कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गावाकडचा भारत संकटात पटकन जुळवून घेतो. पण माझी ही समजूत पार मोडीत निघाली आहे.>> हे आजिबातच पटले नाही. जुळ्वून घेण्याला पण मर्यादा आहेत. गरीब अशिक्षित व रिसोर्सेस कमी अस्लेल्या एका समु हाला तो कितीही समजुत दार शहाणा असला तरीही आधाराची गरज आहे.

किमान आरोग्य सेवा, दळण वळन, सेवा, स्मशान भूमिची उपलब्ध ता, तिथे पण जळण असणे, हे काही फार अपेक्षा नाही. त्यात सगळे उगीचच हाय टेक करून ठेवले आहे त्यामुळे गरीब जनतेला आधार कार्ड डाउन लोड करता आले नाही तर डेथ सर्टिफिकेट नाही व्हॅक्सिन नाही.
रेशन नाही . फोन नसेल तर मुलांना शि क्षणाची सोय नाही. ह्यात ते किती व कसे तग धरून राहणार?

उच्चशिक्षीत पण जमीनीवरची माहिती व अनुभव नसलेल्या लोकांची मते का ग्राह्य धरायची.

"सो कॉल्ड" आरामाचे आयुष्य जगल्यानेच empathy, human rights किंवा पर्यावरणाला कसा धोका पोचतो किंवा कार्बन फुटप्रिंट वाढतो हे जरा विस्कटून सांगाल का? >> तुमच्या सो कॉल्ड आरामाच्या व्याख्या सांगा मग मी तुम्हाला त्याने पर्यावरणाला धोका पोहोचतो की नाही ते उलगडून सांगेन.
असं सरसकटीकरण करता येतं? >> नाही करता येत. पण हे माझ्या अनुभवावरून केलेले विधान आहे आणि ते योग्य नाही हेच मी मांडले आहे. माझा असा अनुभव होता की खेडेगावात अजूनही माणसांना आपल्या मर्यादांची चांगली जाणीव असते. निसर्गावर मात करू वगैरे आव न आणता त्याने दिलेल्या मर्यादा पाळल्या जातात उदाहरणार्थ, बिन मौसमी भाज्या खाण्याचा आग्रह न धरता मौसमात येणाऱ्या भाज्या खाणे. पण माझा हा गैरसमज आता दूर झाला आहे.

आधी तुम्ही अमेरिकेचा संदर्भ घेत भारतीय लोक कसे बेजबाबदार आहेत हे सांगितले. मग कुणीतरी ते खोडुन काढल्यावर आता गावातल्या लोकांच्या शहणपणावर शंका घेताय. >> याचा संदर्भ मला लक्षात आला नाहीये. त्यामुळे यावर काही बोलू शकत नाही.

मी स्वतः काय प्रयत्न करते यासाठी तुम्हाला माझा मोबाईल नंबर खाजगी संदेशातून पाठवण्याचा प्रयत्न केला पण तुमची ती सोय तुम्ही बंद ठेवली आहे. ती सोय सुरू केलीत तर मग नंबर पाठवते. मला फोन करा मग आपण सविस्तर बोलू. तुम्ही काय करता, आपण मिळून अजून काही करू शकतो का हे सारं आपल्याला बोलता येईल!

अमा, तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे. असलेल्या समस्यांशी अन्यायाशी जुळवून घेणे म्हणजे शहाणपण नाही.
शहाणपण म्हणजे संकटात असताना सांभाळून वागणे. या कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात गावांमध्ये लॉक डाऊन असताना देखील हजार पाने उठवून लग्न कार्ये, इतर कार्ये होत होती. तेव्हा कोरोना शहरात असल्याने आणि लॉक डाऊन असल्याने त्याचा लगेच परीणाम जाणवला नाही. पण जेव्हा लॉक डाऊन उठला आणि मग याच पद्धतीने सामुदायिक अनेक कार्यक्रम ग्रामीण भागात सर्रास होऊ लागले. लॉक डाऊन उठल्याने गावाकडे कोरोना झपाटय़ाने पसरला आणि बघता बघता दुसरी लाट आली जी खूप जीवघेणी ठरली. I am not blaming only the rural people. But they are already so resource-poor that even a tiny surge in the cases led to system collapse and casualties. अशावेळी मला वाटले होते की गावातली माणसे चांगले prevention measures घेतील. जसे सुरुवातीला काही गावांनी बाहेरच्या माणसांना यायला बंदी घातली होती तसे काही. पण everybody just let loose. That was disappointing and sad to see.

