागली शेतामधुनी, शेतकऱ्यांची गाणी
मातीच्या रंगात रंगले, आज पुन्हा हे पाणी
चिंब जाहला रानमळा, भिजली चिंब धरा.

पाण्यात खेळण्या दंग, आईला चुकवून पोरं
वाऱ्याने उडता पदर सावरी, भिजलेली नार
कुणा वाटते चिंब भिजावे, कुणी शोधी आसरा.

घरट्यात पिलांना पक्षी, पंखात घेऊनी बसले
कुठे कुणी लेकरू, आईच्या कुशीत निजले
गोठ्यात चाटते गाय, अपुल्या भिजलेल्या वासरा.

हा उन्हाचा गाव आहे.
कविता संग्रहा मधून.

Group content visibility: 
Public - accessible to all site users