कथा ते पटकथा कशी लिहावी? माहिती हवी आहे.

Submitted by सुर्या--- on 2 June, 2021 - 04:42

कथेचं पटकथेत रूपांतर करण्यासाठी काय करावं लागत? पटकथा कशी लिहावी? पटकथा लिहिण्यासाठी सुनिश्चित फॉरमॅट कोणता असावा? पटकथा किती PAGES ची असावी? या सर्वांची माहिती हवी आहे. जमल्यास उदाहरणासहित सांगावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जंगी काम दिसतंय. कुठला चित्रपट येतोय का ? हिंदी कि मराठी ?
तुमच्या बद्दलचा आदर द्विगुणीत झाला आहे. मायबोलीवर आल्याबरोबर एक धार्मिक विज्ञानकथा लिहून सर्वांना वेड लावले. हा कोण लेखक असा प्रश्न पडला असतानाच पुस्तक प्रकाशित झाले आणि आता थेट पटकथा !!!
जबरदस्त !!!!
तुमचे मनःपूर्वक कौतुक आणि येणा-या चित्रपटाला सुपर डुपर यश मिळावे या हार्दीक शुभेच्छा !

>> तुम्ही नेटवर शोधलं असेलच. त्यावर काय सापडलं? त्यापेक्षा वेगळं अपेक्षित आहे का?

सहमत आहे. नेटवर याबाबत भरपूर व इत्यंभूत माहिती आहे. पटकथा लिहिण्यासाठीचे एडिटर (सॉफ्टवेअर) पण आहेत. गुगल युट्युबवर शोधा. इतकेच काय हॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांच्या पटकथा उपलब्ध आहेत. चित्रपट सुद्धा उपलब्ध आहेत. दोन्हींचा मेळ घालून अभ्यास करू शकता. स्क्रिप्ट मध्ये लिहिल्याबरहुकूम संवाद आणि दृश्ये असतात. फारच रोचक वाटते हे पडताळून पाहताना. अनेक वर्षांपूर्वी छंद म्हणून केले होते. आता तर नेटवर अजून जास्त माहिती व साधने उपलब्ध झाली असतील.

शुभेच्छा!

@पारंबीचा आत्मा
साहेब धन्यवाद... प्रयत्न करतोय.

@Srd & @अतुल
नेट वर शोध चालू आहेत. you tube सुद्धा पहिले. पण हवं तस मटेरियल अथवा मार्गदर्शन मिळत नाही.
व्यवस्थित समजू शकेल असं कुठे सापडलं नाही. म्हणूनच हा धागा बनवला. ज्याचे त्याचे अनुभव आणि knowledge वाचायला शिकायला मिळतील.
थोडे फार उदाहरण मिळालेच तर अतिउत्तम.
मराठी आणि इतर फिल्म्स मध्ये बराच अंतर असतो. त्यामुळे मराठीमध्ये मिळाले तर खूप चांगले.

मायबोलीवर आल्याबरोबर एक धार्मिक विज्ञानकथा लिहून सर्वांना वेड लावले. हा कोण लेखक असा प्रश्न पडला असतानाच पुस्तक प्रकाशित झाले आणि आता थेट पटकथा !!>> +१११
तुमचा प्रवास कौतुकास्पद आहे. तुमचे अभिनंदन‌ आणि मनापासुन शुभेच्छा.

गदिमांचे अनुभव मजेदार होते. त्यांना पटकथा लिहायला सांगितली. पहिलाच प्रयत्न, लिहिली. दिग्दर्शक म्हणाले अहो वर्णन करू नका. सुंदर लिहा. बाकीचं क्याम्रा दाखवणार आहे.
पुढची कथा त्यांना अजिबात आवडली नव्हती तरी लिहिली निर्मात्यास हवी तशी. पिच्चर चांगले चालले. कौतुक झाले पण गदिमांचे मन त्यात नव्हते. भयानक घटना, व्यभिचार नी काय काय. पण ओर्डरचे काम करून दिले, गीते लिहिली. हिट्ट काम झाले होते. पयशे मिळाले. मग त्यांनी स्वत:च कथा,पटकथा आणि पिच्चर काढला. दाणकन आपटला. हे सर्व चरित्रात आहे.

तर थोडक्यात म्हणजे मागणी तसा पुरवठा करा. फार्मुला असा नाही.