तिथे पण जळण असणे, हे काही फार अपेक्षा नाही. मुतदेह जाळणे आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
एकीकडे दफन न करता जाळणे याचा फायदा असा की जागा व्यापली जात नाही. दफनभूमीसाठीही झाडे तोडणे आले.
तर जाळण्यामुळेही लागणारे लाकुड आणि प्रदूषण आले.
या दोन व्यतिरिक्त अजून पर्यावरणस्नेही पर्याय आहे का? लोक त्याचा धर्मांवर घाला न समजता स्विकार करतील का?

everybody just let loose. That was disappointing and sad to see.>> काही ग्रामपंचायती आहेत अश्या ज्यांनी नीट वागून व सांभाळून इन्फेक्षन दूर ठेवले आहे. पण हे जेवणावळी झोडणारे समारंभ करणारे पण अपर क्लास लोक आहेत काहीही माहिती रिसोर्सेस नसलेले लोक आहेत जे हकनाक इन्फे क्षन पसरून मेले आहेत.

पाच मुली असलेला मार्जिनल शेतकरी ज्याचे ८४ वर्शाचे वडील वारले. त्यांना क्रियाक्र रम करायला पैसे नाहीत. सरकारी मदत नाही. त्यांनी देह वाळून पुरून टाकले . असे लोक आहेत. हे लेट लूज पब्व्लिक नाही. ह्यांच्या अडचणीच्या वेळी मदत उपलब्ध असणे आरोग्य सेवा उपलब्ध असणे ह्यावर त्यांचा हक्क आहे व होता पण सरकार ने पाने पुसली. कंप्लेंट केली तर केसच टाकल्या. अश्या परिस्थ्तीत ते नासमझ आहेत
असे वरून मत ठोकून देणे बरोबर नाही. प्रत्येक केस समजून घ्या.

या दोन व्यतिरिक्त अजून पर्यावरणस्नेही पर्याय आहे का? लोक त्याचा धर्मांवर घाला न समजता स्विकार करतील का?>> मी एकदा टिव्ही वर पाहिलं की हिमालयात काही गावात मेलेल्या माणासांना पुरत अथवा जाळात नाहीत. मृतव्यक्तीला व्यवस्थीत बांधून डोंगरात एका गुहेत ढकलुन देतात अन त्या गुहेच्या तोंडाला नंतर दगड लाऊन टाकतात.

शहराच्या ड्रेनेज सिस्टीम मुळे नद्या, नाले यांची हानी होते. सेप्टीक टँक्स मुळे जमिनीतले प्रवाह दूषित होतात. शहरालगत जेव्हां शहरीकरण वाढत होतं, तेव्हां लोकांनी जागा घेऊन घरं बांधली. ड्रेनेज नसल्याने सेप्टीक टँक्स आले. त्यानंतर त्या त्या भागात अनेक रोगांच्या साथी येऊ लागल्या. नदीत मैला सोडल्याने प्रवाहाच्या खालच्या गावांना ते पाणी कोणत्याच वापरासाठी अयोग्य झाले. या शिवाय त्या पाण्यामुळे वाढलेली रोगराई हा स्वतंत्र विषय आहे. याचे उत्तर पाण्याचे शुद्धीकरण करण्यात नाही.

पुण्यात आरटीओ जवळ एक केमिकल फॅक्टरी आहे. ती नदीच्या काठावर आहे. गेली कित्येक वर्षे रासायनिक पदार्थ नदीत सोडले जातात. नदीचे पाणी विषारी झालेले आहे. या कंपनीवर कारवाई होत नाही. प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करूनही फायदा होत नाही.
भारतातल्या सर्वच रासायनिक कंपन्या या सरकारात चांगले संबंध ठेवून असतात. त्यांनी नद्यांचे पाणी दूषित केलेले आहे. कार्ब एमिशन खेड्यातले लोक जास्त करतात याला कशाचाच आधार नाही. प्रदूषण करणा-या कारखान्यांचा डेटा प्रदूषण महामंडळाच्या वेबसाईटवर आहे. ९०% प्रदूषण हे घातक पदार्थांच्या निर्मितीमुळे होत असते. हे महामंडळ डेटा लपवण्यात वस्ताद आहे. प्रत्यक्षात किती प्रदूषण होते याचा डेटा स्वयंसेवी संस्थांनी केल्याशिवाय मिळणार नाही.
जिथे कारखाने नाहीत ते भाग ग्रीन झोन मधे आहेत. हिमायलातील राज्ये, भूतान हा देश, लडाख, सेव्हन सिस्टर्स हे विकासापासून दूर असल्याने शून्य प्रदूषणाचे प्रदेश आहेत.
एसी मुळे जे प्रदूषण होते ते गरीब लोकांमुळे नाही होत. एसीसाठी वापरले जाणारे गॅसेस हे पर्यावरणासाठी घातक आहेत. परदेशात त्यावर बंदी आहे. आपल्याकडे तशी बंदी यायला खूप उशीर झाला. घरगुती एसी मधे आता तसे गॅसेस नसतात. पण जेव्हां एसी प्लाण्ट्स उभारले जातात तेव्हां ते ब्रॅण्डेड ऐवजी लोकल (दिल्ली मेड) बसवण्याकडे कल असतो. कारण ते स्वस्त पडतात. हे लोक बंदी असलेले गॅसेस सर्रास वापरतात.
विकासामुळे पर्यावरण असे ओरबाडले जाते. ९०% प्रदूषण हे औद्योगीकरणाने होते. वाहनांनी होणारे प्रदूषण रात्री खाली बसते. त्याचा मनुष्याला थेट त्रास होतो म्हणून ते जाणवते. पण इतर ९०% प्रदूषण दिसत नाही. मूठभर लोकांमुळे ते होत असते. ते प्रभावी असल्याने ते चालूच राहणार.

