दिव्यभद्र

Submitted by _आदित्य_ on 24 May, 2021 - 07:46

बेभान सुटलो प्रकाशापरी मी
कुणाचे मला भान आहे कुठे?
असा चंद्र गेला असा सूर्य गेला
नी वेगास ही घाम आता फुटे !
स्पर्धा जरा फक्त वाटे मनाशी
मी त्यालाही हरवेन केव्हातरी !
अंगी लहरते अशी कुंडलीनी
तिच्या कारणे मोहमाया सुटे !

काळास ही मी जखडले आताशा
नी तोडून केले तया पांगळे !
जाताच त्रेतायुगी राम दिसला
न दिसली परी कोणतीे देऊळे !
आता युगे पाहिली सर्व आणिक
सगळी महामाणसे भेटली !
शिरलो जरी आत इतका तरी खोल
उरतेच अवकाशभरले तळे !

मला ही न कळले कसा मी बुडालो
अति खोल त्या कालरुद्रामध्ये !
कसाकाय आलो अकस्मात इथल्या
मी प्रतिबिंबल्या घनसमुद्रामध्ये !
हे काय झाले मला पृथ्वी दिसली
नी भेटून आलो मी दुसऱ्या मला !
अति वेग योगे विखुरले अणू अन
मी शून्यावलो दिव्यभद्रामध्ये !

-आदित्य

Group content visibility: 
Use group defaults