मराठी मालिकांसाठी? इकडे एकत्र कुटुंब पद्धतीचे गोडवे गायचे एका एपिसोडात आणि उरलेल्या एकुणपन्नासांत हाणामारी, राजकारण, दोन बायका, आणि एक नवीन म्हणजे प्रत्येक साधीसुधी नायिका बोर्ड ओफ डिरेक्टरला उभी राहिलीच पाहिजे.

>> मराठी आणि इतर फिल्म्स मध्ये बराच अंतर असतो. त्यामुळे मराठीमध्ये मिळाले तर खूप चांगले.

तांत्रिकदृष्ट्या सर्व भाषांतील चित्रपटांसाठी पटकथेचा एकच फॉर्म्याट असतो. त्यात फारसा फरक नाही. हॉलीवूडचे चित्रपट याबाबत बरेच शिस्तबद्ध आहेत. यातले बरेचसे पायंडे त्यांनी पाडलेले आहेत. हिंदी व मराठीमध्ये सुद्धा त्यांचाच अभ्यास करूनच पटकथा लिहिल्या गेल्या आहेत / जातात. मुलभूत शिस्त तीच आहे. भाषा व इतर स्थानिक संस्कृतीनुसार होणारे बदल हा पुढचा टप्पा. पण मला अजूनही असे वाटते कि आपण एखाद्या प्रसिद्ध इंग्लिश चित्रपटाची (उदाहणार्थ Troy) पटकथा डोळ्यासमोर ठेवून तो चित्रपट काळजीपूर्वक (प्रसंगी काही दृश्ये रिपीट करून) पाहिल्यास त्यातून खूप खूप शिकायला मिळेल. शिवाय Script -> Storyboard -> Cinematography details. साधारणपणे अशा टर्म्स गुगल वर शोधल्यास खूप सारी माहिती मिळेल. काही तास (किंवा दिवस) खर्च करून एकदा हा सगळा पाया तयार झाला कि वरती भरत यांनी दिलेल्या किंवा तत्सम कार्यशाळा मध्ये भाग घेतल्यास ते पट्कन आत्मसात करता येईल (हेमावैम)

शुभेच्छा!

लेखक राजन खान पटकथा कशी लिहावी याची कार्यशाळा घेतात. फेसबुकवर राजन खान / मोहिनी कारंडे या नावाने शोधा.

मराठी आणि इतर फिल्म्स मध्ये बराच* अंतर असतो. त्यामुळे मराठीमध्ये मिळाले तर खूप चांगले. >>>भाषेगणिक पटकथा बदलते का ?
तुम्हाला पटकथालेखक व्हायचे असेल तर मनापासून शुभेच्छा !
* बरेच असा शब्द हवाय का तिथे ?

@बोकलत @वीरू @srd धन्यवाद.

@भरत मी लिंक पहिली. धन्यवाद. वल्लरी मॅडम शी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन.

@अतुल धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत. मी अभ्यास कारेन यावर.

@रानभुली धन्यवाद. मला वाटतंय "बराच" हा शब्द एकवचनी येईल. "बरेच" हा अनेकवचनी वाटतो. तरीही चुकत असेल तर सांगत जा.

मराठी आणि इतर फिल्म्स मध्ये बराच* अंतर असतो.मला वाटतंय "बराच" हा शब्द एकवचनी येईल. "बरेच" हा अनेकवचनी वाटतो.>>>

अंतरअसतो नाही तर अंतर असते. बरेच अंतर म्हणजे जास्त अंतर. तिथे बराच हा शब्द वापरणे चूक आहे.

पटकथा लेखनासोबत कृपया भाषेचाही अभ्यास करा. उद्या तुमचा पटकथा लेखनाचा व्यवसाय धोधो धावू लागला तर उगीच चुकीचे शब्दप्रयोग समाजात रूढ व्हायला नको. Lol

