netflix आणि prime वर असणारे वेगळे चित्रपट

Submitted by झम्पू दामले on 31 January, 2021 - 11:21

इथे वेबसिरीजवर वेगळा धागा आहेच. पण Netflix, prime आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवर काही फार सुंदर चित्रपट आहेत. काही चित्रपटांची नावे आधी कधीही ऐकली नाहीत पण पाहिल्यानंतर मनोरंजन पुरेपूर होते. मला वैयक्तिक हॉरर आणि थ्रिलर हा genre आवडतो. त्यात तो चित्रपट शहरात न घडता एखाद्या गावात, जंगलात किंवा निर्मनुष्य रस्त्यावर घडला असेल तर खूपच छान. त्या genre चे काही चित्रपट खाली देत आहे. तुम्हाला पण आवडलेले काही हटके चित्रपट आवडल्यास सांगावेत.
1. Calibre ( Netflix)
दोन अमेरिकन मित्र शिकारीसाठी स्कॉटलांडला मधल्या एका दुर्गम गावात येतात. गावातले लोक फार welcoming नसतात. त्यांच्या कडून तिथे एक अपघात होतो आणि मग अपघात लपवण्याच्या प्रयत्नात ते अजून अडकत जातात.
स्कॉटलंड मधलं वातावरण, गावातल्या लोकांचा थंडपणा, दोघांची अपराधीपणाची भावना हे फार सुरेख पध्दतीने रंगवले आहे. जरूर पहावा.
2. Hush
एक मूकबधिर मुलगी लेखणासाठी घरात एकटीच रहात असते. एक मास्क घातलेला मरेकऱ्याला घरात प्रवेश हवा असतो. तिचा मारेकऱ्यां पासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न फार छान दाखवला आहे. चित्रपट दीड तास प्रेक्षकाना गुंतवून ठेवतो.
3. The Ritual
चार मित्र एका दुर्गम ठिकाणी हायकिंग साठी जातात. शॉर्टकट घेतल्यावर एका जंगलात रस्ता चुकतात. त्या जंगलात एक "काहीतरी" त्यांचीच वाट पाहत असते. चार जणांची अगतिकता, हाताशपणा, भीती फार छान दाखवली आहे.
अशाच थीम वर The Ruins चित्रपट पण छान आहे
4. Dead Birds ( Prime Video)
हा चित्रपट जुना आहे. दरोडेखोरांची टोळी एक बँक लुटून घोड्यांवर सुरक्षित ठिकाणी पोचण्यासाठी प्रवास करत असते. एका जुनाट घरात रात्रीच्या असरायासाठी थांबतात. आणि मग रात्रीतून वेगळाच खेळ सुरू होतो. चित्रपट छान आहे.

अमेरिकन चित्रपटानं मध्ये बऱ्याच वेळेला एक तरुण मुलामुलींचा ग्रुप कुठेतरी प्रवासाला निघतात. एका पेट्रोल पंपावर थांबतात. तिथे कोणीतरी तिर्हाईक व्यक्ती त्यांना पुढे जाऊ नका असे काहीतरी सांगते. पण तो गट ते ऐकत नाही आणि मग त्यांना भेटते भूत/ चोर/ दरोडेखोर/विक्षिप्त खुनी किंवा कोणतातरी प्राणी. अशा स्टोरीलाईन वर असलेले चित्रपट पण मला आवडतात - House of Wax, Texas chainsaw massacre, Hills have Eyes, The wrong turn, Jeepers Creepers, The Pack, The Cabin in woods, The Hostel इत्यादी.
तुमच्या आवडीचे चित्रपट पण सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Horns पाहिलाय. छान आहे.

गंमतीचा भाग म्हणजे प्रसिद्ध लेखक स्टिफन किंग यांचा मुलगा जोसेफ हिलस्टोर्म किंग उर्फ "ज्यो हिल" च्या कादंबरीवर हा सिनेमा आहे.

हा ज्यो बापाइतकाच भारी लिहितो. त्याच्या "ट्वेन्टिइथ सेंच्युरी घोस्ट्स" नावाच्या संग्रहातली "बेस्ट न्यू हॉरर" नावाची कथा वाचून अक्षरश: झोप उडाली होती.

