छंद माझा वेगळा - २

Submitted by किरण कुमार on 30 April, 2021 - 08:02

पहिला भाग इथे पाहता येइल
https://www.maayboli.com/node/78647

नमस्कार मित्रांनो ,
मागच्या भागातील छायाचित्रे आणि त्यावरील ओळी आवडल्याचे आपण प्रतिसादात कळविल्यामूळे मलाही पुढील भाग टाकताना आनंद होत आहे.

सायकलचा नाद लागल्यानंतर सायकल सफरी वाढू लागल्या , पुणे कोकण गोवा तिनदा झाल्यानंतर पुणे कन्याकुमारी सुद्धा दोनदा करण्याचा योग जूळून आला , आमचा प्रवास हा घाईत नसतो , पाणवठा दिसला तर थांबायचे , थकवा आला तर मस्त न्याहारी करुन झाडाखाली जरा पडायचे , संध्याकाळ होईल तिथे थांबायचे अशाच सफरी जास्त झाल्या.

प्र.चि. १
WhatsApp Image 2021-04-30 at 15.48.31.jpeg

वरसगाव धरणाच्या थोडे मागे असलेले हे एक सुंदर ठिकाण आहे , सुर्योदय पाहण्यासाठी मी आवर्जुन तिथे जात असतो .का कुणास ठाउक तिथे जाउन देवाकडे असे काही मागावे वाटते.

प्र.चि. २
WhatsApp Image 2021-04-30 at 15.48.30.jpeg

पुणे कोकण गोवा राईड २०२० , देवगड जवळ एका खाडी पूलावरुन सकाळचे असे सुंदर दृश्य दिसते. तळ कोकणातील भटकंती तसाही आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

प्र.चि. ३

WhatsApp Image 2021-04-30 at 15.39.47.jpeg

पानशेत धरणाचे अडवलेले पाणी ज्या गावापर्यंत पसरले आहे त्यात शिरकोली, पोळे , टेक पोळे ही पण गावे आहेत , या भागात सायकलींग करणे खरे तर श्रमाचे काम आहे कारण रस्त्याला फार चढ उतार असतात, पण तिथे पोहचल्यानंतर अशा निवांत ठिकाणी दहा मिनिटे बसला तरी थकवा निघून जातो .

प्र.चि . ४WhatsApp Image 2021-04-30 at 15.37.49.jpeg

देवगड ते कुणकेश्वर रस्त्यावर हा एक छोटासा कच्चा रस्ता आहे , दोन्ही बाजूला उंच वाढलेली सुरुची झाडे आणि मध्ये गडद सावली पाहून मन प्रसन्न होउन जाते .

प्र. चि. ५

WhatsApp Image 2021-04-30 at 15.37.26.jpeg

मी जिथे राहतो तिथून खडकवासला धरण फार जवळ आहे . पावसाळ्यात धरणाचे पाणी सोडले कि धरणावर जाणे आणि खलखळणारे पाणी पाहत बसणे हा एक वेगळाच छंद आहे.

प्र.चि. ६
WhatsApp Image 2021-04-30 at 15.37.26 (1).jpeg

गणपती पुळे च्या अलिकडे असणारे आरे आणि वारे बिच जवळ अशा शांत ठिकाणी भर दुपारी पोहचलो तर इथे वामकुक्षी हवीच , कानावर पडणारी लाटांची गाज आणि कधी दमट कधी थंड वाहणारे वारे , मध्येच झाडावरच्या पानांची सळसळ आणि आपल्याच विचारात आपण .

प्र.चि. ७
WhatsApp Image 2021-04-28 at 12.58.40.jpeg

पुणे कन्याकुमारी सायकल सफर करताना कर्नाटकाच्या मुरुडेश्वर पासून बराच रस्ता समुद्र तटावरुन जातो , पुढे मालपेजवळ असणारा बेंगरे बिच वरील हे चायाचित्र

प्र.चि. ८

WhatsApp Image 2021-04-28 at 12.58.38.jpeg

हा ही एक कोकणातला भाग आहे , २०१६ साली अमित केदार बरोबर केलेली ही सायकल सफर पण भन्नाट होती, फोटो सौजन्य - अमित

प्र.चि . ९

WhatsApp Image 2021-04-26 at 12.37.13.jpeg

निसर्गाशी आपले नाते ते काय , ते त्यानेच ठरविले तर बरे..... गोव्याच्या अरंबोळ बीच वर एवढी शांतता पहायला मिळाली होती मागच्या वर्षी ,

प्र.चि. १०
WhatsApp Image 2021-04-30 at 12.26.00.jpeg

कन्याकुमारी पोहचायच्या थोडे आधी केरळ मधील शेवटचे काही अंतर कापताना इथे थांबण्याचा मोह आवरला नाही , थांबलो तर फोटोही हवेच ...
खरच मनातले सगळे काही सांगायला त्या अव्यक्त मनाला शब्द सुचतील का ?

क्रमशः

किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बघून डोळे निवले !!! खास करून कोकणातले . 6 नंबर चा फोटो विशेष आवडला . अशा ठिकाणी विश्रांती घ्यायला कोणाला आवडणार नाही ?