Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*....दुरंगी लढती आताशा फारच
*....दुरंगी लढती आताशा फारच मोनोटोनस व्हायला लागल्यात...* - +1
>>>>>
+७८६
कारण त्या निर्णायक लढतीपर्यंत नेल्या जातात
रोड सेफ्टी सीरिज लिजेंड चे
रोड सेफ्टी सीरिज लिजेंड चे सामने झाले रायपुर ला ,तिथले पीच खूप चांगले बनवले होते.
पंतला squad मध्ये घेण्यात
पंतला squad मध्ये घेण्यात थोडी घाई केली असे मला वाटते.
तो backup keeper म्हणुनच राहण्याची जास्त शक्यता आहे. कोहलीने एखाद दुसरा गेम स्किप केला तर यादव किंवा पंतचा नंबर लागू शकेल.
>>>>>>
पंतचा मायबोलीवरचा सर्वात मोठा चाहता (ते सुद्धा पंत हा द ऋषभ पंत बनायच्या आधीपासूनचा चाहता) म्हणून मला या पोस्टचे उत्तर तेव्हाच द्यायचा फार मोह होत होता.
पण संधी मिळताच ते उत्तर पंतच देईल हा मला विश्वास होता
पंतला पुन्हा वन डे स्क्वाड नाही तर अकरात संधी द्यायची हिच वेळ होती. सध्याचा त्याचा पर्पल पॅच आणि वाढलेला आत्मविश्वास पाहता आता नाही तर कधी संधी देणार होते.
संधी मिळाली आणि त्याने ती वापरत या संघातील आपली भुमिका काय हे दाखवून दिले.
बाकी त्याने जे टेस्टमध्ये केले ते पाहता जिथे ३५० चा पाटा पिच नसून २५० ची स्पोर्टींग विकेट असेल तिथेही तो मॅचविनर ठरू शकतो, किंबहुना जास्तच..
रोड सेफ्टी सीरिज लिजेंड चे
रोड सेफ्टी सीरिज लिजेंड चे सामने झाले रायपुर ला ,तिथले पीच खूप चांगले बनवले होते.
>>
मी त्या सामन्याचा एकही बॉल पाहिला नाही त्यामुळे नक्की सांगू शकत नाही. पण अश्या प्रदर्शनीय सामन्यात बुजुर्ग लोकं फुल्ल स्ट्रेंथने खेळत नसतात. त्यातही प्रत्येकाचा वयानुसार फिटनेस वेगळा असतो. त्यामुळे तितके कॉम्पिटीटीच क्रिकेट होत नसल्याने पीच बद्दलही नेमके सांगता येऊ शकत नाही..
पंतचा मायबोलीवरचा सर्वात मोठा
पंतचा मायबोलीवरचा सर्वात मोठा चाहता (ते सुद्धा पंत हा द ऋषभ पंत बनायच्या आधीपासूनचा चाहता) म्हणून मला या पोस्टचे उत्तर तेव्हाच द्यायचा फार मोह होत होता. >> ओ गदाधारी भीम जरा खाली बसू घ्या
पंतला स्क्वाड मध्ये घेण्यात घाई केली ह्याचा अर्थ पंत चांगला खेळत नाही असा नसून... तो एकटा आधी लांबलचक पूर्ण ऑसी सिरीज मग लगोलग ईंग्लंड टेस्ट आणि टी२० होम सीरीज जवळजवळ प्रत्येक मॅच खेळलेला असतांना, त्यात तो फुल टाईम कीपर आहे असे सगळे बघून त्याचे वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून आयपीएल आधी त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे असा अर्थ आहे. (ऊस गोड लागला म्हणून घाईने मुळासकट खाऊ नये..पुरवून पुरवून खावा.) मागच्या चारेक महिन्यात त्याच्या एवढे क्रिकेट खुद्द कॅप्टन कोहली सुद्धा खेळलेला नाही.
