महेश काळे फॅन क्लब

Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27

सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवातीला महेश काळे आवडलेला. नंतर त्याच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या, तरीही ठीकच होता. कट्यार... मध्येही बरा वाटलेला.

पण हे सुरांनो.... चे त्याने जे काही केले त्याला तोड नाही. त्याच्यावर आता कायमची फुली. फ्युजन म्हणजे नक्की काय हे एकदा समजून घे बाबा आणि जितकी कुवत आहे तितकीच उडी मार...

राहुल देशपांडेशी तुलना नको.. राहुलचा स्तर वेगळा आहे आणि उत्तरोत्तर राहुल तो वाढवत जातोय. राहुलला मनापासून शुभेच्छा!! त्याच्या आजोबांच्या मी प्रेमात होतेच, राहुलच्याही आहे. राहुलच्या रूपे त्याचे आजोबांच परतलेत असे मला वाटते. त्यांचे राहून गेलेले सगळे हा पूर्ण करतोय.

हा धागा वाचून महेश काळेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि वर दिलेल्या लिंकवरून "कानडा राजा पंढरीचा" ऐकले. महेश काळे नाकातून गातो, असे मलातरी वाटले. त्याचा आवाज विशेष आवडला नाही, म्हणजे आवर्जून पुन्हा ऐकीन इतपत आवडला नाही, असे म्हणायचे आहे. राहुल देशपांडे आणि शंकर ममहादेवन या दोघांचे गायन मात्र आवडले. (तेपण पहिल्यांदाच ऐकले).

मला शास्त्रीय संगीताबद्दल काहीही कळत नाही, पण कानाला काय गोड वाटते आणि स्वतःला काय आवडते, ते लगेच कळते. त्या बाबतीत अभंग ऐकायचे तर पं.भीमसेन जोशी यांना तोड नाही, असे माझे मत आहे.

महेश काळे अ‍ॅटीट्युड वगैरे असा नाही पण खुपच जाहिरात करतो स्वतःची.
माझी गुरुभगिनी( मी ही संगीत शिकायची एके काळी), ती मराठी अधिवेशनला अमेरीकेत गेली होती तेव्हा, फोटो काढायला मिळेल का विचारल्यावर, माझ्या कार्यक्रमाला येतायना, मग देतो.
वर वर मस्करी वाटेल असं म्हणाला पण मूळात खुपच जाहिरात करतो.
पण ही मैत्रीण गेलेली अमेरीकेत तिथे खास महेश काळेच्या कार्यक्रमाला, कायच्याकाय पहिल्या सीटचे पैसे देवून, तिथे त्याने अर्धा अधिक वेळ, त्याचे ते प्रत्येक मित्रांनी तारीफ केलेली क्लीप( सुभा, अमृता खा., मग असे बरेच जण) दाखवली. मग महेश काळे म्हणाला, आता मी लाईव जातो माझ्या फेबूवर तिथे मग वेळ( कनेक्शन लागेपर्यंत), मग प्रत्येक ओळ प्रत्येकांकडून( प्रेक्षकांकडून) गावून घेणे, मग स्टेजवरून उतरून सगळ्याण्कडून गावून घेणे... असा वेळ घालविल्यावर एखाद दोन गाणी गायला. मध्येच आपल्या इन्स्टिट्युटची जाहीरात असे चालू होते.

मी पुण्यात एकदाच कायच्याकाय तिकिट काढून गेलेले त्याच्या कार्यक्रमाला, पण ठिक वाटलेला. एक दोन गाणी ठिक गातो अरुणी किरणी वगैरे.
पण, “सा“ खुप म्हणजे खुपच नाकात गातो. कानाला टोचतो.
एकून पहा.

राहुल देशपांडे समोर तर, "कानडा राजा" महेश काळेचे फिके वाटते. राहुल देशपांडे मला आवड्तो/आवडतोच.

