लहान बाळांची ऐकू येण्याची प्रगतीबद्दल

Submitted by VB on 15 March, 2021 - 05:35

माझा मुलगा आता सव्वा तीन महिन्याचा झाला आहे, मोठ्या आवाजाला दचकतो पण आवाजानुसार मान वळवत नाही, खेळणी खुळखुळ्याला सुद्धा रिस्पॉन्स देत नाही. त्याला डॉक्टर कडे नेणार आहेच पण तरीही मला खूप काळजी वाटतेय.
प्लिज सांगा जर कुणाला असा अनुभव आला आहे किंवा साधारण मुले कधीपासून आवाजाला रिस्पॉन्स देतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विबी, सर्वात आधी काळजी करू नका, डॉक्टर कडे घेऊन जाचं.
माझ्या बाळावरून अनुभव सांगते, तो टिचकी, टाळी, पक्षाचे आवाज याकडे वळून बघायचा खूप आधीपासून म्हणजे मला तसे आठवत नाही नक्की कधीपासून, तो नेहमीच बघत होता. त्याला हलक्या आवाजातला माऊचा आवाज खूप आवडायचा, अजून नैसर्गिक आवाज जास्त आवडतात.
तुमचे बाळ खूप लहान आहे, कर्कश आवाज करणारे खुळखुळे, घंटा वाजवू नका, सतत तो प्रतिसाद देतोय का? वळून पाहतोय का हे तपासू नका. त्याला काय आवडतंय हे पहा. तो दचकतोय म्हणजे त्याला नीट ऐकायला येतंय. काळजी करू नका.

डॉक्टर कडे घेऊन जाचं....तो दचकतोय म्हणजे त्याला नीट ऐकायला येतंय. काळजी करू नका.०>>>+१.

व्हीबी,लेकाशी बोलत असतेस का? त्यावेळी तो हुंकार देतो ना?

सुहृद थँक्स

देवकीताई, मी आताच त्याला डॉक्टर कडे दाखवून आले, त्यांच्या मते अजून पंधरा दिवस थांबा जर तरीही रिऍक्ट नाही केले तर OEA टेस्ट करूया बोलले. त्यामुळे काळजी वाढली आहे.

तो माझ्याशी खूप बोलतो म्हणजे विशिष्ट आवाज काढतो, हुंकार देतो, माझ्या गाण्यावर हसतो, सगळे नॉर्मल आहे, फक्त बाजूला आवाज झाला खुळखुळा वाजला तरी काही रिऍक्ट करत नाही, मान वळवून बघत नाही

Vb काळजी करू नका. आवाज काढतो, हुंकार देतो म्हणजे त्याला कळतेय, गाणे ऐकून हसतोय म्हणजे ऐकुही येतेय Happy Happy Light 1

मान वळवून पाहात नाही तर टोपरे वगैरे टोचतेय म्हणून मान वळवत नाहीये किंवा मान वळवायला इतर काही त्रास होतोय का वगैरेही पाहा.

Don't worry
Maz bal khup thombya hota sagali
Milestones late zalela
For e.g. 4 varashacha zalyavar bolala
Tuz bal tya manane khup reactive ahe
Teen mahine mhanaje khup chot ahe g te.
Khup bola balala

Dudh paja khup,weight vadhava
Bas ugich dr kade javun ghabaru naka
Maz bal 4 months la hasala to paryant nusatach baghyacha.
Ata etka hushar ani active ahe amhi damato
Tyachya mage firun

