Submitted by अनन्त्_यात्री on 11 June, 2021 - 02:10
ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"
तीन मितींची अभेद्य कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"
तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी डळमळते मन
उनाड भटकी पायवाट मग
खेचून म्हणते,"सुटका नाही"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरोखर.... सुटका नाहीच...
खरोखर.... सुटका नाहीच...
अतिशय सुंदर....
___/\___
धन्यवाद शशांकजी!
धन्यवाद शशांकजी!
सुंदर.
सुंदर.
तुमच्या कविता नेहमीच आवडतात.
सुंदर !
सुंदर !
हीरा, साद प्रतिसादांबद्दल
हीरा, साद प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
नेहमीप्रमाणे सुंदर रचना...!
नेहमीप्रमाणे सुंदर रचना...!
धन्यवाद रूपाली.
धन्यवाद रूपाली.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
ShabdVarsha धन्यवाद
ShabdVarsha धन्यवाद