थॅन्क्स टू हा धागा, मी गेले तासभर घरी शास्त्रीय संगीताचा माहौल बनवला.. म्हणजे ईथल्याच लिंका ऊचलून, कानडा राजा पंढरीचा विविध वर्जन, आणि स्पेशली कट्यार काळजात घुसली मधील काही गाणी रीपीट मोडमध्ये.. पहिल्यांदाच ऐकत होतो. छान वाटत होते. मग मुलगी आली, तिला ते झेपत नव्हते. हे काय रडके लावलेय म्हणाली. मग तिला देशमुख साहेबांचे लय भारी माऊली माऊली ऐकवले. तिचा आत्मा शांत झाला. मग तिच्याच फर्माईशीवरून सोनू निगमचे भगवान तू कहा है बता लावले. थोडक्यात देवभक्तीचे वातावरण कायम राहिले Happy

वर कोणीतरी म्हटलेय की महेश काळे नाकात गातात. मलाही काही वेळा ते अगदीच जाणवले. अगदीच म्हणजे हिमेश लेव्हल. पण ईटस ओके. कुठूनही गाऊ दे, झेपते तोपर्यंत ऐकायचे न झेपल्यास बदलायचे. गाण्यात शब्द संगीत ठेका या ईतर बाबीही चांगल्या असू शकतातच. हिमेशची सुद्धा बरीच गाणी छान वाटतात. ऐकली जातात.

महेश काळे प्रसिद्धीच्या झोकात येण्याआधी त्यांची शास्त्रीय संगीताची मैफल ऐकली होती. अभिषेकीबुवांप्रती असलेली भक्ती सूरांमधून पोहोचत होती. ते गाणे टाळ्यांसाठी नव्हते. मिडवेस्टातले छोटेसे सभागृह, निम्मी तिकीटेही विकली गेलेली नाहीत अशा परीस्थितीत खूप मनापासून गायले होते.

'हे सूरांनो चंद्र व्हा' मला अभिषेकीबुवांच्या खालोखाल देवकी पंडित आणि मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचे आवडते.

महेश काळे आणि राहूल देशपांडे यांची तुलना मी करणार नाही. राहूल देशपांडेंचे स्वतःचे असे एक स्थान आहे. अतिशय नम्र अभ्यासक !

महेश काळे आणि राहुल देशपांडे आता आता माहीत झालेल्यांना किंवा हेच माहीत असलेल्यांना पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं वसंतखाँ देशपांडे ऐकावेसे वाटावेत अशी इच्छा करतो.

मला तर, शौनक अभिषेकी ह्यांचे पण गाणे आवडते. ह्यांच्या मैफीली अटेंड केल्यात.
पं. जितेंद्र अभिषेकी ह्यांची तोडच नाही.
आणि वसंतराव देशपांडे सुद्धा.
राहुल देशपांडेचा युट्युबर मस्त भाग असतात.
केतकीच्या बनी इतकं मस्त गायलय... तो पण पहा इछुकांनी.

महेश काळेचं गाणं एकदा(च) ऐकलं, तेव्हा पु. लं च्या रावसाहेबांची आठवण झाली. ('त्यंच्यासारखं एक तान घ्या, मूळव्याध होतंय की नाही बघा')
असे कार्यक्रम करत हिंडण्यापेक्षा एखाद्या चांगल्या गुरूचे पाय धरून शिक्षण सुरू ठेवल्यास त्याचेच कल्याण होईल. आणि अभिषेकीबुवांचं नाव का खराब करतोय हा? साधे सूर नीट पेलवत नाहीत आणि गुरूंचं नाव घेऊन त्यांची बदनामी का करतो? अभिषेकीबुवां कडे फारतर एखाद वर्ष शिकला असेल. त्या पुण्याईवर ....
अतिशय चीडचीड होते याचं नाव काढलं की.