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
तुम्ही पंतला स्क्वाडमध्ये घेण्यात घाई केली असे जे म्हणालात त्यामागचे खरे कारण काहीही असले तरी माझी पोस्ट शब्द न शब्द तशीच राहणार की हिच त्याला स्क्वाडमध्ये घेण्याची योग्य वेळ होती.
राहिला प्रश्न तुम्ही देत असलेल्या अति क्रिकेट कारणाचा तर आता आपल्याकडे पर्याय खूप झाले असल्याने आणि कोरोना क्वारंटाईन नियम बबलची झंझट वगैरेमुळे खूप जणांना आलटून पालटून संधी मिळत आहे त्यामुळे हे असे वाटत आहे. अन्यथा हे अति क्रिकेट आधीही तिन्ही फॉर्मेट खेळणारे प्लेअर खेळत होतेच. धोनी खेळत होताच.
एक बबलमध्ये राहण्याचा मानसिक थकवा असेल पण शारीरीक श्रमाचे म्हणाल तर पंतचा फिटनेस पाहता तो सहज झेपवण्याईतकेच क्रिकेट खेळला आहे. कोहली खेळला नाही ते त्याच्या वैयक्तिक कारणाने, काही थकवा आला म्हणून नाही
आणि हो, काल निर्णायक सामन्यात पंत डबल घेतानाही कसले धावत होता, वाईडचे बॉलही कसला उड्या मारून मारून अडवत होता, कॅच पकडायलाही थर्डमॅनपर्यंत धावत जात होता. कुठेही तो फिटनेस इश्यूमुळे ९९ % वा त्यापेक्षा कमी देत होता असे वाटत नव्हते.
@ असामी,
@ असामी,
काल निर्णायक सामन्यात निर्णायक क्षणी अंपायरने वूडला एलबीडब्ल्यू बाद दिलेले पाहिले का? रिव्यू मध्ये नाबाद ठरला. पण लेग बाईजचा रन गेला आणि महत्वाचे म्हणजे सॅम करनचा स्ट्राईक जात वूडकडेच राहिला.
बॅडलक आहे हे, पण यावर उपाय एकच असू शकतो की बॉल आधी पुर्ण डेड होऊ द्यावा. म्हणजे त्यावर जे काही रन धावायचे आहेत ते धावणे होऊ द्यावे मग ऑनफिल्ड अंपायरने आपला निर्णय द्यावा. मगच तो नाबाद ठरल्यावर त्या धावलेल्या धावा देता येतील. त्याधीच अंपायरने आपला निर्णय बाद असा दिला तर तो बॉल नाईलाजाने डेडच धरावा लागणार त्याला पर्याय नाही.
पण प्रॅक्टीकली आता अंपायरने त्या ईन्स्टिक्टनुसार तात्काळ निर्णय न देता तो मनात नक्की करून बॉल पुर्ण डेड होईपर्यंत थांबणे शक्य आहे का? मानवी मनाला हे अवघड आहे.
कुठेही तो फिटनेस इश्यूमुळे ९९
कुठेही तो फिटनेस इश्यूमुळे ९९ % वा त्यापेक्षा कमी देत होता असे वाटत नव्हते. >> अरे तो दर सामन्यात असेच १००% देत राहावा म्हणून तर तो बर्ग म्हणतोय कि रोटेट करायला हवे.
पण लेग बाईजचा रन गेला आणि महत्वाचे म्हणजे सॅम करनचा स्ट्राईक जात वूडकडेच राहिला. >> मग मी काय वेगळे म्हणत होतो इतका वेळ ? अंपायरच्या निर्णय झाला की बॉल डेड होणे हे आजवर योग्य होते पण रीव्ह्यू सिस्टीम मुळे जर निर्णय बदलला जाऊ शकत असेल तर काही गोष्टी करायला परवानगी द्यायला हवी. आय्सीसी चे मोठे पॅनेल आहे जे अशा गोष्टींवर विचार करून नियम बदलते त्यात विचार झालेला बघायला आवडेल.
