दिगंत - ८

Submitted by सांज on 23 March, 2021 - 05:48

“मी गमतीत जे सुचेल ते बोलले यार.. मला काय माहित हा इथे येऊन धडकेल!” रिया हताशपणे म्हणाली.

“मला तर जाम मजा येतेय.. हम्पी मध्ये ‘बघण्याचा’ कार्यक्रम! वाह.. इन केस तुमचं ठरलं ना तर मी हा किस्सा तुमच्या पोरांना रंगवून रंगवून सांगेन.” संहिता तिची मजा घेत म्हणाली.

“ए गप गं.. पोरं-बिरं काय. मला काही सुचत नाहीये इथे आणि तू मजा घे..”

“एव्हढं काय त्यात रिया. टेंशन काय घेतेयस तू. नुसतं भेटायला काय जातंय.

आणि मला काय वाटतंय सांगू, हा जो कोणी अनुराग आहे ना, त्याला तू जाम आवडलिएस. म्हणूनच डायरेक्ट इथपर्यंत येऊन धडकलाय तो.”

“अगं पण मला नाही करायचंय लग्न बिग्न!”

“कोणाला नाही करायचंय लग्न?”

दोघींनी मागे वळून पाहिलं. तिशीतला, जवळपास ‘हॅंडसम’ कॅटेगरी मध्ये मोडणारा तरुण दोघींकडे पाहत उभा होता.

“हाय.. मी अनुराग!” त्याने हात पुढे करत म्हटलं.

रियाने आवंढा गिळला. काहीतरी बोलायचं म्हणून मग संहिताच म्हणाली,

“हाय मी संहिता.. आणि ही..”

“रिया. आय नो. फोटो पाहिलाय मी.” अनुराग.

रियाने त्याच्याकडे पाहत एक जुजबी स्मित केलं. आणि गप्पच राहिली.

“सो आय गेस, लग्न न करण्याचा विषय चालू होता..” अनुराग मंदिराच्या पायरीवर बसत म्हणाला.

दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. विषय कसा कुठून सुरू करावा रियाला प्रश्न पडला. आणि त्या दोघांमध्ये आपण नक्की काय बोलायचं असा संहिताला. दोन मिनिटांच्या शांतते नंतर उठून उभी राहत संहिता म्हणाली,

“मला एक अर्जंट मेल करायचाय सो मी निघते आता.. यू गाईज कॅरि ऑन!”

पण, तिला नजरेनेच थांबवत रिया म्हणाली,

“कसला मेल? नंतर कर. बस.”

आणि मग काहीतरी विचार केल्या सारखी अनुराग कडे पाहत म्हणाली,

“अनुराग, सॉरी कालच्या प्रकारा बद्दल.. actually मी तुला कालच स्पष्टपणे सांगायला हवं होतं पण somehow मला ते जमलं नाही...”

“काय सांगायला हवं होतं, तुला लग्न करायचं नाहीये हे?” डोळ्यांवरचा goggle शर्टला अडकवत तो शांतपणे म्हणाला.

डोक्यात शब्दांची जुळवाजुळव करत रिया म्हणाली,

“तू गैरसमज करून घेऊ नकोस.. पण मला खरंच लग्न वगैरे करायचं नाहीये.. तू तुझा वेळ वाया घालवू नकोस.”

यावर अनुरागने क्षणभर रियाकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावर मिश्र भाव होते. थोडासा गोंधळ, थोडं गिल्ट, थोडी भिती आणि थोडी शंका. मग त्याने संहिता कडे पाहिलं. ती काही न बोलता खाली पाहत बसली होती. थोडावेळ विचार करून तो म्हणाला,

“आत्ता लग्न करायचं नाहीये, ‘माझ्याशी’ लग्न करायचं नाहीये, की लग्नच करायचं नाहीये?”

“सी इट्स नॉट अबाऊट यू.. मला ‘आत्ता’ लग्न करायचं नाहीये. तुला माहितीच असेल मी यूपीएससी ची तयारी करतेय. कालच माझा रिझल्ट आलाय. and i could not make it through the interview. मी त्याच trauma मध्ये होते आणि आईने हे लग्नाचं वगैरे सुरू केलं. काही न सुचून मी सरळ निघून आले इथे. तुझ्याशी पण फोन वर नीट बोलले नाही..”

यावर काही न बोलता तो थोडावेळ शांत बसून राहिला.

hampi 4.jpg

ती अवघड शांतता विरघळवत संहिता म्हणाली,

“how did you manage to reach here so fast.. by air?”

“अम्म.. हो. उडून आलो!” किंचित हसून तो म्हणाला.

“तर तुला पुढे अभ्यास करायचाय. आणि म्हणून लग्न करायचं नाहीये.” रियाकडे पाहत तो म्हणाला.

“हो!”

“प्रेमात वगैरे पडलीस तरी नाही?” अनुराग.

“एक्सक्यूज मी..” रिया चमकून म्हणाली.

“यस.. तुला खात्रीये तू माझ्या प्रेमात पडणार नाहीस?”

मिष्किलपणे हसत त्याने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.

यावर दोघी क्षणभर हसल्या.

हसणार्‍या, ऊंच, किंचित सावळ्या पण रुबाबदार अनुराग कडे पाहत रियाने नकळत मनातल्या मनात स्वत:लाच विचारलं, ‘खात्री आहे?’

पण मग लगेच तिने तो विचार झटकून टाकला.

उठून उभं राहत, मंदिरावरून एक नजर फिरवत तो रियाला म्हणाला,

“frankly speaking, कालचं तुझं बोलणं ऐकून मला शंका आलीच होती, That you might not be interested.. but I don’t know why, in spur of moment I decided to come here and see you.. so I did. असो, तू स्पष्टपणे सगळं सांगितलंस, आवडलं मला.”

“look, I’m sorry.. I made you travel this far for nothing.”

“for nothing? Who told you that? माझा योगायोगांवर आणि आयुष्य नावाच्या unpredictable गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. Everything happens for a reason.

आता हेच बघ, या प्राचीन, सुंदर मंदिरात अशा एका सुरेख संध्याकाळी आपण तिघे एकमेकांना भेटणार आहोत हे काही दिवसांपूर्वी तुला कोणी सांगितलं असतं तर तू विश्वास ठेवला असतास का? But here we are..”

दोघींनी आधी एकमेकींकडे आणि नंतर त्याच्याकडे हसून पाहिलं..

“सो काय प्लान आहे आता तुझा?” रियाने विचारलं.

“लवकरात लवकर लग्न करणे इज द ओन्ली प्लान!” तो हसत म्हणाला.

“वेरी फनी! आता इथे काय प्लान आहे असं विचारतेय मी. थांबतोयस की जातोयस परत.”

“थांबतोय नक्कीच! असंही वीकएंड आहे. आणि मी कंटाळलो होतोच रूटीनला. हम्पी माझ्यासाठी थोडं स्पेशलही आहे. I have been here for several times. लगेच निघून येण्यामागे हेही एक कारण होतं म्हणा.”

“ओके. भेटून छान वाटलं...” उठून उभी राहत त्याच्याकडे आश्वस्तपणे पाहत रिया म्हणाली,

.. आम्ही निघतो आता.”

तिच्या पाठोपाठ संहिताही उभी राहिली.

अनुरागने हसून त्यांचा निरोप घेतला.

त्याला बाय करून दोघी गाडीत बसल्या तेव्हा सूर्य मावळला होता..

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users