The departed 2006 या चित्रपटाची पटकथा वाचा, तिचा अभ्यास करा. त्यानंतर इतर चित्रपटांचे स्क्रीनप्ले मिळवा, वाचा, अभ्यासा. इथे सिटिझन केन आणि पल्प फिक्षण, इत्यादी मुव्हीज महत्त्वाचे आहेत. इतरही नावे कळतीलच. स्क्रीनप्ले अभ्यासून ते चित्रपट पुन्हा नव्याने पहा. कालच मी एक चित्रपट पाहिला Their Finest 2016, अभ्यासाबाहेरची एक्स्ट्रा ॲक्टीव्हीटी म्हणून पाहायला चांगला आहे. स्क्रीनप्लेला डेडीकेट अशा साईट्स, युट्यूब चॅनल आहेत ते पहा. हे सगळं नेटवर खरेच भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, सापडेल. जर या सगळ्याचा आळस असेल तर एखादी कार्यशाळा जॉईन करून पहा किंवा छोटे मोठे कोर्स असतात ते करायचे जमवा. हे कोर्स आणि कार्यशाळा वगैरे करून गरजेच्या तांत्रिक गोष्टी कळतील मात्र पुन्हा वरच्या गोष्टी कराव्याच लागतील. Wink

फिल्मी, मस्त टिप्स आहेत.
पटकथा कार्यशाळा हल्ली बर्‍याच आहेत.
जमलं तर मायबोलीवर कविन आयडी आहे तिला इथे लिहायला सांगता येईल.तिची शॉर्ट फिल्म ची लिहीलेली पटकथा जवळ जवळ काहीही बदल करावे न लागता एक उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनलीय.

@Filmy
खूप छान माहिती दिलीत. मी you tube आणि google वर माहिती मिळवत आहेच. त्याव्यतिरिक्त इथे suggest केलेल्या गोष्टी देखील पाहणार आहे.

कथा ते पटकथा कशी लिहावी? >>>
ह्या बद्दल काहीही माहीती नाही. पण मलाही अशी माहीती वाचायला आवडेल.

मी you tube आणि google वर माहिती मिळवत आहेच. >>>
त्याच्या लिंक्स इकडेही द्या. एक छान संकलन तयार होईल आणि इतरही कुणाला उपयोगी पडू शकतील.

धन्यवाद अनु Happy

पटकथेचा फॉर्मॅट/ फॉर्म्युला याबद्दल मला काही माहिती नाही. मी एकच प्रोजेक्ट केला आहे आणि तो देखील माझ्याच कथेवर शॉर्टफिल्म करायचे ठरल्यावर त्याची पटकथा मी लिहून काढली इतकाच अनुभव आहे माझ्यापाशी.

पण तो प्रोजेक्ट देखील आम्हीच मित्र मंडळींनी मिळून केला आहे. तेव्हा आम्ही सगळेच नवखे असल्याने शूट करण्यासाठी कथेला कसे तुकड्या तुकड्यात प्लॉट म्हणून सादर करता येईल जेणेकरून शुटींग सोपे होईल आणि कथालेखक म्हणून अपेक्षित असलेलाच इंपॅक्ट त्या त्या सीनमधून येईल हेच फक्त बघितले होते मी.

रवि आणि सायली मठाधीकारी हे पतीपत्नी मायबोलीकर आहेत आणि ते रविंद्र आर्ट्स बॅनरखाली स्वतः शॉर्टफिल्म्स करतात. त्यांचा सल्ला मला हे पटकथा/स्क्रिप्ट लिहीताना उपयोगी पडला होता.

कौतुक शिरोडकर (मायबोलीकरच आहे)
वल्लरी (आयडी वेल)
रवी आणि सायली मठाधिकारी
हे सगळे याबद्दल व्यवस्थीत माहिती देऊ शकतील. त्यांना अनुभव आहे या प्रकारच्या लेखनाचा

मी जे लिहून काढलं होत ते काही स्टॅन्डर्ड फॉर्मॅट मधलं पटकथा लेखन नव्हतं

ते पटकथा (स्क्रिप्ट) + स्क्रिन प्ले दोन्ही कंबाईन होतं

पण कदाचित दोन्हीत काही कॉमन पॉईंट्स असू शकतील

कथा हि सांगण्याची प्रोसेस आहे तर पटकथा ही कथा दाखवण्याची प्रोसेस आहे

म्हणजे story tells us about event and script shows us that event

कथेला छोट्या छोट्या सीन मधे विभागून प्रत्येक सीन कसा कुठे घडणार आहे त्यात कोण आहेत आणि कसे अपेक्षित आहेत व सीनचा मूड काय आहे हे अगदी शॉर्ट मधे लिहून खाली ॲक्च्युअल सीन काय आहे ते लिहून काढणं. बस मी इतकच केलं होतं

सीन बाय सीन कथा जशी दिसणं अपेक्षित आहे तशी लिहून काढली. प्रत्येक सीनचा मुड, प्रत्यक्ष काय घडत ती घटना लिहून काढली.