काल वसंतरावांची टॉप टेन गाणे असे युट्युब सजेशन मध्ये आले. ती खरेच मस्त आहेत. एक गणपतीचे आहे. एक दाटून कंठ आला. हमखास रडवणारे गाणे. त्यात काल घर आवरताना आईबाबांचे फोटो बाहेर आलेले.. मग सुरत पिया की न. तेजोनिधी लोह गोल हे तर त्यांचेच बेस्ट आहे

शंकर महा देवन ने त्याचा कचरा केला नव्या कटारीत. अजून एक दोन आहेत आता ऑफिसातून फुरसतीत ऐकेन.

अभिषेकी सिनीअर ह्यांचे लागी कलेजवा कटार व मुकुल शिवपुत्र ह्यांचे जमुना किनारे मेरो गांव ही दोन्ही ऐका. दमदार पुरुष गायकी त असे लडिवा ळ व हळुवार स्वर ऐकताना एकदम सुरेख रेशमी फीलिन्ग येते. जमुना किनारे अनेक गायकांनी गायले आहे. पण माझे हे फेवरिट आहे.

लॉकडाउन काळात राहुल ह्यांनी अनेक गाणी घरून अन प्लग्ड व्हर्जन्स गायली आहेत. ती ही सुरेख . ऐकताना कसे तरी गलबलल्या सारखे होते कधीकधी म्हणून फार ऐकत् नाही. पण त्यांचे घर व घरातले सामान, स्क्रीन प्रेझेन्स व मॅचु रिटी खूप काही सांगून जाते. जुन्या क्लासिक गाण्यांची नवी रूपे ऐकायला मिळतात.

राहुल जी सध्या गाणी upload करतो ती अगदी अगदी ऐकण्यासारखी असतात.महेश काळे ह्यांचं गाणं का कोणास ठाऊक मनापर्यंत पोहोचत नाही! हे सुरांनो ह्या गाण्याबद्दल लिहिलं आहे तर ते योजना शिवानंद ह्यांचंही खूप छान आहे(माझ्या माहितीप्रमाणे त्या अभिषेकी बुवांच्या शिष्या आहेत.

हे सुरांनो ... मूळ बंदिश बुवांनी जशी बांधलीय त्या परिघात राहून गायचे शिवधनुष्य ज्यांनी पेलायची हिम्मत केली त्यांनी ते बरंच चांगले गायलंय. मला देवकी पंडितचेही आवडते. खुद्द महेश काळेनेही ते बर्‍यापैकी गायलेले आहे त्याचे जुने व्हिडिओज यूट्यूब वर आहेत . पण डोक्यात हवा गेल्यावरती त्याने फ्युजन करायचे धाडस केले.

काल इथे रफीबद्दल वाचत होते आणि तिकडे राहुलने रफीचे 'दिन ढल जाये, हाय रात न जाये' अपलोड केले. नितांतसुंदर अनुभव!!

माझ्या आजोबांना नाट्य संगीताची खूप आवड होती. त्यांच्याकडे भरपूर कॅसेट्स होत्या. त्यात भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव यांचे गाणे असत. तेव्हा आजोबांनी त्यांचे गाणे लावले की आम्ही खूप ओरडायचो. मी ९-१० वर्षांची असताना ते गेले. त्यानंतर ते गाणे कित्ती वर्षं ऐकले नाहीत. इतक्यातच ऐकू लागले. आजोबांची खूप आठवण येते हे गाणे ऐकले की.
महेश काळे गायक म्हणून आवडण्यापेक्षा त्याच्या वेगळ्या आणि बोल्ड चॉइसेस मुळे जास्त आवडतो मला. हातात असलेली चांगली नोकरी सोडून usa मध्ये हिंदुस्तानी गाण्याचे क्लास आणि कार्यक्रम करायला guts पाहिजेत.

आस्वाद, असे करायला गट्स पाहिजेत हे खरे आहेच.

पण गाणे ऐकताना केवळ गाणेच ऐकले जाते. रियालिटी शो मध्ये हा गरीब तरी गातो म्हणून वाहवा करा, हा अपंग तरी गातो म्हणून वाहवा करा, हा अमुक, तो ढमूक तरी गातो व व अनंत प्रकार घडतात.

