आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई इंडिअयन्स नी पॅटींसन वर एकदमच काट मारून टाकलेली बघून आश्चर्य वाटले.
चेन्नई मधे मॅचेस नसल्यामूळे नि एकंदर बॅटींग प्रॅक्टीस च्या अभावामूळे चेन्नई ला अधिक मेहनत करावी लागेल असे वाटते.
जेसन रॉय ला उचलून कलकत्त्या ने एक चूक सुधारलि आहे.

पड्डीकल, गायकवाड, यादव, किशन ह्यांनी खोर्‍याने धावा काढाव्यात , जैस्वाल, शॉ ह्यांची मॅच्युअर रुपे दिसावीत, नागरकोटि, मावी नि पोरेल नी भरपूर विकेट्स घ्याव्यात अशी आशा धरूया.

नागरकोटी मला फार प्रॉमिसिंग वाटत नाही, मावी जास्त चांगला वाटतो, नागरकोटी त्याच्या action मुळे आणि angle मुळे खूप expensive ठरू शकतो

फिरकी गोलंदाजांकडे जास्त लक्ष राहील, विषनोयी, चक्रवर्ती, दोन्ही अश्विन, गौतम , तेवतीया आणि याखेरीज कोणी नवीन चांगला स्पिनर गवसला तर चांगले होईल

गेल्यावर्षी मी सपोर्ट करत असलेल्या टीम अनुक्रमे
१) मुंबई
२) दिल्ली

मज्जा म्हणजे याच दोघांत फायनल झाली आणि पहिलीवालीच जिंकली.

यावेळच्या दोन टीम अनुक्रमे
१) दिल्ली (एकमेव कारण ऋषभ पंत)
२) चेन्नई (धोनीची अखेरची आयपील असेल म्हणून)

फायनलला याच दोन टीम येत शिष्याने गुरूला हरवून गुरुदक्षिणा द्यावी असे वाटते Happy

मी यापूर्वी मुबैला सपोर्ट करायचो पण आता मुबै संघात नेपोटीझम सुरू झालंय त्यामुळे या वर्षी आयपीएल बघणार नाही.

धन्यवाद बाफ उघडल्याबद्दल. दरवर्षी माझा पॅटर्न
१-> हॅट, आयपीएल काय बघायचंय-
२-> काय सॉलिड फिल्डिंग/कॅच आहे बॉस
३-> आज रोहित मस्त खेळतोय. सूर्यकुमार यादव्/ईशान किशन/<करंट फेवरिट> यांची बॅटिंग. मधेच एखाद्याने या बोलिंग वाळवंटात अफलातून ओव्हर टाकली की त्याचे कौतुक
४-> आजची मॅच इण्टरेस्टिंग दिसते
५-> आज मुंबईची आहे म्हणून बघतोय
६-> फुल्ल ऑन इन्टरेस्ट

असा होत जातो. सध्या स्टेप २ वर आहे Happy ही आयपीएल लगेच आल्याने पहिली स्टेप स्किप झाली.

*-> फुल्ल ऑन इन्टरेस्ट* - पुन्हा लाॅकडाऊनची हवा असलयाने प्रथमपासूनच 6वी स्टेपच जोर धरणार, असं दिसतंय !! Wink

पुन्हा लाॅकडाऊनची हवा असलयाने प्रथमपासूनच 6वी स्टेपच जोर धरणार, असं दिसतंय !!
>>>>>>
त्यासाठीच तर नाही ना लॉकडाऊन लावत हे.. वर्क फ्रॉम होम करा आयपीएल बघा

मुंबई, हैद्राबाद हे दोन्ही प्लेऑफ मध्ये जातीलच जातील असे सध्या तरी वाटते आहे.
ऊरलेले दोन चेन्नई आणि दिल्ली असण्याचे चान्सेस जास्त आहेत.