मानव, हे दोन्ही दहन (अगदी लाकडे वापरून केले तरी) आणि दफन पर्यावरणस्नेहीच पर्याय आहेत माझ्यामते. दोन्ही प्रकारांत मानवी देह पंचतत्वात विलीन होतो. जिथे जी प्रथा अधिक शाश्वत होती तिथे ती प्रथा प्रचलित झाली असावी.
आत्ता हे जे कोरोनामुळे मृत्यूंचे भीषण प्रमाण दिसतेय त्यामुळे आपल्याला कदाचित असं वाटू शकतं.

मला वाटते जिज्ञासाला असं नाही म्हणायचेय की गावापेक्षा शहरी लोक बरे. शहरातल्या लोकांकडुन अपेक्षा नव्हतीच, गावातल्या लोकांकडून होती ती पण फोल निघाली असे त्यांना म्हणायचंय असे वाटते.

असो, हे फाटे फुटणारे मुद्दे वगळता मला जिज्ञासाचे पर्यावरण हानी बद्दल, आणि शाश्वत विकासाडे त्वरीत वळण्याबद्दल एकंदर म्हणणे पटते आणि कळकळ पोचते.
मी माझ्या परीने अत्यल्प बदल केले आहेत, करत आहे.

मानव, होय असंच काहीसं म्हणायचं आहे.
शहरातल्या किंवा एकूणच "आहे रे" वर्गाकडे संकटाला येनकेनप्रकारेण तोंड देण्यासाठी रिसोर्सेस आहेत नेहमीच असतात. पण "नाही रे" वर्गाकडे शक्य होईतो संकट येऊ न देणे एवढाच पर्याय हातात असतो. कारण जर संकट आले तर त्यांच्या कडे ना स्वतःचे रिसोर्सेस असतात ना व्यवस्था त्यांच्या बाजूने असते. अशावेळी छोट्या लोकसंख्येचा फायदा घेऊन शहाणपणाने काही नियम आखून संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता अजूनही भारताच्या खेड्यापाड्यात आहे असा माझा समज होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जे घडले त्याने तो पार मोडून गेला!

विधान कुणी केले हे जास्त महत्वाचे नाही. >> ओके. मी हे विधान केलेले नाही. खेड्यातील माणसाची जीवनशैली ही खूप कमी कार्बन फूटप्रिंट असलेली आहे. याचा अर्थ ती खूप भारी आहे, शाश्वत आहे आणि आपण सगळ्यांनी तसे जगायला पाहिजे असे आजिबातच नाही.

खेड्यात चुलीवर स्वयंपाक करतात त्यामुळे जंगलतोड होते, पर्यावरणाची हानी होते अशी एकांगी मतं मांडणारे लोक आहेत. ते उघड्यावर शौचास जातात इत्यादी. शहरातल्या मैल्यामुळे नदीचे कसे प्रदूषण होते याबाबत त्यांनी नाक, कान डोळे मिटून घेतलेले असतात. मी वैयक्तिक लिहीलेले नाही.
त्यामुळे त्या प्रतिसादात
खेड्यातील माणसाची जीवनशैली ही खूप कमी कार्बन फूटप्रिंट असलेली आहे. याचा अर्थ ती खूप भारी आहे, शाश्वत आहे आणि आपण सगळ्यांनी तसे जगायला पाहिजे असे आजिबातच नाही. याची आवश्यकता नाही. कारण पर्यावरणाच्या चर्चेत यावर सहमती होणे कठीण आहे. ते वैयक्तिक मत आहे इतकेच. ते खोडून काढण्यात रस नाही. जीवनशैली कुणाची काय असावी हे ज्याचे त्याने ठरवावे. पण पर्यावरणाच्या चर्चेत आपल्या जीवनशैलीमुळे हानी होते कि नाही हा मुद्दा टाळता येणार नाही.

