दिगंत : भाग १६ (अंतिम भाग)

Submitted by सांज on 14 April, 2021 - 09:15

“This trip was best of all..”

घाटावर परतताना अनुराग म्हणाला.

“हम्म.. ” रियाने हसून सहमती दर्शवली.

बोलत बोलत दोघे गाडीपाशी येऊन पोचले.

“so.. मग कधी परतताय तुम्ही दोघी?” अनुराग ने विचारलं.

“बघू आमचं ठरलं नाहीये अजून. एक-दोन दिवसात मे बी..” रिया म्हणाली.

“हम्पी टु पुणे.. लॉन्ग डिस्टन्स इट इज..”

“हो.. पण मजा येते अशा रोड ट्रिप्स मध्ये.. ट्रॅवल इज द बेस्ट थेरपी. स्वानुभवातून पटलंय मला आता हे.” रिया उत्साहाने म्हणाली.

“येस.. इंडीड इट इज..” तिच्याकडे पाहत तो म्हणाला.

“ऐक नं..” रिया जराशी घुटमळली.

“बोल नं.” अनुराग.

“आपण हे सगळं घरी सांगण्याची घाई नको करायला.. असं मला वाटतंय.”

तिच्याकडे पाहत जरासा विचार करून अनुराग म्हणाला,

“ते लगेच एंगेजमेंट आणि लग्नाच्या मागे लागतील म्हणून?”

तिच्या मनातलं त्याने बरोबर ओळखलं होतं. रियाने हसून त्याच्याकडे पाहिलं.

“हो.. म्हणजे मला असं वाटतंय की we should know each other more.. आणि दोन-एक महिन्यात माझी नेक्स्ट prelims exam पण आहे. I need to focus on that now..”

“yes yes.. off course.. Take your time.” अनुराग शांतपणे म्हणाला.

रियाने हसून त्याच्याकडे पाहिलं.

आणि मग ती पुण्यात परतल्यावर भेटायचं ठरवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

वार्‍यावर अल्लद तरंगणारं हलकं हलकं मन घेऊन रिया हॉटेलवर परतली.

तिला पाहताच संहिता मिष्किलपणे मोठ-मोठयाने गुणगुणू लागली.

“..आजकल पांव जमींपर नही पडते मेरे.. बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुये..?..”

रिया त्यावर हसत, जाऊन बेडवर आडवी पडली.

“काय काय झालं? सगळं सांग मला.. विथ एव्री डीटेल..” संहिता प्रचंड उत्सुकतेने म्हणाली.

तिच्याकडे पाहत हाताची उशी करून रिया म्हणाली,

“हम्म.. सांगते. पण आधी तू सांग. तुझ्या आणि अनिकेत मध्ये काय सीन चालूये नक्की. काल त्याचा फोन येऊन गेल्यापासून पाहतेय, नुसती गुलाबी गुलाबी दिसतेयस.”

त्यावर गालातल्या गालात हसत संहिता खाली बसली.

“काय सांगू रिया.. सगळी उत्तरं अगदी तिथेच होती बघ. मी उगाच स्वत:च क्रिएट केलेल्या अंधारात चाचपडत होते. मला माझ्या प्रॉब्लेम्सच्या पलिकडचं काही दिसत नव्हतं. त्या सगळ्या पासून थोडं दूर आल्यावर, त्रयस्थपणे सार्‍याकडे पाहिल्यावर सगळं लख्ख दिसायला लागलंय आता.”

पुन्हा आडवी होत रिया बोलायला लागली,

“exactly यार.. आपण उगाच अवघड करून ठेवतो सगळ्या गोष्टी. आपल्या समजूतींचं क्लाऊड तयार करून जगतो आपण आपल्याभोवती. तेच तेवढंच खरंय असं वाटायला लागतं काही काळाने. आपलं जग संकुचित आणि दिशा रुंद व्हायला लागतात. आणि मग त्या आपल्या बबल च्या पलिकडचं अनंत शक्यतांनी भरलेलं अवकाश दिसेनासं होत जातं.. दिशा संपल्या सारख्या, क्षितिज हरवल्या सारखं वाटायला लागतं.

