स्मार्टफोनचे श्लोक...

Submitted by _आदित्य_ on 20 May, 2021 - 12:24

स्मार्टफोन जो प्रिय सर्वा कुणासी |
तयालागीं सारे विसरले जगासी ||
अति वापरे इंद्रिये नष्ट होती |
सगे सोयरे सर्वहीे लांब जाती || 1 ||

डिप्रेशनी देह पुरता बुडाला |
मनी षड्रिपुंचाही शिरकाव झाला ||
निरोगी नी योगी जनी भोगी केले |
असे होत रोगी कितीयेक मेले || 2 ||

उध्वस्त झाला पुरा नेटयोगे |
वायफायची तो तरी भीक मागे ||
ध्यानीमनी तो सदा फोन राही |
युसेज काही प्रमाणात नाही || 3 ||

यूट्यूब ते कामकारी विकारी |
फेसबुक नी व्हाट्सऍप ही खेदकारी ||
नको रे सदा व्हीडिओ गेम्स खेळू |
नको रे जनी तू असे शौक पाळू || 4 ||

विवेके अटॅचमेंट सोडूनि द्यावी |
जनी संगती पुस्तकांची धरावी ||
निसर्गात जावे हसावे रडावे |
आता पुरे स्वप्न, सत्यात यावे || 5 ||

-आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

कविता आणि फोटो छानच.

अति वापरे इंद्रिये नष्ट होती >>> डार्विनला नाराज करू नये. वापराविना शेपूट गेलं असं त्याचं म्हणणं आहे. यातून योग्य तो बोध घ्यावा.

धन्यवाद..
आणि.. मी मोबाईल च्या अति वापराने इंद्रिये नष्ट होतात असं म्हटलंय तिथे..
इंद्रियांचा अति वापर केल्याने ती नष्ट होतात असं नाही म्हटलंय.. so.. I think डार्विन नाही नाराज होणार..

मस्त

Thanks