राहिला प्रश्न तुम्ही देत
राहिला प्रश्न तुम्ही देत असलेल्या अति क्रिकेट कारणाचा तर आता आपल्याकडे पर्याय खूप झाले असल्याने आणि कोरोना क्वारंटाईन नियम बबलची झंझट वगैरेमुळे खूप जणांना आलटून पालटून संधी मिळत आहे त्यामुळे हे असे वाटत आहे. अन्यथा हे अति क्रिकेट आधीही तिन्ही फॉर्मेट खेळणारे प्लेअर खेळत होतेच. >> अरे ही वन डे सिरीज खूप कमी मह्त्वाची आहे हे कोहली १०० वेळा म्हणाला असेल. टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने आयपीएलला जास्त महत्व आहे. फॅमिली पासून चार पाच महिने लांब राहून एवढे घणघणाती क्रिकेट खेळून आधीच दमलेल्या जीवाला (पाठोपाठ दोन अवघड दौरे केल्यावर टीवीवर त्याला पळतांना बघून तुझे म्हणणे असेल तो दमला नसेल तर तू धन्य आहेस) शारिरिक आणि मानसिक विश्रांती मिळते की नाही बघणे हे सुद्धा कॅप्टनचे काम आहे. कोहली जर पांड्या च्या वर्कलोडबद्दल बोलत असेल तर पंत कडे सुद्धा बघितले पाहिजे. किशनला राहुलचा बॅकअप कीपर म्हणून ठेऊन घेऊ शकले असते.
अय्यरची ईंजुरी नसती ऊद्भवली तर पंत एकही मॅच खेळलाच नसता. म्हणून त्याला सुंदर सारखे स्क्वाड मध्ये आहे म्हणून खोळंबून न ठेवता आधीच सुटी द्यायला हवी होती.
Curious Case of Hardik Pandya
Curious Case of Hardik Pandya
२०१५ च्या आयपीएलमधे डेब्यु केल्यानंतर त्या जोरावर जानेवारी २०१६, म्हणजे सुमारे पाच वर्षांहून अधिक काळापासून हार्दिक पांड्या भारतीय टी २० संघाचा हिस्सा आहे. या कालवधी मधे त्यानी ४८ अंतर्राष्ट्रीय सामन्यांच्या ३२ डावांमधे त्यानी साधारण २० च्या सरासरीनी धावा केल्या आहेत. त्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही (आयपीएलमधे त्याची सरासरी साधारण ३० आहे आणि ६० डावांमधे ४ अर्धशतकं करताना स्ट्राईक रेटही सुमारे २० नी अधिक आहे)
गोलंदाजीमधे त्यानी अंतर्राष्ट्रीय सामन्यांमधे ४४. डावांमधे ८ च्या धावगतीनी धावा देताना २६.७ च्या अॅव्हरेजनी ४१ बळी मिळवले आहेत तर आयपीएल. मधे ६० डावात ९ च्या धावगतीनी ४२ बळी घेतले आहेत.
यावरून आपण असं म्हणूया का की हार्दिक पांड्या हा एक चांगला आयपीएल बॅट्समन अन डीसेंट इंटरनॅशनल बोलर आहे.
टी२० इंटरनॅशनल सामन्यांमधे अॅज अ बॅट्समन त्याचा फारसा इंपॅक्ट नाही.
त्यामुळे, जर तो बोलिंग करणार नसेल, तर आगामी टी २० वर्ल्डकपसाठी त्याला कशाच्या जोरावर टीममधे जागा द्यायची?
मग मी काय वेगळे म्हणत होतो
मग मी काय वेगळे म्हणत होतो इतका वेळ ?
>>>>
@ असामी,
आपण केवळ अन्याय झाला म्हणत होता पण नेमके विश्लेषण करत नव्हता. सोशलमिडीयावर दर दुसरी व्यक्ती तेच करत होती. म्हणून मला लिहावेसे वाटले ईतकेच..
@ हायझेनबर्ग, आपण ऋषभ पंतला अतिक्रिकेटमुळे घ्यायला नको होते म्हणालात हे खरे मानले तरी ते कारण फारच गौण आहे आणि या कारणासाठी त्याचे एकदिवसीय पुनरागमन लांबवणे चुकीचेच ठरले असते.