पण, मुळात तसं नसतंच काही. गरज असते ती केवळ आपण आपल्या कोशातून बाहेर येण्याची.. मग सगळं लख्ख होत जातं. क्षितिज विस्तारतं. दिगंत खुणावतो..”

“हम्म.. खरं आहे.” संहिताने होकार भरला. आणि मग पुन्हा रियाकडे पाहत म्हणाली,

“बाय द वे.. संत अनुराग चे मौलिक विचार आहेत का हे?”

“हाहा.. नाही. संत अनुरागचा मौलिक ‘इफेक्ट’ आहे हा..” डोळे मिचकावत रिया उत्तरली.

“म्हणजे तू? म्हणजे तुम्ही..??” संहिता excite झाली.

तिच्याकडे पाहत रियाने मान हलवली आणि म्हणाली,

“हो.. now you are free to tell this ‘Hampi story’ to our future kids..”

“what? खरंच?.. I told you. I told you.. छुपी रुस्तूम आहेस तू. This is grand yar.. more than happy for you both..” संहिता आनंदाने म्हणाली.

“and I’m happy for you Sanhita..” रिया संहिता कडे पाहत म्हणाली.

दोघींनी मग एकमेकांच्या डोळ्यांतला तो नव्याने गवसलेला अनोखा आनंद हिप्पी आयलंड वर स्कूटीची सफर करून celebrate केला. दोघी भरपूर भटकल्या.. रस्ता चुकल्या.. थकल्या.. हरवल्या.. निसर्गाच्या कुशीत जाऊन स्वत:चीच पुन्हा नव्याने गळाभेट घेऊन परतल्या..

दोघींना आता ‘घर’ बोलावत होतं. मनाला हवी ती विश्रांती मिळाली होती. ताजेतवाने उन्मेष मनात घेऊन, आयुष्याला भिडण्यासाठी दोघी आता उत्सुक होत्या.

ठरल्याप्रमाणे मग दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी हम्पीचा भरल्या मनाने निरोप घेतला आणि परतीचा प्रवास सुरू केला.. नवे अनुभव आणि विस्तारलेलं क्षितिज सोबत घेऊन खुणावणार्‍या दिगंताच्या दिशेने..

विराम

सांज
http://www.chaafa.com/

(कथा पुर्णपणे काल्पनिक असून कथेतील ठिकाणं मात्र खरी आहेत.

मी हम्पी प्रत्यक्षात पाहिलेली नाही. सगळी वर्णने गोळा केलेल्या माहितीवर विसंबलेली आहेत. त्यामुळे, मला शक्य तितकी अचूकता राखण्याचा मी प्रयत्न केलेला असला तरी काही तपशील मागे-पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रिया आणि संहिता या दोन मैत्रीणिंची ही गोष्ट कथामालिकेच्या स्वरुपात लिहली आहे. ती सुरू करताना लिखाणातही ‘सीझन’ पॅटर्न आणण्याचा विचार होता. त्या विचारा नुसार हा या कथेचा पहिला सीझन आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचा लवकरच लिहेन.
सर्व छायाचित्रे जालावरून साभार )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान. आवडली कथा. सिरीजसाठी शुभेच्छा. वाचायला नक्कीच आवडेल.

आपण उगाच अवघड करून ठेवतो सगळ्या गोष्टी. आपल्या समजूतींचं क्लाऊड तयार करून जगतो आपण आपल्याभोवती. तेच तेवढंच खरंय असं वाटायला लागतं काही काळाने. आपलं जग संकुचित आणि दिशा रुंद व्हायला लागतात. आणि मग त्या आपल्या बबल च्या पलिकडचं अनंत शक्यतांनी भरलेलं अवकाश दिसेनासं होत जातं.. दिशा संपल्या सारख्या, क्षितिज हरवल्या सारखं वाटायला लागतं.
पण, मुळात तसं नसतंच काही. गरज असते ती केवळ आपण आपल्या कोशातून बाहेर येण्याची.. मग सगळं लख्ख होत जातं. >>>> हे १००% पटलं