पण खऱ्या जगात ज्याचे गाणे कानाला गोड लागते त्याचीच वाहवा होते. कानाला खड्यासारखे बोचणारे गाणे काही काळ लोक सहन करू शकतात पण कायम नाही.

महेश काळे अजिबात वाईट नाही. मी काल त्याचे 3 वर्षांपूर्वीचे हे सुरांनो.... ऐकले, चांगला प्रयत्न केलाय.
फक्त त्याने स्वतःची कुवत ओळखून त्यात राहावे. लोक ऐकून घेतात म्हणून काहीही करणार हे करु नये. प्रयोग करायचेच असतील तर स्वनिर्मित गाण्यांवर करावे. जनमानसात मेरुदंड म्हणून स्थापित कलाकृतींना हात घालू नये हीच अपेक्षा.

प्रयोग करायचेच असतील तर स्वनिर्मित गाण्यांवर करावे. जनमानसात मेरुदंड म्हणून स्थापित कलाकृतींना हात घालू नये हीच अपेक्षा. >> पटलं.

पण मुळात इथे लोकं म्हणताहेत तसे मला महेश काळे undeserving नाही वाटले. अर्थात प्रत्येकाची चॉईस..

ऐकाहो तुम्ही बिनधास्त.... आपल्याला आवडते हाच एकमेव निकष लावून सगळे करायचे. बाकी लतालाही जिथे नावे ठेवली जातात तिथे महेश काळे कोण...

लॉकडाउन काळात राहुल ह्यांनी अनेक गाणी घरून अनप्लग्ड व्हर्जन्स गायली आहेत. ती ही सुरेख .
दाटून कंठ येतो, हमखास रडवणारे गाणे
>>> अमा अगदी अगदी….

मला देवकी पंडितांचे ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ आवडते. आणि प्रभा अत्र्यांचं ‘जमुना किनारे मेरो गाव’. आता मुकुल शिवपुत्रांच ऐकीन.

परवा ‘कानडा राजा पंढरीचा’ राहुल आणि महेश यांचं ऐकलं. मला राहुल फार भावले.

आता अभंगांवर चर्चा चालू आहे म्हणून थोडं अवांतर -
किशोरी आमोणकरांचे ‘अवघा रंग एक झाला’ आणि ‘बोलावा विठ्ठल’ माझ्यासाठी ऑल टाईम फेवरीट

आठवण करून दिलीत तसे लगेच बोलावा विठ्ठल ऐकले.. कसला स्वर्गीय दैवी आवाज आहे, स्वच्छ निष्कलंक झळाळते सोनेच जणू..

कधितरी पहाटे, बाहेरील सर्व आवाज बंद असताना बोलावा विठ्ठल लावते.. खूप छान वाटते.

जमुना किनारे मोरा गांव, वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, हो अनेक दिग्गजांनी गायलंय.
प्रभा अत्रे, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व या तिघांचीही व्हर्शन आवडतात. कुमारांचे व्हर्शन त्यातल्या त्यात अधिक. युट्युबवर ते गाताना व्हिडीओ पण आहे. शिवाय हे एक सिनेमात रवींद्र साठे यांनी सुद्धा गायलंय. सिनेमासाठी बदल केलेत पण मला ते सुद्धा खूप आवडलेय.

अभंगावरून ...कुमारजी न चे निर्भय निर्गुण अतिशय च आवडते...राहुल ने पण खूप सुंदर म्हणाले आहे..राहुल चा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकायला मिळाला होता .खूप खूप नम्र आहे..लोकांच्या फर्माईशी पूर्ण केल्या त्याने..कोणताही भपका नव्हता ..

असे कार्यक्रम करत हिंडण्यापेक्षा एखाद्या चांगल्या गुरूचे पाय धरून शिक्षण सुरू ठेवल्यास त्याचेच कल्याण होईल. आणि अभिषेकीबुवांचं नाव का खराब करतोय हा? साधे सूर नीट पेलवत नाहीत आणि गुरूंचं नाव घेऊन त्यांची बदनामी का करतो? अभिषेकीबुवां कडे फारतर एखाद वर्ष शिकला असेल. त्या पुण्याईवर ....
अतिशय चीडचीड होते याचं नाव काढलं की.