घाबरवायचा हेतू नाही.
पाश्चात्य देशांत बाळ जन्मल्यावर डीश्चार्ज देण्यापूर्वीच बाळाचे हिअरिंग स्क्रीनिंग करतात (घरी जन्मला असेल तर आठवड्याभरात करायला सांगतात). बाळाला ऐकण्यात काही दोष असेल तर पहिल्या काही आठवड्यात/ महिन्यांत त्याचे निदान झाले तर चांगले, ज्यायोगे योग्य उपचा होऊ शकतात. भारतातील पद्धत माहित नाही. तुमची टेस्ट केली असेल तर उत्तमच आहे. नसेल तर करुन घ्या. अगदीच साधी टेस्ट असते. एकदा टेस्ट झाली आहे म्हणून डॉक्टर थोडावेळ थांबू म्हणत आहेत का अजुन एकदाही टेस्ट केली नाहीये याची खात्री करुन घ्या. शुभेच्छा!
https://www.healthychildren.org/English/ages-stages/baby/Pages/Purpose-o....

आम्हीही बाळाची हिअरिंग टेस्ट जन्मल्यावर करून घेतली होती अर्थात ते हॉस्पिटल package मध्येच बऱ्याच टेस्ट होत्या.

हो, ही टेस्ट 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशीच करतात, बी सी जी आणि इतर लसिकरण असते तेंव्हा. पुण्यात बऱ्याच दवाखान्यात आहे ही सोय. फक्त हे पॅकेजमध्ये नाही समाविष्ट. ओकेच आणि नॉर्मलच असेल सर्व.

बाळ नविन आवाजा़कडे मान वळवून बघणं साधारण पणे चार महिन्यानंतर करतं माझ्या मते. आता जे हुंकार देणे, तुमच्या बरोबर आय कॉटँक्ट करत, आईचा आवाज ओळखत ,आईच्या आवाजाच्या दिशेने बघत म्हणजे नॉर्मल वाटत सगळ.

तो माझ्याशी खूप बोलतो म्हणजे विशिष्ट आवाज काढतो, हुंकार देतो, माझ्या गाण्यावर हसतो, सगळे नॉर्मल आहे, फक्त बाजूला आवाज झाला खुळखुळा वाजला तरी काही रिऍक्ट करत नाही, मान वळवून बघत नाही >> तू बाजूने हाक मारलीस तर रिस्पाँड करतो का? दोन्ही बाजूने ट्राय करून बघ.
हियरिंग टे स्ट तशी नॉनईन्वेजिव असते, लगेच करून घ्यायला हरकत नाही.
आपल्याला पालक झाल्यावर बाळ थोडे स्टेबल होईपर्यंत अनेक गोष्टीत भीती वाटत रहाते. मी तर पहिल्या बाळाच्या वेळी फार पॅनिकी आई होते.

सव्वा तीन म्हणजे खुप लहान आहे अजुन. मला वाटते अजुन १-२ महिने थांबावे.

आमची ठमी पन असेच दचकायची , पण आवाजाला रिस्पाॅंस नाही द्यायची. तसेच बरेच माईलस्टोन चुकविले तिने.
आता (७ म.) आवडत गाणं लागलं की मस्त डोलत राहते.

प्रतिसादाबद्दल सर्वांची आभारी आहे☺️
बाळाला दोन डॉक्टरांना दाखविले कारण आधी ज्यांच्याकडे जात होते त्यांनी घाबरविले , म्हणून 2nd ओपिनियन साठी दुसरीकडे गेले तर त्यांनी खूप टेस्ट करून घेतल्या, ब्लड टेस्ट थायरॉईड, 2d इको, हिअरिंग टेस्ट पण केली.

त्याला व्यवस्थित ऐकू येते, चौथ्या महिन्यानंतर आवाज कुठून येतोय ते कळून तशी मन फिरवील तो.

काळजी करू नका VB .. सगळं OK च असेल.. Happy

हो, ही टेस्ट 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशीच करतात, बी सी जी आणि इतर लसिकरण असते तेंव्हा. पुण्यात बऱ्याच दवाखान्यात आहे ही सोय. फक्त हे पॅकेजमध्ये नाही समाविष्ट. ओकेच आणि नॉर्मलच असेल सर्व. ~~~ बरोबर.