तरी शक्य झाल्यास स्वत:ला ऋषभ पंतच्या जागी ठेऊन विचार करा. उत्तर आपसूक मिळेल
@ हार्दिक पांड्या,
@ हार्दिक पांड्या,
तो वर्ल्डकपला बॉलिंग नक्की टाकणार. त्याचे दुखणे पुन्हा ऊचल काढायला नको म्हणून त्याला जास्त जास्त कामाला लावत नाहीयेत ईतकेच
आणि त्याची फलंदाजी गेले वर्ष दोन वर्षे उंचावली आहे. त्याने आपला फटकेबाजीचा स्टान्स बदलला आहे. सरळ बॅटने मोठे फटके खूप चांगले मारू लागला आहे. त्यामुळे त्याची फटकेबाजी जास्त भरवश्याची झाली आहे. आधीचे आकडे विसरून त्याचे आताचे आकडे बघितले तर नक्कीच वेगळे चित्र दिसेल. मग ईंटरनॅशनल असो की गेले एक दोन आयपीएल..
आपण केवळ अन्याय झाला म्हणत
आपण केवळ अन्याय झाला म्हणत होता पण नेमके विश्लेषण करत नव्हता. सोशलमिडीयावर दर दुसरी व्यक्ती तेच करत होती. म्हणून मला लिहावेसे वाटले ईतकेच.. >> त्या विषयाचे विश्लेषण करणे हे माझ्या वकूबाबाहेर असेल म्हणून केले नसेल , असा विचार करून बघ. जिथे रीव्ह्यू मागीतला जाऊ शकतो तिथे दोन्ही पक्षांनी नॉर्मल अॅक्टिव्हिटी सुरू ठेवाव्यात नि रिव्ह्यू च्या निर्णयाप्रमाणे त्या बाद वा सामील धरल्या जाव्यात एव्हढा कॉमन सेन्स चा विचार माझ्यापुरता पुरेसा आहे.
जिथे रीव्ह्यू मागीतला जाऊ
जिथे रीव्ह्यू मागीतला जाऊ शकतो तिथे दोन्ही पक्षांनी नॉर्मल अॅक्टिव्हिटी सुरू ठेवाव्यात
>>>>
पुन्हा कन्फ्यूजन.
१)/जर नॉर्मल ॲक्टीव्हिटीनुसार बॅटसमन दोन रन मिळत असतील म्हणून दोन रन्स घेत बसला तर रिव्यू मागायचे काम कोण करणार?
२)/जर बॅटसमन चिकी सिंगल घ्यायच्या प्रयत्नात असेल पण अंपायरने बाद दिल्याने क्षणभर थबकला आणि त्या नादात रन आऊट झाला तर ती जबाबदारी कोणाची? भले तो मनात घोटून बसला असेल की न थांबता नॉर्मल ॲक्टीव्हिटी करत धावतच राहायचे तरी भाँ केले की बाचकणे हे नैसर्गिक असते.
मग पुन्हा अन्याय पुन्हा नियम बदला
म्हणून तर भावनिक न होता विश्लेषण करणे गरजेचे..
म्हणून तर भावनिक न होता
म्हणून तर भावनिक न होता विश्लेषण करणे गरजेचे.. >> go ahead and do it. No one is stopping you from doing so. माझ्यासाठी कॉमन सेन्स पुरेसा आहे रे. आता तू तो वापरून तुझ्या वरच्या दोन प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करून पहा बरं.
२)/जर बॅटसमन चिकी सिंगल
२)/जर बॅटसमन चिकी सिंगल घ्यायच्या प्रयत्नात असेल पण अंपायरने बाद दिल्याने क्षणभर थबकला आणि त्या नादात रन आऊट झाला तर ती जबाबदारी कोणाची? >>

बुद्धीभेद करत वाद घालतांना आपण समोरच्याचा गुगली सीमारेषा पार धाडल्याचा आनंद व्यक्त करण्याआधी निर्बुद्धतेच्या स्टंपला आपला पाय लागून आपण हिट विकेट तर झालो नाही ना ह्याचा रिव्यु आपणच घेत रहावा हे बरे.