नवीन Submitted by अंजली on 12 June, 2021 - 20:34
>>> कोणते गाणे ऐकले...

राहुल देशपांडे ऐकायचा प्रयत्न केला... किशोर चे इस मोड से जाते है.. अजिबात आवडले नाही...
लोक खोटी स्तुती फार करतायत पण कमेंट मध्ये...

खरे सांगायचे तर महेश काळे खुपदा आरडाओरडा आणि कर्क्श वाटतो,
राहुल देशपांडे पण तसाच
खरे अनेक हिरे अजुन प्रकाशित झालेलेच नाहीत

उदाहरणार्थ संदीप रानडे यु ट्यूब वर शोधुन पहा, या सगळ्यांना खाऊन टाकतो तो, बहुतेक तोही अमेरिकेतच आहे

म का सुरुवातीला ऐकला. बरा वाटला. इथे त्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली नव्हे अवाच्या सव्वा पैसे देऊन ती प्राप्त करून घेतली. त्यात त्याने तासभर मोरया मोरया केलं, प्रेक्षकांकडून करून घेतलं... अनेक लोक तेव्हाच उठून गेले होते... उरलेल्या वेळात त्याचे स्व ला करणारे बोलणे आणि काही गाणे ऐकून परत आलो ते यापुढे कोणत्याही प्रकारची मैफिल attend करायची नाही असे ठरवूनच! असाच एकदा रा दे पण आला होता तेव्हा पण काही च्या काही पैसे देऊन गेलो होतो. रा दे चा आवाज मला आवडतो, त्याच्याकडे आजोबांकडून आलेली कला आहे. मात्र त्यानेही त्याच्या या कार्यक्रमात स्वतःच्या फिल्मचा प्रोमो दाखवून, उगाचच टाइम किल करायला लोकल कलाकारांना गिटार वगैरे वाजवायला लावून भ्रमनिरास केला होता. तेव्हापासून कानाला खडा लावला!
म का पंडित अभिषेकी बुवांकडे फार काळ शिकला नसावा. एखाद्या बुवांकडे शिकणे म्हणजे किमान 15 वगैरे वर्ष पूर्ण वेळ शिकणे. पण याच्या time lines बघता ते खरे वाटत नाही.

रा दे ने एव्हढा भ्रमनिरास करूनही मी त्याला ऐकत राहिले पण मागच्या वर्षी लोकडाऊन मध्ये त्याने जो गाण्याचा रतीब लावला होता, त्यात त्याच्या मुलीला उगाचच मध्ये मध्ये करू द्यायचा ते पाहून त्याला सरळ unfollow करून टाकलं. मुलगी गोड आहे त्याची पण तरी किती काळ तिला सहन करणार?

होपफुली, त्यांचे PR हे वाचत असावेत!

कानडा राजा पंढरीचा ऐकलं महेश काळेचं ,, नाकात'च' गातो तो. अरूणी किरणी चांगले गायले त्यापेक्षा‌ . मला नाकात गाणारे लोकं इरीटेट होतात. मंजूषा कुलकर्णी पण चांगलीये पण हेच, नाकात गाते कधी कधी फार.

प्रयोग करायचेच असतील तर स्वनिर्मित गाण्यांवर करावे. जनमानसात मेरुदंड म्हणून स्थापित कलाकृतींना हात घालू नये हीच अपेक्षा +११

लोक खोटी स्तुती फार करतायत पण कमेंट मध्ये...>>> करू देत च्रप्स, तुम्ही खरी करा. असाही तुमचा प्रत्येक प्रतिसाद बाकी सगळ्यांमध्ये ऑड मॅन आऊट च असतो, तर खराच असेल,, Happy

Pages