<< शहरातल्या किंवा एकूणच "आहे रे" वर्गाकडे संकटाला येनकेनप्रकारेण तोंड देण्यासाठी रिसोर्सेस आहेत नेहमीच असतात. पण "नाही रे" वर्गाकडे शक्य होईतो संकट येऊ न देणे एवढाच पर्याय हातात असतो. कारण जर संकट आले तर त्यांच्या कडे ना स्वतःचे रिसोर्सेस असतात ना व्यवस्था त्यांच्या बाजूने असते. अशावेळी छोट्या लोकसंख्येचा फायदा घेऊन शहाणपणाने काही नियम आखून संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता अजूनही भारताच्या खेड्यापाड्यात आहे असा माझा समज होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जे घडले त्याने तो पार मोडून गेला! >>

------- सहमत....
आणि इथे " आहे रे " यांनी " नाही रेंची " थोडी तरी काळजी घ्यायला हवी... त्यांच्यासाठी जमेल तसे करावे.

याची आवश्यकता नाही. > हे मी सहमतीसाठी लिहिलेले नाही. याची आवश्यकता आहे कारण कमी कार्बन फूटप्रिंट म्हणजे शाश्वत आणि चांगले असे एक समीकरण डोक्यात असते. मात्र ते नेहमीच योग्य असते असे नाही.

हे मी सहमतीसाठी लिहिलेले नाही. >> ते वैयक्तिक मत आहे ते खोडून काढण्यात रस नाही असे म्हटले आहे.
याची आवश्यकता आहे कारण कमी कार्बन फूटप्रिंट म्हणजे शाश्वत आणि चांगले असे एक समीकरण डोक्यात असते. मात्र ते नेहमीच योग्य असते असे नाही. >>>> चर्चा जर पर्यावरणाच्या अनुषंगाने असेल तर हे मुद्दे गोंधळात टाकत आहेत. लाईफस्टाईल कोणती चांगली असा विषय असेल तर खेड्यातली चांगली असे कुणीच म्हणणार नाही. त्यात कष्ट, असुविधा, रोगराई , संकटे आहेत. पण मग शहरातली लाईफस्टाईल चांगली म्हटले तर त्याने पर्यावरणाची काय हानी होते याकडे दुर्लक्ष करता येईल का ?

नेमके काय म्हणायचे आहे ? मला समजलेले नाही.

<< तिथे पण जळण असणे, हे काही फार अपेक्षा नाही. मुतदेह जाळणे आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
एकीकडे दफन न करता जाळणे याचा फायदा असा की जागा व्यापली जात नाही. दफनभूमीसाठीही झाडे तोडणे आले.
तर जाळण्यामुळेही लागणारे लाकुड आणि प्रदूषण आले.
या दोन व्यतिरिक्त अजून पर्यावरणस्नेही पर्याय आहे का? लोक त्याचा धर्मांवर घाला न समजता स्विकार करतील का? >>

---- केमिकल पर्याय , काही देशांत / प्रांतातच कायदेशीर आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Alkaline_hydrolysis_(body_disposal)

मृतदेहाला अग्नी देणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे असा माझा समज होता. कोरोनामुळे तो दूर झाला. दफन केल्यावर मृतदेहाचे (मायक्रोब्ज/ बॅक्टेरिया) स्लो decomposition होते आणि मृत शरिरांत असलेल्या सर्व मिनरल्सचे " रिसाकलिंग " होते. microbiology of death हे गुग लल्यावर काही छान लिन्क्स मिळतात.
https://www.cell.com/current-biology/pdf/S0960-9822(16)30252-4.pdf

मृतदेहापासून इतरांना काही "संसर्गा" चा धोका नसेल तर जाळणे हा प्रकार पर्यावरणा साठी घातक वाटतो. मृत शरिराला जाळण्यामधे कसले रिसायक्लींग होते?