जसे फील्डर्स सरावा दरम्यान हजार कॅचेस घेऊनही मॅचमध्ये कॅच सोडू शकतात, बॅट्समनने हजार वेळा स्लॉग करावयाचा बॉल सिक्स मारलेला असतांना ईनसाईड एज लागून बोल्ड होऊ शकतो, हुकमी यॉर्कर टाकणारा ऐन वेळी फुलटॉस टाकून सिक्स खाऊ शकतो तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेते? ह्यातली कुठलीही चूक मॅच हारायला पुरेषी ठरू शकते.
अंपायर हा सुद्धा बोलर, बॅट्समन एवढाच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्वाचा घटक आहे. न्यायाधीश राजापेक्षाही मोठा असतो असे म्हणतात. दोनशे वर्षापासून आजपर्यंत २२ खेळाडूच क्रिकेट खेळत आहेत अंपायर मात्र दोनाचे चार (थर्ड आणि रेफ्री धरून) झाले त्यांना नवनवीन टेक्नॉलॉजीची मदत दिली गेली. तर मुद्दा हा की ग्राउंडवरच्या पंधरा लोकांपैकी कोणाकडूनही चूक होऊच शकते. खेळाडुंच्या चुकीचे जसे कॉन्सिक्वेन्सेस असतात तसे अंपायरच्या चुकीचे सुद्धा असू शकतात आणि तो खेळाचा भाग आहे. पंतला किंवा वूडला आधी आऊट दिल्याने आणि नंतर ते नॉट आऊट ठरल्याने दोन चार रन्स मिळाले नाहीत किंवा करन ला स्ट्राईक मिळाली नाही हे सोयीस्कर रित्या अन्यायकारक वाटले तरी तसे काही नाही. जोवर नियम दोन्हीसाईड साठी सेम आहेत तोवर अन्याय झाला वगैरे गळेकाढूपणा झाला.
जर तुम्हाला डिसीजन चुकल्याने आपले रन्स जातील ही भिती असेल तर अंपायरला आऊट द्यावेसे वाटेल असा शॉट न खेळण्याची चॉइस आहेच की. पण तुम्हाला अंपायर्सने निर्णय देण्यात केलेली चूक आणि तेही रिव्यु सिस्टीम असतांना खेळात व्यत्यय, खेळाचा रिझ्ल्ट बदलला वगैरे वाटत असेल.. तुम्ही क्रिकेट समजण्यातला महत्वपूर्ण भाग ऑप्शनला टाकला असेच म्हणेन.
एक ऊदाहरण देतो....
श्रीलंकेविरूद्ध सेहवाग ९९ वर खेळतांना आणि भारताला जिंकायला १ रन पाहिजे असतांना सेहवागने सिक्स की फोर मारली. पण बोलरने नो बॉल टाकला होता आणि अंपायर ने 'नो बॉल' चा सिग्नल देताच मॅच संपली... सेहवाग ने सिक्स मारून सुद्धा त्याचा पर्सनल स्कोर ९९च राहिला.
अंपायर्स डिसीजन ईज लास्ट डिसीजन... आणि त्याने तो दिला की बॉल डेड झाला. रिव्यू सिस्टीम मुळे तुम्हाला संशयाचा फायदा मिळू शकतो आणि विकेट वाचवता येऊ शकते..पण ऑन फील्ड अंपायरने ज्या मोमेंट्ला त्याचे डिसीजन रूल्ड केले तेव्हा तो बॉल डेड झाला. ईट ईज अॅज सिंपल अॅज दॅट.
रिव्यू सिस्टीम नसती तर तुम्ही पाय ओढत पॅवेलिअनमध्ये गेलाच असता नाही का? जिथे विकेटच नाही राहिली तिथे रन्स कुठले मिळायला?
.
.
