सोसायटीच्या प्रश्नात मदत हवी आहे

Submitted by एक-माबोकर on 11 April, 2021 - 07:46

नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
समस्या अशी आहे की दर रविवारी ऑलमोस्ट दर रविवारी हे लोक खाली सोसायटीच्या ओपन पार्किंग भागात क्रिकेट खेळतात. आमच्या वाट्याला आलेले पार्किंग तिथेच आहे आणि त्यामुळे सारखं कोणीतरी वॉचमन ला पाठवून आम्हाला गाडी काढा म्हणून सांगायला येतात . सुरवातीला आम्ही सहकार्य केले काही दिवस आणि नवरा जाऊन दुसरीकडे तेवढ्यापूरते गाडी लावून यायचा. पण आता चार वर्षे झाली जवळपास इथे येऊन तीच कटकट अजूनही सुरूच आहे. आता काही दिवस कोरोनामुळे जरा काळजी घ्यावी म्हणून त्याना सध्या खेळु नका असे शांतपणे चांगल्या भाषेत सांगितले होते. पण काहीही फरक नाहीये.

या गोष्टीवरून आता वाद व्हायची वेळ आलीये. इतर काहीजण सुध्दा त्या लोकांना बोलले मागे की सध्या खेळु नका पण त्याउपर कोणी काही बोलत नाही . आणि याचं कारण म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी स्वत: त्यांना सामील आहे. त्याला कोणीही काहीही बोलत नाही उलट त्याचा सोबत खेळतात. हे वागणं म्हणजे मिळालेल्या पोझिशनचा गैरवापर करणे नाही का? आम्ही यांच्या पार्किंग मध्ये गाडी लावतो मग असे म्हटले तर तेही चालत नाही. काय करावे अशा लोकांना कसे समजवावे? स्वत:च्या च पार्किंग मध्ये गाडी लावणे गुन्हा आहे का? काय कायमस्वरूपी तोडगा काढावा यावर जेणेकरून ते लोक पुन्हा असे वागणार नाहीत. कृपया जेन्यूईन समस्या आहे, जेन्यूईन मदत हवीये. मी नियमित माबोकर आहे तेव्हा आताच स्पष्ट करते की हा जरी डुआयडी असला तरी धागा टीपी म्हणून काढलेला नाही. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यांच्या घराबाहेर (कुठल्या का मजल्यावर असेना) जाऊन मुलांना खेळायला सांगा. जर मुलांना बोलले तर भांडण उकरून काढा. इथे लोक काय म्हणतील चालत नाही. जशास तसे वागावे लागते. आणि मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याने काही वेळ घर उघडं ठेवून बाहेर जा असे बिनधास्त सांगा. हे जमत नसेल तर पुन्हा आम्हाला आमच्या जागेतून गाडी काढायला सांगायला वॉचमन घरी नाही आला पाहीजे असे ठणकावून सांगा.