Ugly (Prime)
माणूस वयाने जसा जसा मोठा होत जातो तशा त्याच्या संवेदना बोथट होत जातात. किंवा मुद्दामहून तो संवेदनशीलता गमावून बसतो कारण ह्या जगात वावरतानी स्ट्रीट स्मार्टनेसची गरज असते. पण कधीतरी अशी काही कलाकृती सामोरी येते की पांघरलेला मुखवटा गळून पडतो आणि माणसाच्या मनातल्या साऱ्या असुरक्षितता गपकन त्याच्या समोर येऊन ठाकतात.
मी अनुराग कश्यपचा फार मोठा फॅन नाही पण हा चित्रपट एवढा सुंदर बनवला आहे की 2 दिवस चित्रपट डोक्यात कुठेतरी रेंगाळत राहतो. डोक्याला शॉट का काय म्हणतात तसं होतं चित्रपट पाहून. हिरो-हिरॉईन , रोमान्स गाणी अशा सर्व बॉलीवुडी एकाधिरशाहीला छेद देत असा चित्रपट बनवणे म्हणजे खरंच डेरिंग लागते. चित्रपट भर एक ग्रे शेड भरून राहिली आहे. तीच ग्रे शेड characters मध्ये पण उतरली की काय असा प्रश्न पडतो.
कॉलेज मधल्या क्रशला गुपचूप स्टॉक करणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी, नैराश्याग्रस्त आणि व्यसनात बुडालेली त्याची क्रश, एक स्ट्रगलर अभिनेता, मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणारा अभिनेत्याचा मित्र आणि ह्या सगळ्यांच्या आसपास वावरणारे त्यांच्या इतकेच विचित्र माणूस रुपी भुतं सगळंच प्रचंड अंगावर येतं. माणसाच्या आत मधली एक गहिरी काळी, ओरबाडून खाणारी, स्वार्थी बाजू ठळकपणे दाखवली आहे. सात्विक , सोज्वळ, हलकफूलक असं काही नाहीच. मध्ये एखादा रिलिविंग प्रसंग पण नाही. सगळंच प्रचंड डार्क आणि इंटेन्स. चित्रपट जसा जसा पूढे सरकतो तसे आपण एका काळ्या भोवऱ्यात अडकत चाललो आहे असं काहीतरी विचित्र फीलिंग येते.
काही काही प्रसंग जबरदस्त चित्रित केली आहेत.
1. सुरुवातीचा पोलीस स्टेशनचा पूर्ण सिक्वेन्स मध्ये गिरीश कुलकर्णीने कमाल केली आहे. ज्या लोकांचा पोलीस स्टेशनशी कधी संबंध आला असेल तर ते इथे रिलेट करू शकतील.
2. पोलीस कॉलनी मध्ये जेंव्हा नायकाला डांबून ठेवले असते तेंव्हा एक पोलीस डॉक्टरला घेऊन येतो. खोलीचं दार उघडून दोघे आत प्रवेश करतात तेंव्हा डॉक्टर डावीकडे पहातो( कॅमेराच्या दिशेने). त्याच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती दिसते. त्याने काय पाहिले हे प्रेक्षकांच्या कल्पनाशक्ती वर सोडून दिग्दर्शक पुढे सरकतो. त्या भीतीच्या अभिनयाला आणि दिग्दर्शकाला सलाम.
3. चित्रपटाचा शेवटचा प्रसंग - ह्या बद्दल न लिहिलेलंच बरं.

हा चित्रपट पाहिल्यानंतर हृषीकेश मुखर्जीचे 2-3 चित्रपट उतारा म्हणून पाहावे लागले.

हो खरंय. अगली पाहून डिप्रेस व्हायला झालं होतं. विशेषतः शेवट जो होतो - अ‍ॅक्चुअली तोच लॉजिकल आणि रिअ‍ॅलिस्टिक पण आहे तिथे .
पण आपल्याला होप वाटते उगीच आणि रिअ‍ॅलिटी समोर आल्यावर सुन्न व्हायला होतं.

सुरुवातीचा पोलीस स्टेशनचा पूर्ण सिक्वेन्स>> हा सीन म्हणजे एकप्रकारची भंकस दाखवली आहे. एक दीर्घ, भंकस चर्चा पण वर्थ अशी. Wink
असा एकतरी सीन अनुराग त्याच्या चित्रपटात ठेवतो. ती सिग्नेचरच आहे त्याची. टारांटीनो देखील असला प्रकार करतो.

हा सीन म्हणजे एकप्रकारची भंकस दाखवली आहे.
खरं आहे. पोलीसांमध्ये एक प्रकारची बेफिकरी असते. केस कितीही सिरीयस असली तरी पोलीस बऱ्याच वेळेला ढिम्म असतात. त्या सीन मध्ये एक लहान मुलगी हरवलेली असते आणि इन्स्पेक्टर जाधव दिलीप कुमार पासून आय फोन पर्यंत सगळ्या विषयावर चर्चा करत असतो.
गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, किशोर कदम हे अनुराग कश्यपचे आवडते मराठी कलाकार आहेत. त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसतात.

