नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .
मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/ आवड आहे .
गेली ४ वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे , आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.
ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक https://youtu.be/7KwhDAbhBG0
चॅनेलची लिंक https://www.youtube.com/channel/UCdL9VHNN43PeoJoW2u0Y3cA
मराठी प्लेलिस्टची लिंक
https://www.youtube.com/playlist?list=PLyRWSjr-0OBCey0DLCg-4a9ahm59PbiOz
आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे , जी सामान्यांना परवडणारी नाही, अन खेडयांत आणि छोट्या शहरांतही असे क्लासेस नाहीत .
दुसरे म्हणजे सहसा जर्मन ही इंग्रजीमधून शिकवली जाते .त्यामुळे बर्याच जणाना ती अवघड वाटते . त्याउलट मराठी आणि जर्मन भाषेमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत , त्यामुळे आपण मराठीतून जर्मन सोप्या पद्धतीने शिकू शकतो , आणि म्हणूनच मी हे चॅनेल सुरू केले आहे .
सध्या मी पहिले ९ व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि दर आठवड्याला नवे १ ते २ व्हिडीओ मी अपलोड करणार आहे. जर्मन भाषेतील अत्यंत महत्वाच्या बी १ ( तिसर्या) परीक्षा लेव्हल पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करण्याचा माझा मानस आहे .
तरी माझी विनंती आहे की तुम्ही वरील चॅनेलला SUBSCRIBE करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्यांना ज्याना जर्मन शिकायची इच्छा आहे त्याना हा मेसेज फॉरवर्ड करा . आणि जर तुम्ही एखाद्या शाळेचे किंवा कॉलेजचे शि़क्षक / प्रतिनिधी असाल तर तुम्ही मला WhatsApp वर +49 17673915195 या क्रमांकावर संपर्क साधू शकता , मी तुमच्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून एक छोटा ऑनलाईन क्लास विनामूल्य घ्यायचा प्रयत्न करेन.
पुन्हा एकदा , ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि ते साध्य करण्यास तुम्ही माझी मदत करावी अशी माझी विनंती आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप : जर हा धागा मायबोलीच्या नियमात बसत नसेल तर क्षमस्व . मी तो काढून टाकेन .
धन्यवाद Manoman , नानबा ,
धन्यवाद Manoman , नानबा , जाई, मेधावि , मंजूताई , दिपाली
दान्काशून
दान्काशून
Bitte निलिमा !
Bitte निलिमा !
छान! विनामुल्य शिकवता आहात हे
छान! विनामुल्य शिकवता आहात हे पाहून आनंद वाटला.
धन्यवाद जिद्दु
धन्यवाद जिद्दु
स्तुत्य उपक्रम
स्तुत्य उपक्रम
मी सबस्क्राइब केलेय,
मला मराठी , इंग्रजी व तोडकीमोडकी हिंदी येते. जर्मन भाषा शिकायला आवडेल
एक शंका, जर्मन भाषा शिकल्यास इतर यूरोपीय भाषा शिकणे/समजणे सोपे होईल का? असल्यास कितपत?
2 व्हिडिओ पाहिले, मस्त आहेत.
2 व्हिडिओ पाहिले, मस्त आहेत.
तुम्ही म्हणता की जर्मनमध्ये लिहू तसेच उच्चार असतात. पण तुम्हीच en चा उच्चार वेगवेगळा केला आहे. गेहेन मध्ये एन असा उच्चार आणि त्रिंकन मध्ये अन असा उच्चार. लिहिल्याप्रमाणे त्रिंकेन असं होत नाही का?
धन्यवाद MeghaSK , हरचंद पालव
धन्यवाद MeghaSK , हरचंद पालव
तो उच्चार एन आणि अनच्या मधे आहे.
Nature : नेचर (इंग्रजी) , नाटुर (जर्मन) हा फरक आहे.
केदार, अभिनंदन यासाठी की
केदार, अभिनंदन यासाठी की विडिओ बनवून यु ट्यूबवर टाकायचे किचकट काम तुम्ही प्रेमाने केलेत.
आता आय आय टी चेन्नई पण यु ट्यूबवर जर्मन शिकवतेय. (म्हणजे किती विद्यार्थी अमेरिका सोडून यूरोपीयन एज्युकेशन मार्केट धुंडाळताहेत याची कल्पना येते). त्यांचा कोर्स नुकताच सुरू झालाय…
https://youtube.com/playlist?list=PLyqSpQzTE6M9JyZwer9Z6C8BfbGCWeWJK
आज सामना मध्ये केदार ची बातमी
आज सामना मध्ये केदार ची बातमी आहे.
अभिनंदन केदार. खूप खूप
अभिनंदन केदार. खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन केदार. खूप शुभेच्छा.
अभिनंदन केदार. खूप शुभेच्छा.
फारच स्तुत्य उपक्रम. खूप खूप
फारच स्तुत्य उपक्रम. खूप खूप शुभेच्छा, केदार.