कथामालिका पूर्ण होण्याची वाट बघत होते (आणि नव्हते ही) प्रतिक्रिया देण्याआधी!अगदी नितान्त सुन्दर वर्णन आहे प्रवासाचे आणि दोघीन्च्या मनस्थितीचे..अनुरागचे कॅरॅक्टरही भावले.
सहज, सुंदर आणि निखळ > +११११

मी हम्पी प्रत्यक्षात पाहिलेली नाही. सगळी वर्णने गोळा केलेल्या माहितीवर विसंबलेली आहेत.>>>>>>>>
वाटत नाही.. उत्तम वर्णन केले आहे!!

बन्या, झेलम, मोहिनी, साधना, मृणाली, अमृताक्षर, मैत्रेयी, समाधानी, आसा, rmd, किल्ली, एस, चिंगी, गौरी, अथेना, किंग ऑफ नेट..

प्रतिसादांसाठी सर्वांचे मनापासून आभार Happy

वाह, खुप सुंदर कथा. सर्व भाग सुरेख.
तुम्ही भेट न देता हम्पी चं वर्णन लिहिलय असं वाटत नाही. अप्रतिम झालय.
सिझन २ ची वाट बघेन Happy

मस्त कथा, खूप सुंदर...
पुढच्या सीझनची वाट पाहू..!
Btw आता तुमची तब्येत कशी आहे ? काळजी घ्या आणि भरपूर आरामही करा .!

@स्मिता श्रीपाद

मनापासून आभार Happy
लवकरच लिहेन पुढची गोष्ट.

@मीनाक्षी कुलकर्णी

धन्यवाद Happy
माझी तब्येत आता चांगली आहे. आराम चालूच आहे..

....आणि मग त्या आपल्या बबल च्या पलिकडचं अनंत शक्यतांनी भरलेलं अवकाश दिसेनासं होत जातं.. दिशा संपल्या सारख्या, क्षितिज हरवल्या सारखं वाटायला लागतं.> १००% पटलं ..
खूप छान झाला आहे पहिला सिझन . पुढचा सिझन लवकर येऊदे .
हंपी कधीपासून विश लिस्ट वर आहे . आता तर जायची इच्छा अधिक तीव्र झाली.
तुम्ही प्रत्यक्ष तिथे न जाता एवढे अप्रतिम वर्णन केलंय . तुम्हाला पण लवकरात लवकर तिथे जायचा योग यावा. Happy

Btw आता तुमची तब्येत कशी आहे ? काळजी घ्या आणि भरपूर आरामही करा .!
> तुमची तब्येत बरी न्हवती का? तरीही इतके पटापट भाग पूर्ण केलेत. ग्रेट. काळजी घ्या आणि पुढचा सिझन येण्याआधी छान विश्रांती घ्या. तुम्हाला शुभेच्छा.

पहिला सिझन ? अरे वाह, पुढचा सिझन लवकर येऊदे .
प्रत्यक्ष हम्पीला न जाता केलेले वर्णन छान उतरलंय.
तब्येत चांगली आहे हे ऐकून बरे वाटले.

@सामी

शुभेच्छांसाठी आणि प्रतिसादासाठी मनापासून आभार. हो तब्येत बरी नव्हती. पॉझिटिव्ह होते. आता नेगेटिव झालेय Happy

@हर्पेन

Thank You Happy
लिहेन पुढचा सिझन लवकरच

शुभेच्छांसाठी आणि प्रतिसादासाठी मनापासून आभार. हो तब्येत बरी नव्हती. पॉझिटिव्ह होते. आता नेगेटिव झालेय > निगेटिव्ह झालात हे ऐकून छान वाटलं. तरीही काळजी घ्या आणि भरपूर आराम करा.

मी परत माझी पूर्वीची एक प्रतिक्रीया नोन्दवत आहे. मला तुमच्या लेखनाचे "सानिया" यान्च्या लेखनाशी खूप साधर्म्य वाटते. खूप काही न घडताही तुमच्याही कथेमध्ये बरेच काही घडते.

Pages