रेफरन्स साठी अगदी त्या सीनमधल्या कॅरेक्टर्सचे कपडे उठणे बसणे दिसणे सगळे जे अपेक्षित आहे ते थोडक्यात लिहीले होते मी. म्हणजेच मी पडद्यावर कथा ज्या सिक्वेंसने आणि जशी दिसेल ते छोट्या छोट्या सीनमधे लिहून काढले होते.

हा असाच फॉर्मॅट असतो का वगैरे माहिती नाही मला. पण अस लिहील्याचा फायदा शूट करताना नक्कीच जाणवला होता.

तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्छा!! तुम्ही पटकथा लिहीलीत तर इथे जरूर शेअर करा त्याबद्दलच्या टिप्स. त्याचा नक्कीच फायदा होईल सगळ्यांनाच

उदाहरण म्हणून तुमच्या इटगर कथेचा फक्त पहिला भाग जर बघितला पुढल्या कथेचा ट्रेलर म्हणून

तर त्यात त्या दोघांचे लग्न, गावाबाहेर असलेल्या घरात संसार थाटण, त्याच्या लिखाणाच्या दोन डायर्‍या, तिचं गर्भार असणं, त्याचा अपघात आणि त्यात म्रुत्यु, तिची दोन मुलं, मुलाचं स्वप्न बघणं, तेच स्वप्न खरं होणं, त्याबद्दल तो बोलणं

अशा घटना दिसतात (अजूनही असतील मी ढोबळ लिहीतेय)

यातल्या घटना कागदावर लिनिअर दिसल्या तरी पडद्यावर दाखवताना काही घटना या बॅकराउन्डला दिसणार आहेत त्यासाठी सेपरेट सीन लिहायची गरज नाही पडणार असे आपले मला वाटले,

कदाचित उत्सुकता कॅच करायला मुलाच्या स्वप्नापासून सुरवात होईल. मग फ्लॅशबॅकने मुलाच्या वडिलांचा अपघात आणि त्यानंतर आईने कसे वाढवलेय ते येईल. सेकंड लास्ट सीनमधे तो प्रत्यक्ष गणपतीतला अपघात (स्वप्न खरे होणे) सीन येईल आणि लास्ट सीन नुसत्या त्या दोन डायर्‍या आणि वडील आणि आता मुलाभोवतीचं (स्वप्न खरंहोण्यातल किंवा तत्सम) गुढ येईल

तुम्ही लिहीलेल्याचं visual जर दाखवायचे असेल तुम्हाला ट्रेलर स्वरुपात तर तुम्ही त्या कथेचा सिक्वेन्स काय ठेवाल? कोणत्या घटना दाखवाल? कशा दाखवाल? हे सगळं मला वाटतं स्क्रिप्टचा/ पटकथेचा भाग असेल

१.याची कार्यशाळा
अभिराम भडकमकर -मटा संपर्क
८६६८३३६७६८

पटकथा लेखन कुठं पर्यन्त आले ?

(सोपपाय राव,
नटरंग कादंबरी वाचा, अन मग सिनेमा बघा, पटकथा अभ्यासा.
शाळा कादंबरी वाचा, अन मग सिनेमा बघा, पटकथा अभ्यासा.
जैत रे जैत कादंबरी वाचा, अन मग सिनेमा बघा, पटकथा अभ्यासा.
दुनियादारी कादंबरी वाचा, अन मग सिनेमा बघा, पटकथा अभ्यासा.
‘निशाणी डावा अंगठा’ वाचा, अन मग सिनेमा बघा, पटकथा अभ्यासा.

एवढा पटकथा अभ्यास पुरेसा आहे तुमच्या साठी !

व्यंकूची शिकवणी कथा... लेखक द.मा . मिरासदार...वाचा आणि z मराठीचा कथाकथी video पहा.
https://youtu.be/gF1REqdxtsg
तुलना करा..कथेची पटकथा कशी झाली ते कळेल.
कथा धिंड...लेखक शंकर पाटील
Video ... दूरदर्शन सह्याद्री...
https://youtu.be/CJ6ZIAsXZ1Q

अशा खूप छान कथा आहेत...