बिग ब्रेकिंग
पंतला दिल्ली कॅपिटल्सने कप्तान केले
जीव घेणार पोराचा
.
श्रीलंकेविरूद्ध सेहवाग ९९ वर
श्रीलंकेविरूद्ध सेहवाग ९९ वर खेळतांना आणि भारताला जिंकायला १ रन पाहिजे असतांना सेहवागने सिक्स की फोर मारली. पण बोलरने नो बॉल टाकला होता>>> तो नो बॉल मुद्दाम टाकला होता. दिलशानच्या सांगण्यावरून.
धोनीने (MS Dhoni)
धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चहल आणि कुलदीप यांचा फॉर्म ढासळला आहे. धोनी टीममध्ये असताना कुलदीप यादवने 47 मॅचमध्ये 22.53 ची सरासरी आणि 27.8 च्या स्ट्राईक रेटने 91 विकेट घेतल्या. तर चहलने धोनी असताना 46 मॅचमध्ये 25.32 ची सरासरी आणि 30.7 च्या स्ट्राईक रेटने 81 विकेट घेण्यात यश मिळवलं.
धोनीच्या निवृत्तीनंतर मात्र या दोघांच्या कामगिरीने निच्चांक गाठला आहे. कुलदीपने धोनीच्या निवृत्तीनंतर खेळलेल्या 16 मॅचमध्ये 61.71 च्या सरासरीने आणि 9.6 च्या स्ट्राईक रेटने 14 विकेट घेतल्या, तर याच कालावधीमध्ये चहलने 8 मॅचमध्ये 41.82 च्या सरासरीने 36.9 च्या स्ट्राईक रेटने 11 विकेट मिळवल्या. धोनी टीममध्ये असताना कुलदीपचा इकोनॉमी रेट 4.87 होता, तर धोनीनंतर हीच आकडेवारी 6.22 झाली. दुसरीकडे चहलचा इकोनॉमी रेट धोनी असताना 4.95 तर धोनीच्या निवृत्तीनंतर 6.80 झाला.
या विकेट घेण्यात खेळपट्टी मागून धोनीची मदत मिळत असल्याचं दोघांनी अनेकवेळा सांगितलं, पण आता धोनी निवृत्त झाल्यानंतर या दोघांचं करियरच धोक्यात आलं आहे.
त्या दोघांची गोलंदाजी आता
त्या दोघांची गोलंदाजी आता सगळे भरपूर खेळले आहेत, आणि त्यांनी आपल्या गोलंदाजीत काही नवीन अस्त्र ऍड केले नाहीत म्हणून ही परिस्थिती आहे. या series मध्ये अजून एक गोष्ट सिद्ध झाली की विकेट्स पडल्या की टुकू टुकू खेळायचे आणि अगदी शेवटी आक्रमण करायचे ही धोनीची पध्दत अत्यंत निरुपयोगी आणि कालबाह्य झाली आहे
विकेट्स पडल्या की टुकू टुकू
विकेट्स पडल्या की टुकू टुकू खेळायचे आणि अगदी शेवटी आक्रमण करायचे ही धोनीची पध्दत अत्यंत निरुपयोगी आणि कालबाह्य झाली आहे
>>>>>
बिलकुल नाही.
गेल्या सामन्यात आपण ५० ओवर सुद्धा पुर्ण खेळलो नाही. तरी सुदैवाने पंत पांड्या मारताना जरा आधी आऊट झाले नाही अन्यथा ३०० च्या आसपास टारगेट सायकोलॉजिकली खूपच सोपा झाला असता. अर्थात ते अखेरपर्यंत मारत मारत टिकले असते तर ४०० सुद्धा झाले असते. पण गरजेपेक्षा जास्त मारूनही काय फायदा. त्यामुळे कॅल्क्युलेटीव्ह खेळणारा फलंदाज नेहमीच सरस. धोनी तर यात सर्व जगाचा बाप होताच. पण आता पंतही तेच शिकतोय. त्याची खरी कसोटी हा पर्पल पॅच संपल्यावर जेव्हा मारण्यात लवकर बाद होऊ लागेल तेव्हा होईल. पण आताही तो चांगली इनिंग पेस करतोय. या सामन्यातही आधी काऊंटर अटेक करत मोमेंटम पुन्हा भारताच्या बाजूने वळवले. आणि जेव्हा पांड्याही चांगल्या हिटींग मूडमध्ये दिसला तेव्हा पंतने आपली फटकेबाजी सिलेक्टीव्ह केली.