श्री श्री केदार यांस
श्री श्री केदार यांस त्यांच्या नवीन यूट्यूब channel साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
10 Million Subscribers यशस्वी भव
जर्मन शी काही तसा संबंध
जर्मन शी काही तसा संबंध नसल्यामुळे आधी इथे डोकावले नव्हते. आता वाचले. मराठीतून शिकायला नक्कीच सोपे जात असेल. आणि सातत्याने हे करायचे म्हणजे डेडिकेशन आणि एफर्ट्स पण खूप असणार हे जाणवले. तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
पहिला भाग बघायला घेतला.मस्त
पहिला भाग बघायला घेतला.मस्त सांगितले आहे.मुख्य म्हणजे जर्मन आणि मराठी व्याकरणातली साम्य दाखवून इंटरेस्ट पक्का केला आहे.
नातेवाईकांनाही सुचवला.असे चॅनल, माहिती स्रोत गावोगावी सर्व आर्थिक वर्गातल्या मुलांना मिळावे.चांगलं काम करताय.
धन्यवाद साधना, mi_anu
धन्यवाद साधना, mi_anu ,विक्रमसिंह , सियोना, मामी ,सैंया बेईमान , maitreyee , प्रणवंत !!
असे चॅनल, माहिती स्रोत
असे चॅनल, माहिती स्रोत गावोगावी सर्व आर्थिक वर्गातल्या मुलांना मिळावे.
>> हो mi_anu , हाच माझा उद्देश आहे
2 जानेवारी 2021 रोजी मराठीतून
2 जानेवारी 2021 रोजी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी मी हे चॅनेल सुरू केले. या चॅनेलला प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्याबद्दल आपणा सगळ्यांचे मनापासून आभार !
आजपर्यंत हजारो लोकांनी या चॅनेलच्या माध्यमातून जर्मन शिकायला सुरूवात केली आहे आणि या चॅनेलला लाखो Views आले आहेत.
मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आज मी जर्मन भाषेतील अत्यंत महत्वाच्या B1 (तिसर्या) परीक्षा लेव्हल पर्यंतचे 45 व्हिडीओज अपलोड केले आहेत.
महत्वाचे म्हणजे, ज्या पद्धतीने मी माझ्या फ्री ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवित होतो - आणि ज्याच्या मदतीने माझ्या अनेक विद्यार्थ्यानी यश मिळवले आहे - त्याच पद्धतीने मी माझ्या व्हिडिओजमध्ये शिकविले आहे.
त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही जर या व्हिडिओ च्या सहाय्याने अभ्यास केला आणि स्वतः फक्त रोज 5 वाक्ये बनवली , तर तुम्हीही जर्मन शिकू शकता .
तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, 2 जून पासून दर पहिल्या आणि तिसर्या बुधवारी, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9:30 वाजता मी Live येणार आहे . तसेच आवश्यकतेनुसार आणखी व्हिडिओजही अपलोड करण्याचा माझा मानस आहे.
पहिल्या एपिसोडची लिंक
https://youtu.be/7KwhDAbhBG0
मराठी प्लेलिस्ट (सर्व ४५ एपिसोड) ची लिंक
https://www.youtube.com/playlist?list=PLyRWSjr-0OBCey0DLCg-4a9ahm59PbiOz
जर तुम्ही एखाद्या शाळेचे किंवा कॉलेजचे शि़क्षक / प्रतिनिधी असाल तर तुम्ही मला WhatsApp वर +49 17673915195 या क्रमांकावर संपर्क साधू शकता , मी तुमच्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून एक छोटा ऑनलाईन क्लास विनामूल्य घ्यायचा प्रयत्न करेन.
केदार मी वालचंद मध्ये आहे,
केदार मी वालचंद मध्ये आहे, तुम्ही पण वॉलचंदचे काय?
थोर काम आहे तुमचे.
हो Sharadg . धन्यवाद !
हो Sharadg . धन्यवाद !
केदार, तुमची ही playlist आज
केदार, तुमची ही playlist आज 15 जणींना पाठवली.
त्यांच्या मुलींना शाळेतील शिकवलेले जर्मन अवघड वाटतेय. म्हटले की तुमच्या मराठीतून शिकवण्याच्या पद्धतीचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद धनवन्ती
धन्यवाद धनवन्ती
खरं तर मला तो एक खास
खरं तर मला तो एक खास whatsapp मेसेज करायचा होता - ही playlist पुढे 10 जणांना पाठवा तर तुमच्या मुलाला चांगले मार्क पडतील. अमक्यातमक्याने असे नाही केले तर त्याचे मार्क 91 वरून 19 झाले.. तमक्याअमक्याने हे डिलिट केले तर त्याला फायनल परीक्षेत जर्मन ऐवजी संस्कृत चा पेपर मिळाला....
Learn German through Marathi
Learn German through Marathi
हे नाव हवं चानेलचं. शोधायला सोपं.
खूपच उत्तम उपक्रम आहे.
खूपच उत्तम उपक्रम आहे. विद्यादान हे जे सर्वश्रेष्ठ दान असते, ते तुम्ही करता आहात. उपक्रम यशस्वी तर झाला आहेच. आता आणखी प्रगती होवो, दूर खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचो.
Pages