...मावळते रोजच संध्या!

Submitted by अपूर्व जांभेकर on 1 April, 2021 - 06:13

त्या झाडाच्याही मागे, मावळते रोजच संध्या,
अंधार पांघरून पाने, निजलेल्या निपचित फांद्या! ।।धृ ||

दिनभरी खेळूनी थकले, मैदान पांगले भवती...
थोपटतो अलगद वारा, उडवीत सुंगधी माती! ।।१।।

एव्हाना परतून वाटा, येतात पुन्हा पाराशी,
डोळ्यात दाटते वाट, पळी-पात्र उभे दाराशी! ।।२।।

त्या तिथे काहीसे दूर...पाणवठा अबोल झाला!
देवाजीचा शेजार, शांततो ह्याच समयाला... ।।३।।

सुरु नंतर कूज-बूज होते, पुट्पुटती कंदील गीते...
ऐकण्या रात्रीचे गाणे, मैफल ताऱ्यांची जमते! ।।४।।

© अपूर्व संजीव जांभेकर

Group content visibility: 
Use group defaults

चित्रमय कविता.
>>सुरु नंतर कूज-बूज होते, पुट्पुटती कंदील गीते...
ऐकण्या रात्रीचे गाणे, मैफल ताऱ्यांची जमते! ।।४।।>> उच्च.

चित्रमय कविता.
>>सुरु नंतर कूज-बूज होते, पुट्पुटती कंदील गीते...
ऐकण्या रात्रीचे गाणे, मैफल ताऱ्यांची जमते! ।।४।।>> उच्च.

फक्त सन्ध्याकाळ चे
वर्णन असूनही पूर्ण कविता वाटते.

सुन्दर सुरुवात आणि समाधान देणारा शेवट

संध्याकाळचे चित्र छान उभे केले आहेस आणि ओघवती झाली आहे कविता! एकूण प्रवाह छान टिपला आहेस! शब्दमांडणी फार सुंदर!

चुन्नाड, पऱ्या - धन्यवाद मित्रांनो! परिमल, तुझ्या रचनेची वाट बघतोय इथे!
शशांक, प्रभुदेसाई आणि गौरी - मनापासून आभार!

बालभारतीच्या कवितांची आठवण आली. >> खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून स्वान्तसुखाय! खूप खूप आभार!