  • मुंबई हॅट्रिक करेल का? मागच्या ३-४ आयपीएल मधल्या अ‍ॅवरेज पर्फॉर्मन्सनंतर रोहित खेळ ऊंचावेल का?
  • धोनी,रैनाचा ही शेवटची आयपीएल असल्यास ते कप ऊचलतील का?
  • कोहली/एबीडी/मॅक्सवेल १४ पैकी अर्ध्या मॅचेस मध्ये जरी फुटले तर ते बँगलोरला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतील का?
  • अय्यरची जागा बहुधा स्मिथ घेईल ज्याचा पंतलाही कॅप्टन्सी करतांना फायदा होईल असे वाटते. शॉने खेळात बर्याच सुधारणा केल्या असे ऐकून आहे पण फारशा अपेक्षा नाहीत.
  • पंजाब क्वालिफाय होवो वा न होवो, राहुलचा सुपर्ब फॉर्म परत यायला हवा आहे.
  • आर्चर नसतांना मॉरिस पैसा वसूल पर्फॉर्मन्स देऊ शकेल का? मला तरी मॉरिस घाट्यातला सौदा वाटतो आहे. सॅमसन कॅप्टन म्हणून किती ईफेक्टिव आहे ते बघणे आले.
  • हैद्राबाद मला तरी ड्रीम टीम वाटते आहे. डेथ ओवरमध्ये एक पावर हिटरची कमतरता भासू शकते. समद पुरेसा वाटत नाही.
  • कोलकाता मागच्या काही आयपील मधली सगळ्यात लॅकलस्टर टीम वाटते मला. रसेल वगळता फॅन फॉलोईंग ही फार कमी असावे. एकमेव नॉन-देसी कॅप्टन असलेली टीम.

कोलकाता मागच्या काही आयपील मधली सगळ्यात लॅकलस्टर टीम वाटते मला. रसेल वगळता फॅन फॉलोईंग ही फार कमी असावे. एकमेव नॉन-देसी कॅप्टन असलेली टीम. >> डेव्हीड वॉर्नर नि फॅमिली चा एकंदर इंस्टाग्राम फीड बघता तो मनाने भारतीय झाल्यातच जमा आहे. बर आहे भारतीय संघाला एक चांगला ओपनर मिळाला Wink

ठराविक खेळाडूंच्याच लार्जर दॅन लाईफ इंडिव्हीज्युअल काँट्रीब्युशन पेक्षा बर्‍याच जणांच्या भले छोट्या छोट्या पण एकत्रित रित्या मोठ्या ठरू शकणार्‍या काँट्रीब्युशन ज्या टीम्स चे असतील - ते ही विशेषतः खेळाडू टीयर २ - ३ किंवा डोमेस्टीक सर्कल मधले असावेत - अशा टीम्स प्लेऑफ्स मधे जाण्याचे चान्सेस अधिक असतात असे माझे मत.

अरे हो वॉर्नरगारूला विसरलोच की. पण तो ऑईन मोशाय पेक्षा जास्त भारतीय आहे हे नक्की. Proud

खरंय. बिग मनी प्लेअर्स एखादी दुसरी मॅच काढून देतात पण ते बहुधा डिसअपॉईंटच करतात. टीमला क्वालिफाय करवणे ओवरऑल टीम परफॉर्मन्सवरच अवलंबून आहे. मुंबई अशा टीम प्लेअर्सचे नर्चरिंग घडवून आणण्यात ईतरांच्या बरीच पुढे आहे. तिने बिग बॅंग प्लेअर्स विकत घेण्यापेक्षा ईंपॅक्टफुल प्लेअर घडवण्यावरच जास्त भर दिला.

नागरकोटी त्याच्या action मुळे आणि angle मुळे खूप expensive ठरू शकतो >> मला नागरकोटी ची अ‍ॅक्शन सुद्धा आठवत नाहिये. फक्त सातत्याने १४५+ च्या आसपास बॉलिंग करतो असे वाचल्याचे आठवते. डोमेस्टिक मधे बंगाल जिंकले तेंव्हा मावी नि नागरकोटि होते कि त्यातला एक पोरेल होता कोण जाणे.

ल्हानपणापासून आजही आमची टीम मुंबई.
पूर्वी खुन्नस मुळे दिल्ली आवडत नसायची. पण सेहवागमुळे वातवरण बरेच निवळले. आता युवा संघामुळे सहानुभूती. टीमपण चांगली आहे. फक्त कोच सोडून. Happy
यावेळेस हैदराबादची टीमही चांगली आहे. या तीन टीम नक्की शेवटच्या चारात.

राजस्थानही सगळे फिट आणि शेवटपर्यंत हजर असतील तर चांगली आहे. पण फारशी बेंच स्ट्रेंग्थ आणि डेप्थ नाही.

