खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माबोवरचाच ग्रीन राईस. Happy
Screenshot_20210530-080205_Gallery_0.jpg

द्या आता मिसळपाव. किंवा केकही चालतीय , दोन्ही तर धावेल. Happy

झणझणीत मामलेदार स्टाईल तर्री मिसळपाव
आणि तोंड गोड करायला चोको लावा केक्स.. प्लेन आणि विथ क्रीम.. वाटून घेऊ शकता... Happy

1622382032274.jpg
.
1622382139379.jpg
.
1622382186064.jpg

हो सोनाली, ते माझे सवयीचे आणि आवडीचे ताट आहे. अजून दोनेक वर्षे दिसले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. आता ते तुटेफुटेपर्यंत माझ्याकडून वापरले जाणार. एक लळा लागला एखाद्या वस्तूशी की माझे असे होते. छान विषय आहे हा नवीन धाग्याला, काढायला हवा उद्या परवा Happy

अजून दोनेक वर्षे दिसले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका>> नाही वाटणार आश्चर्य Happy माझ्या डिनर सेटला १२ वर्ष झालीत. पडतील-फुटतील म्हणून ३-४ ताटे जास्त घेऊन ठेवली होती. रोजचा वापर असूनही अजून शाबूत आहेत.

पिज्झा फार टेंम्पटींग दिसतोय. टू ईन वन आहे वाटते ..
मला जमणारा अजून एक घरगुती पदार्थ Happy

कीचनमधली शेगडी पण Happy >>> ताज्या अन्नाचे गरमागरम फोटो शेअर करायचे असतील तर त्याला पर्याय नाही Happy

मोक्षू मँगो कोकोनट बर्फी रेसिपी द्या ना.>>>खूप सोप्पी recepie आहे सियोना...
साहित्य:
2 वाट्या आंब्याचा रस
1 वाटी मिल्क पावडर
1 वाटी खोबरा किस
1 वाटी साखर
कृती :
आंब्याचा रस कढई मध्ये टाकून थोडा घट्ट होऊ द्यायचा त्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर, खोबरा कीस आणि साखर टाकून एकसारखे ढवळत राहायचं. थोडी विलायची पावडर टाकायची.. साधारण घट्ट गोळा झाल्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर ताटाला तूप लावून त्यावर थापून घ्यायचा.. आणि त्यानंतर फ्रीजमध्ये सेट व्हायला अर्धा - एक तास ठेवून द्यायचे बाहेर काढल्यानंतर बर्फी पाडायची... खूप चविष्ट बर्फी होते..

भाकरी, भरीत , खोबर्याची चटणी आणि कच्चा कुस्करा( म्हणजे पोळी चुरा करून घ्यायची आणि कांदा, कोथिंबीर, तिखट- मीठ -साखर वरून घालायचं आणि मिरची ची फोडणी)
Screenshot_20210602-222657.jpg

कांदा टोमॅटो उत्तप्पा विथ चटणी

Screenshot_20210602-222803__01.jpgScreenshot_20210602-222740.jpgScreenshot_20210602-222907.jpg

हो.

केक सगळे मस्तच...

प्राजक्ता तू तर एकदम सुगरण आहेस ...

मानवजी... मस्त पौष्टिक नाश्ता...

प्राजक्ता, उत्तपा, डोसे, चटणी सगळंच मस्त.
हे सगळं विनसायास (म्हणजे स्विगी, झोमॅटो नव्हे घरचं )खायला मिळण्यासाठी कोणती पूर्वपुण्याई घेऊन जन्माला यावं लागतं म्हणे खिक्क Happy

मानव - पिळी शोळी Happy त्याचाच केला होता कुस्करा.
रुपाली, रुचा ठांकू!
तो कच्चा कुस्करा भाकरी चा केला तर अमेझिंग लागतो. त्या वर दही घालून.

Pages