सुरुवातीचा पोलीस स्टेशनचा पूर्ण सिक्वेन्स>> तो सीन खरंच कमाल आहे! चित्रपट एकदा पाहिलाय, पण तो सीन अनेकदा.

Storytel app मला आवडते. चांगल्या मराठी कथा कादंबऱ्यांचे खूप छान आवाजात कथन केलेले असते. एवढ्यात स्टोरीटेलवर हृषीकेश गुप्ते लिखित आणि किशोर कदमच्या आवाजातली मृतयोपनिषद ऐकली. जबरदस्त कथानक आणि त्याला साजेसा किशोर कदमचा भन्नाट आवाज एकणाऱ्याला खिळवून ठेवतो. पण ही कथा अर्धवट आहे. इतरत्र ती मिळते का ह्याचा शोध घेतला पण गुप्तेनी ती खास स्टोरीटेल साठी लिहिलेली दिसते.
काल्पनिक देवमांडला ह्या गावचे भौगोलिक location आमच्या दापोली जवळच असल्या कारणाने ह्या कथेशी जास्त रिलेट झालो.
स्टोरीटेलवर काही flaws आहेत. जसे की कथेचे editing केलेले नाही म्हणून काही काही वाक्ये परत रिपीट ऐकू येतात. तसेच गुप्तेनी गाणू अज्जीची अंगाई ही कथा आहे अशी ह्या कथेत मध्येच पात्रांची नावे बदलून वापरली आहे. गुप्ते सारख्या गुणी लेखकाला असे का करावेसे वाटले असेल हे नवलच आहे. ह्या दोन flaws सोडले तर कथा एकण्यासारखी आहे. Dont miss it.

जोजी
- मल्याळम सिनेमे नुसते visual delight साठी पहावेत. गावाकडची मोठी इस्टेट. छान बंगला बागा वगैरे. एकत्र कुटुंब - वडील , तीन मुले. मधल्याचे नाव जोजी. वडील प्रचंड कडक. सगळ्या कुटुंबावर कंट्रोलिंग वगैरे. मुले मोठी झाली तरी आर्थिक स्वातंत्र्य नाही. वडिलांना मध्येच ब्रेन स्ट्रोक होतो. अपंगत्व येते. तो मारून जावा अशी काही घरातल्यांची इच्छा. म्हातारा आजारातून बरा होऊ लागतो. हवेहवेसे वाटणारे स्वातंत्र्य पून्हा हिरावून घेतले जाईल काय अशी भीती प्रत्येकाला वाटते. जोजी बापाला मारायचा प्लान बनवतो. तो यशस्वी होतो का? त्यांना स्वातंत्र्य मिळते का? खिळवून ठेवणारा हा चित्रपट नक्की पहा.

इरुल
एक भयकथा लेखक. त्याची कामात तुडुंब व्यस्त असलेली मैत्रीण. एकमेकांसोबत वेळ मिळत नाही म्हणून धुसफूस. दोघे सुट्टी घेऊन बाहेर पडतात. घाटात गाडी बंद पडते. एका घरात आसरा घेण्यास जातात. तिथे एक विचित्र माणूस त्यांचे स्वागत करतो. घराच्या तळघरात एक प्रेत असते. त्या प्रेताशी त्या विचित्र माणसाचा किंवा त्या दोघांचा काय संबंध? उत्तर मिळण्यासाठी चित्रपट पहा

इला विझा पूंचिरा
विचित्र नावाचा सुंदर चित्रपट. एका दुर्गम डोंगरावर पोलिसांचा बिनतरी संदेशवाहन टॉवर. त्याचे रक्षण आणि देखभाल करण्यासाठी छोटी पोलीस चौकी. चौकीत दोन पोलीस सदैव तैनात. त्या तालुक्यात ठरावीक अंतरावर माणसाचे कापलेले अवयव सापडत असतात. आवायवांपैकी एक हात डोंगरावरच्या चौकीत सापडतो. अवयव एवढ्या दुर्गम आणि सदैव राखण असलेल्या चौकी जवळ कसा गेला. का तैनातीत असलेल्या पोलिसांपैकी कोणी हे कृत्य केले असते. राहास्यासोबत सुंदर रित्या चित्रित केलेल्या नैसर्गिक दृश्यासाठी हा चित्रपट नक्की पहावा.

the bra/Amazon Prime खरे तर एक विचित्र आणि ऑडियो नसलेली फिल्म..