विकेट्स पडल्या की टुकू टुकू
विकेट्स पडल्या की टुकू टुकू खेळायचे आणि अगदी शेवटी आक्रमण करायचे>>> कसलं आक्रमण??? दोन तीन फोर मारून विकेट टाकायची हा प्लान असायचा त्याचा. त्या टुकू टुकू खेळण्यात समोरचा कधी चांगला खेळला तर चांगली धावसंख्या उभी रहायची आणि त्याचं क्रेडीट पण धोनीच घ्यायचा.
त्याचं क्रेडीट पण धोनीच
त्याचं क्रेडीट पण धोनीच घ्यायचा >> स्वतःहून मागून घ्यायचा की लोकं द्यायचे
जेवढे मी स्टीव्ह वॉला पाहिलेय तो सुद्धा असेच करायचा, तळाच्या फलंदाजांना स्ट्राईक देत स्वतः त्यांच्यासोबत ऊभा राहायचा.
धोनीही समोर उभा राहायचा म्हणून समोरचे त्यासोबत खेळायचे. कधी विकेट पडू लागल्या की तिथे धोनीला टाका तो पडणारी सायकलची लाईन थांबवतो हे ठरलेलेच.
जर २०१९ सेमीला त्याला कार्तिक आणि पांड्याच्या पुढे पाठवला असता तर वर्ल्डकप आपला असता. पंत चुकीचा फटका मारून बाद झाला नसता आणि पांड्याला जे जमते ते करायला तो मागे शिल्लक राहिला असता.
बाकी धोनीच्या फटकेबाजीच्या क्षमतेवर संशय घेणे म्हणजे सुर्याला काजवा फेकून मारण्यासारखे झाले.
2010 नन्तर धोनीची फटकेबाजी
त्याचं क्रेडीट पण धोनीच घ्यायचा >> स्वतःहून मागून घ्यायचा की लोकं द्यायचे>>> लोक्स तर त्याला घालून पाडून बोलायचे. तो स्वतः त्याच्या देहबोलीतून त्याच्यामुळेच धावा झाल्यात असं दाखवायचा. 2010 नन्तर धोनीची फटकेबाजी खूपच कमी झालेली. त्याच्यात अजिबातच फास्ट खेळायची क्षमता न्हवती. त्यामुळे तो वाटच पाहायचा कधी एकदा विकेट्स पडताहेत आणि टुकू टुकू खेळायला मिळतंय. त्याची बॅटिंग बघायला अनेक लोकांना प्रचंड बोरिंग वाटायचं पण देशप्रेमामूळे ते तो अन्याय सहन करायचे. 2011 नन्तर तर धोनी संपल्यात जमा होता.
बोकलत यांच्याशी सहमत, धोनी नी
बोकलत यांच्याशी सहमत, धोनी नी 2011 नंतर स्लो खेळून बऱ्याच मॅचेस हरवल्या आहेत, ते आता त्याच्या आकडेवारी वरून नाहीं कळणार, ज्यांनी त्या matches पूर्ण बघितल्या आहेत त्यांना ते ठाऊक आहे, नंतर नंतर धोनी स्वात: शेवटच्या ओव्हर मध्ये match जिंकवून देतो या त्याच्या चाहत्यांनी तयार केलेल्या image च्या प्रेमात पडून गरज नसताना शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच न्यायचा
धोनी ने जो T20 सामना सर्वात
धोनी ने जो T20 सामना सर्वात मोठा पाठलाग करत जिंकलो असतो तो फक्त आणि फक्त मीच विजयी फटका खेळणार म्हणून केवळ एका धावेने हरलो. राहुल ने शतक केलं होतं आणि स्ट्राइक रेट पण चांगला होता पण धोनी ने मोठ्या फटक्या च्या नादात सामना घालवला बरं नाबाद राहिला.