चेन्नई निवृत्ती योजना आहे. सगळ्यांचा बेनिफीट सिझन. टीम मधे मोठे बदल होतीलच, करावेच लागतील पुढच्या वर्षी.

अरे व्वा! आला का धागा Happy

cricbuzz च्या youtube channel वर हर्षाने सगळ्या टीम्सचे छान ॲनालिसीस केलय!

मुंबई (फारशी आवडत नसली तरी त्यांचा एकंदर परफॉर्मन्स बघता) आणि दिल्ली (अय्यर नसूनही) फायनलला असतील असे वाटतेय..... चेन्नई आणि राजस्थान (दोन्ही टीम एकेकाळी फार आवडत्या होत्या त्यामुळे अजूनही soft corner आहे तरीही) तळाला असतील असा अंदाज आहे!

इतर चार संघांना समान संधी आहे Happy

हर्शल पटेल ने स्मार्ट बॉलिंग केली हे लक्षात घेऊन सुद्धा मुंंबई चे किशान नंतर आलेले सर्व जण अतिशय प्रेडिक्टेबल खेळले. बंग्लोर ने त्यांच्या नेहमीच्या स्वभावाला साजेसा गेम खेळला. हर्शद पटेलचा दिवस होता म्हणून वाचले एव्हढेच म्हणायचे.

मुंबईचे स्लॉगर्स वानखेडे आणि चेन्नईच्या पीचमधला फरक जितक्या लवकर समजतील तितके त्यांच्यासाठी चांगले!

बोल्टच्या एका ओव्हरने मॅच फिरली.... क्रेडीट अर्थातच ABD ला आहे!

हर्षल पटेलने चांगली बॉलींग केली!

कदाचीत काही चेंडू राखुन सामना जिकंता आला असता तो सामना AB ने जवळपास घालवला पन मुबंई च्या गोलंदाजाचा अनुभव कमी पडला. शेवटच्या चेंडुवर रडतखडत जिकंली RCB...

आजची मॅच बघता नाही आली. पण बंगलोर जिंकले ते पाहून बरं वाटलं. विराट ची खेळातली इंटेंसिटी, कमिटमेंट. इन्व्हॉल्व्हमेंट बघून त्याला हारताना अजिबात बघवत नाही.

उद्या दिल्ली वि. चेन्नई!

>>२०१३ पासून मुंबई पहिला सामना हरतेय<<
पहिला डाव देवाला, या भावनेतुन अगदि आरामात हरले. चलता है.

त्या बोलरने उलटं धाउन घेतलेली कॅच हा मात्र आजच्या मॅचचा हायपॉइंट...

ऐबीडी हे क्रिकेटमधलं एक अजब रसायन आहे !
* वॉशिंग्टन ने काय जबरी कॅच घेतला! कपिलच्या कॅच ची आठवण झाली.* - 100% सहमत !
हर्षल पटेलसाठी कालचा सामना 'करिअर'चा महत्वाचा मैलाचा दगड बनूः शकतो. छान गोलंदाजी!
बुमराह हा कोणत्याही संघासाठी व कर्णधारासाठी मोठा आधारस्तंभच !
'टॅटू' गोंदवून घेण्याची फॅशन/ फॅड खेळाडूंमधे जोरात पसरतेय ! Wink
मुंबई हरली तरी ती जिंकणारी टीम आहे याची चुणूक दाखवूनच !

Macro Jansen, South Africa
हा बॉलर आजच्या दिवसाचा फाईंड वाटला मला.
अनकॅप्ड असेल पण लंबी रेस का घोडा आहे. मुंबई वेचून वेचून असले प्लेअर काढते आणि तयार करते. उगाच नाही ते चॅम्पियन आहेत.

*मुंबई वेचून वेचून असले प्लेअर काढते आणि तयार करते* - खरःय. 2018च्या भारताच्या द. आफ्रिकेच्या दौरयापासून मुबई या तेंव्हाचया 17 वर्षीय खेळाडूवर लक्ष ठेवून होती, असंही वाचनात आलं. रोहितने टाॅस नंतरच्या टीमविषयीचया बोलणयात या 'लंबू' गोलंदाजाचा खास उल्लेखही केला.
( शिवाय, ' base price 'ला हा गोलंदाज घेण्यातला ' Ambani business touch ' आहेच ! Wink )

Pages