मनोरंजनासाठी आणखी काय करावें?

Submitted by सुर्या--- on 5 May, 2021 - 02:01

सर्वच वयोगटांत आणि क्षेत्रांत अशी एक वेळ येते जेव्हा तोच तो पणा मुळे आयुष्य कंटाळवाणे वाटू लागतें. अश्या वेळेस आयुष्यातून हरवलेला आनंद म्हणा अथवा उत्साह निर्माण व्हावा यासाठी कोणकोणत्या मनोरंजनात्मक गोष्टी करता येऊ शकतात याबद्दल प्रतिक्रिया येऊ द्या....

Group content visibility: 
Use group defaults

लव्ह अफेअर.. प्रेमप्रकरण.. प्रेमात पडलेले असण्याचा काळ सर्वत सुंदर असतो हा अनुभव आहे .. मग ते एकतर्फी काअसेना

माबो, व्हॉट्सऍप ग्रुप्स वर कुठे सरकार समर्थनात तर कुठे सरकार विरोधात खणकवणारी एक एक पोस्ट टाकावी (फॉरवर्ड केलेल्या आयत्या पोस्ट्स मिळतात अशा, फेसबुक / ट्विटर वर, आपले डोके खर्च करण्याची गरज नाही) आणि गंमत पहावी.

मायबोलीच्या १२ दिवसाच्या आयुष्यात सोळावा धागा काढला. अजून मनोरंजन काय हवंय ? Proud
---------हाहाहा....ते आहेच....

कुठला आयडी किती जुना आणि त्याचा हा कितवा धागा वगैरे ऍनलिसिस करावे, तेवढाच वेळ जातो. Wink

शापित आयुष्य Lol
मानवराव, दुखावले गेला असाल तर दिलगिरी व्यक्त करतो Wink

@पारंबीचा आत्मा
पारंबीला आत्मा असतो हे आत्ताच कळाले.
तुमचे शब्द ओल्या मातीसारखे समजतो. तुम्ही त्याला चाकूचा आकार बनवून दिलात तर मी त्याला फुलाचा आकार देईन. तुम्ही त्याला दानव बनवून पाठवलं तर मी त्याला देवाची मूर्ती बनवून देव्हाऱ्यात ठेवेन.
शब्दाला तुल्य दिल कि मोल येतो.
बाकी मायबोली वर जॉईन होऊन किती दिवस झाले आणि पोस्ट किती केल्या हा काही तोलण्याचा साधन नाही. अनेक लिखाण इतर ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, मायबोलीवर नवीनच असलो तरीही आयुष्याचा आपापला अनुभव कमी जास्त असतोच.

डोरेमॉन बघत बसावे. Proud
माझा प्रतिसाद चोरलात तुम्ही.

जिंदगी संवॉर दु, इक नयी बहार दु !
दुनियाही बदल दु मै तो प्यारासा चमत्कार हुं !
मै किसीका सपना हुं जो आज बन चुका है सच,
अब ये मेरा सपना है की सबके सपने सच मै करु,
ऑसमाको छु लु तितली बन उडु.......या हेलिकॉप्टर
ऑ ऑ ऑ मै हु इक उडता रोबो......डोरेमॉन !!!!!!!!!

पारंबीला आत्मा असतो हे आत्ताच कळाले.
तुमचे शब्द ओल्या मातीसारखे समजतो. तुम्ही त्याला चाकूचा आकार बनवून दिलात तर मी त्याला फुलाचा आकार देईन. तुम्ही त्याला दानव बनवून पाठवलं तर मी त्याला देवाची मूर्ती बनवून देव्हाऱ्यात ठेवेन.
शब्दाला तुल्य दिल कि मोल येतो.
बाकी मायबोली वर जॉईन होऊन किती दिवस झाले आणि पोस्ट किती केल्या हा काही तोलण्याचा साधन नाही. अनेक लिखाण इतर ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, मायबोलीवर नवीनच असलो तरीही आयुष्याचा आपापला अनुभव कमी जास्त असतोच. >>>> या सगळ्याचा मनोरंजनाशी काय संबंध हे काही समजले नाही.

तुम्ही स्वतः मनोरंजनासाठी काय करावे हा प्रश्न विचारण्यासाठी धागा काढला आहे. त्याला अनुसरून उत्तर दिले आहे. ते असंबद्ध असेल तर कळवा. मायबोलीवर बारा दिवसात सोळा धागे काढूनही मनोरंजन कमी पडत असेल तर अजून काय सुचवणार असा त्याचा अर्थ आहे. बाकी फाफटपसा-याशी माझा काही संबंध नाही. (धागा काढल्यानंतर उलटसुलट प्रतिसाद येणार हे चालत नसेल तर तशी सूचना धाग्यावर लावावी किंवा धागा काढू नये. धागा सार्वजनिक मालकीचा असतो असे मला वाटते).