असंच सेम टू सेम त्याने अंबाती रायडु सोबत केलं आणि तो पण सामना घालवला होता... त्याची लिंक
https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-2014-667693/en...
एका सामन्यात त्याने विजयी
एका सामन्यात त्याने विजयी फटका खेळायला विराट ला दिला होता याचा दाखला देऊ नका कारण तो सामना अटीतटीचा नव्हता. त्यावेळी धोनी ने कशी मॅच काढली याची चर्चा झाली नसती... मग नवीन आयडिया...
2011 च्या वर्ल्ड कपला धोनी
2011 च्या वर्ल्ड कपला धोनी घाबरला होता शेवटी मॅच फुगते की काय. फुगली तर आपल्याला मारता नाही येणार हे तो पुरेपूर ओळखून होता. मलिंगा फॉर्मात होता तेव्हा. त्यामुळे घाबरून युवराजच्या पुढे आला बॅटिंगला. वर्ल्ड कप नंतर जी काय भारतीय संघात csk खेळाडूंची खोगीर भरती सुरू केली विचारू नका शिव शिव शिव...
विकेट्स पडल्या की टुकू टुकू
विकेट्स पडल्या की टुकू टुकू खेळायचे आणि अगदी शेवटी आक्रमण करायचे ही धोनीची पध्दत अत्यंत निरुपयोगी आणि कालबाह्य झाली आहे >> अगदी १००% असे म्हणणे धाडसाचे होईल. तुमची बॅटींग डेप्थ किती आहे ह्यावर हे अवलंबून असणार. इंग्लंड सारखे संघ ज्यांचे ८-९ नंअबरचे फलंदाज चांगली बॅटींग करू शकतात त्यांना हे परवडते. आपण जेंव्हा ७-८ पासून चहल, यादव आणायचो तेंव्हा आपल्याला हे परवडणारे नव्हते. आता तिच जागा ठाकूर, सुंदर घेतात म्हणून माज करता येतो.
Jos Buttler sees 'shades' of
Jos Buttler sees 'shades' of MS Dhoni in Sam Curran
https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/england-in-india/jos-...
बाकी चर्चा चालत राहतील, पण जब तक सूरज चांद रहेगा धोनी तेरा फिनिशर नाम रहेगा
2010 नन्तर धोनीची फटकेबाजी खूपच कमी झालेली.
>>>>>>
फक्त विश्चचषक अंतिम सामन्यात मुरली आणि मलिंगासमोर येऊन ७९ चेंडूत ९१ धावांची खेळी तेवढी त्याने केली होती.
2011 नन्तर तर धोनी संपल्यात जमा होता.
>>>
भारतीय विकेटकीपरचे पहिले द्विशतक देखील त्याच्याच बॅटमधून ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली आले होते.
२०११ च्या नंतरच्याही कैक इनिंग दाखवू शकतो ज्यात आधीचे कोसळल्यावर धोनीने जिंकवून दिले.
अगदी ते वर्ल्डकपपूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्यातही एकदिवसीयमध्ये मालिकावीर धोनीच होता
मागे खेळायला येऊनही त्याने कैक सामनावीरच नाही तर मालिकावीरही मिळवले आहेत. कारण जिथे पुढे सामना फसला तिथे तो सातत्याने हमखास खेळायचाच खेळायचा.
कम ऑन, चेस करताना विजयी सामन्यांमध्ये १०० चा ब्रॅडमॅनिश एवरेज हि मस्करी नाही. खुद्द ब्रॅडमॅन यांनाही हे जमले नसते कारण ते प्रेशर हॅण्डल करायला एक वेगळेच स्किल लागते.
आणि जर तो टॉप ऑर्डर प्लेअर असता तर कोहली सचिनचा नाही तर धोनीचा शतकांचा विक्रम चेस करत असता
Pages