<<
हे मी सहमतीसाठी लिहिलेले नाही. >> ते वैयक्तिक मत आहे ते खोडून काढण्यात रस नाही असे म्हटले आहे.
याची आवश्यकता आहे कारण कमी कार्बन फूटप्रिंट म्हणजे शाश्वत आणि चांगले असे एक समीकरण डोक्यात असते. मात्र ते नेहमीच योग्य असते असे नाही. >>>> चर्चा जर पर्यावरणाच्या अनुषंगाने असेल तर हे मुद्दे गोंधळात टाकत आहेत. लाईफस्टाईल कोणती चांगली असा विषय असेल तर खेड्यातली चांगली असे कुणीच म्हणणार नाही. त्यात कष्ट, असुविधा, रोगराई , संकटे आहेत. पण मग शहरातली लाईफस्टाईल चांगली म्हटले तर त्याने पर्यावरणाची काय हानी होते याकडे दुर्लक्ष करता येईल का ? >>

-------- शहरांतली तसेच खेड्यातली लाईफस्टाईल...
विकसित देश आणि विकसनशील देश...
आहे रे आणि नाही रे....

कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्यात आता फार वेळ घालवता येणार नाही... पाणी नाका पर्यंत आलेले आहे. संसाधनांचा resources) वापर पहिल्या प्रकारची लोक / देश तुलनेने जास्त करत आहे.. पण त्याचे परिणाम सर्वानांच भोगावे लागणार आहेत... नव्हे दुसर्‍या प्रकारच्या लोकांना त्य परिणामांची दाहकता तुलनेने जास्त जाणवणार आहे, भले त्यांचा निसर्गाचा र्‍हास होण्यात तेव्हढाही मोठा हातभार लागलेला नसेल.

त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखविण्यात आणि वेळ घालविण्यात अर्थ नाही... we need an action, now.

वायू प्रदूषणा मुळे दिल्ली मधे ५४००० व्यक्तींना आणि भारतामधे १६.७ लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्येक हिवाळ्यात दिल्ली मधले दाट धुक्याचे चित्र आपण पहातो. उपाय ?

https://timesofindia.indiatimes.com/india/air-pollution-contributed-to-6...

https://www.businessinsider.in/science/health/news/pm2-5-air-pollution-c...

शहरी किंवा ग्रामीण कोणतीच जीवनशैली परिपूर्ण नाही. आदर्श शाश्वत जीवनशैली ही फार कठीण आहे कुठेही राहीलो तरी कारण आपले विकासाचे मॉडेल हे त्याला पुरक नाही. त्यातल्या त्यात जिथे आहोत तिथे best possible trade offs आपण करू शकतो.
काय शाश्वत या प्रश्नाचे सोपे, एका वाक्यात देण्यासारखे आणि आचरणात आणायला सोपे उत्तर अजून नाही एवढेच सुचवायचे आहे.
Sustainable lifestyle is more equitable and rewarding but the current capitalist model of development is not conducive for it.

दुसर्‍या प्रकारच्या लोकांना त्य परिणामांची दाहकता तुलनेने जास्त जाणवणार आहे, भले त्यांचा निसर्गाचा र्‍हास होण्यात तेव्हढाही मोठा हातभार लागलेला नसेल. >> +१ सहमत आहे.

दहन केले तरी सर्व मूलद्रव्ये पुन्हा निसर्गचक्रात जातात असा माझा समज आहे. भारतासारख्या ठिकाणी जिथे मुबलक वृक्षसंपदा आहे आणि उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात दहन करणे इष्ट असावे.
Slow decomposition होण्यासाठी कमी आर्द्रता असलेले किंवा थंड हवामान हवे.
अर्थात या प्रथा बदलण्याची गरज भासावी इतका दोन्हींचा फूटप्रिंट नाही असं मला वाटतं. We can rather focus on many other important behavioral changes that can make a substantial impact.

सध्याचे विकासाचे मॉडेल असे आहे:
एखाद्या भागाचा विकास करणे म्हणजे तिथे मोठ मोठे उद्योग, कारखाने, ऑफिसेस उभे करणे. तिथे मग लोकसंख्येची घनता खूप वाढते, त्या भागात जागेच्या/घराच्या किमती भरमसाठ वाढतात. मग दूर दूर पर्यंत वस्त्या वाढतात.
मग त्यांना तिथून कामाच्या जागेसाठी जायला -यायला झाडे तोडून मोठ मोठे रस्ते बांधणे, रेल्वे आणि रेल्वे स्थानके बांधणे, वाहने निर्मिती करणे (कार, दुचाक्या, बसेस, ट्रेन्स), त्या चालवण्यासाठी इंधन मिळवणे. तिथल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीआठी जंगल तोडून धरणे बांधणे, तिथून मोठमोठ्या पाईपलाईन्स टाकणे आणि पम्प हाऊस बांधणे, त्यासाठी लागण्याऱ्या विजेची सोय करणे. जेवढा मोठा हा फाफट पसारा तेवढा विकास जास्त.

Pages