The Bra वेगळ्या विषयावरील सुंदर सिनेमा. शेवट तर फारच छान . परंतु हा सिनेमा amazon prime वर सापडला नाही, You tube वर आहे.
Irul नेटफ्लिक्स. predictable, उगाच मोठामोठ्याने ओरडणे. फालतू सिनेमा.
जोजी ठीकठाक.

छान धागा...

खाकी बिहार अध्याय ( Khadee: The Bihar Chapter) बघितला - एकदम मस्त आहे. कथेची मांडणी, सादरीकरण, धक्के आवडले; पोलीस अधिकारी ( करण ठकर/टॅकर) आणि खलनायक (अविनाश तिवारी) दोघांचेही अभिनय आवडले.

सध्या डिप्लोमॅट बघत आहे...

भूतकालम ( Sony Liv)
भयपट. बऱ्याच भयपटांमध्ये धक्कातंत्र आणि किळसवाणे विद्रुप भुतं दाखवून प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. हा चित्रपट त्या प्रकारात मोडत नाही. ही एका आई, मुलगा आणि घराची कथा. आई आणि मुलाचे नाते तणावपूर्ण असते. मुलगा त्याच्या आयुष्यातल्या अपयशासाठी आईला जबाबदार धरत असतो. आई- मुलगा दोघांचेही वैयक्तीक आयुष्य पण प्रचंड ताणाचे असते. वाढलेलं कर्ज, कमी उत्पन्न, डिप्रेशन. कथेची सुरुवात मुलाच्या आजीच्या वृद्धत्वामुळे आलेल्या मृत्यूने होते. थोड्या दिवसांनी मुलाला घरात आजीचा वावर असल्याचे भास होतात. सगळे त्या भासांचा संबंध त्याच्या वाढलेल्या दारू पिण्याशी जोडतात. आणि मग एका रात्री आईला पण तसेच भास होतात.
आईची भूमिका रेवतीने केलेली आहे. मुलाची भूमिका केलेल्या अभिनेत्याचे नाव माहीत नाही. पण दोघे अक्षरशः भूमिका जगले आहेत. अवश्य बघा.

रोमांचम ( डिस्ने हॉटस्टार)
- हॉरर कॉमेडी मध्ये मोडणारा चित्रपट. ६ बॅचलर मित्र एका घरात रहात असतात. त्यातला एकजण टाईमपास म्हणून एकदा औझा बोर्ड घेऊन येतो. मस्करीत बोर्ड वरचा ग्लास स्वतःच फिरवून इतरांची मजा घेत असतो. एक दिवस लक्षात येते की ग्लास आपोआपच फिरत आहे. चेष्टेत सुरू झालेली गोष्ट नंतर सिरीयस टर्न घेते. फार भारी नाही पण बघण्यासारखा आहे.

Death of Me ( Prime)
हँगओव्हर चित्रपटाचा गंभीर थ्रिलर बनवला तर कसा असेल तर डेथ ऑफ मी सारखा. एक जोडपं थायलंडला सुट्टी/कामासाठी आलेले असते. एका खेडयातल्या बार मध्ये त्यांना एक ड्रिंक प्यायला दिले जाते. ड्रिंक घेतल्यानंतरच अर्थातच त्यांना काही पुढचे आठवत नाही. जोडप्यामधल्या नवऱ्याच्या फोन मध्ये उत्तररात्री मधले काही व्हिडीओ असतात. त्या व्हिडीओ मध्ये अक्षरशः त्याने बायकोचा गळा दाबून खून करून जमिनीत पुरले असते. जमिनीत पुरले तर ती जिवंत कशी? मग सुरू होतो त्या रात्री नक्की काय घडले हे गूढ उकलन्याचा प्रवास.
चित्रपट ठीकठाक आहे

Sam was here
सॅम, एक चाळीशीतला सेल्समन असतो. ग्राहकांच्या शोधात कॅलिफोर्नियाच्या वाळवंटातील काही लोकवस्ती असलेल्या झोनमधून प्रवास करतो, तिथला सर्व भाग निर्जन असतो. गावे घरं पण रिकामी असतात. त्याची पत्नी त्याच्या कॉलला उत्तर देत नसते. वाळवंटात त्याची गाडी खराब होते. बरेच अंतर चालून गेल्यानंतर त्याला पोलिसांची गाडी दिसते. तो मदतीच्या आशेने गाडी कडे जातो तर त्याच्यावर गाडीतून गोळी झाडली जाते. पोलीस त्याच्यावर गोळी का झाडतात? सगळ्या घरांमधले लोक कुठे गेलेले असतात? त्याची पत्नी त्याच्या कॉलला उत्तर का देत नसते?
जरूर पहावा असा चित्रपट.

Doctor I love you - Youtube
एकदा बघायला हरकत नाही Thriller

Pages