पुन्हा एकदा महिला दिन...

Submitted by नानबा on 8 March, 2021 - 04:22

ती आपली भाकरी स्वतः कमवेल. (ते करत नसतानाही ती त्या भाकरीच्या किमतीहून अधिक कष्ट घरात घेत असते ह्याची जाणीव तिला असेल.)
ती साडी नेसेल, दागिने घालेल वा तिला त्यांचा तिटकारा वाटेल.
ती लग्न करेल, पण तिला मुलं नको असतील किंवा
कदाचित तिला लग्न नको असेल - पण मुले हवी असतील - तो तिचा निसर्गदत्त अधिकार आहे असेही तिला वाटत असेल.
ती सणांसाठी पाळी पुढे ढकलणे नाकारेल..
तिला देवाधर्माची खूप आवड असेल किंवा कदाचित तिचा देवावर विश्वास नसेलही...
कदाचित तिला ड्रायविंग येत नसेल किंवा ती कदाचित तुमच्यापेक्षा अधिक सफाईने गाडी चालवत असेल.
स्टॉपलॉसचे गणित कदाचित तिला अधिक उत्तम समजलेले असेल...
तिला कदाचित घरकामाची तितकीच आवड असेल जितकी तुम्हाला.. किंवा नसेलही!
तुम्हा सर्वांकरता रोज सकाळ दुपार संध्याकाळ रांधणे, त्याकरताची सर्व उस्तवार करणे हे तिचेच काम आहे - असे तिला वाटेलच असे नाही.. ज्यांना पोटाला लागते त्या सर्वांचा ह्यात सहभाग असावा असे तिचे प्रामाणिक मत असेल.
ह्यामागचे सत्य जाणून घेऊन तिची चेष्टा उडवू नका..

तिला आपला नवरा आपला गुलाम नाही हे जसे कळते, तसेच आपणही त्याचा गुलाम नाही हे देखील कळले असेल.

ह्याचा अर्थ ती बेजवाबदार आहे असा घेऊ नका.
तिचे प्रेम नाही, ती तुसडी आहे असेही नाही.
शर्ट पँट घातल्याने, नोकरी करण्याने पुरुषांची बरोबरी होते का? नाही ना? मग तिला पुरुषांची बरोबरी करायची नाहिये.
तिला समाजात गोंधळ माजवायचा नाहिये.
बाई म्हणून असलेली गृहीतके नाकारणे ह्याला कृपया गुन्हा समजू नका.

लक्षात घ्या तिला फक्त मोकळा श्वास घ्यायचाय!
तीही एक माणूस आहे.
तिला तुम्ही हवे आहात... साथीदार म्हणून हवे आहात..
ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल.
प्रेमाच्या आणि आदराच्या लायक असतील तर तुमच्या नातेवाईकांना ती आपले नातेवाईक मानेल.
तुम्हीही तसेच केलेत तर किती उत्तम होईल!

हे देखील समजून घ्या, की तिचीही काही स्वप्न आहेत, स्वतः च्या आवडी निवडी आहेत.
स्वतःहून घेतलेली जवाबदारी ती उत्तम पार पाडेलच. पण तुम्ही लादलेली जवाबदारी तिला आपली वाटेलच अशी अपेक्षा ठेवू नका.
"ती चुकणारच नाही" असे मी म्हणत नाही. कुठल्याही "माणसाकडून" घडू शकतात अशा चुका तीच्याकडूनही होऊ शकतातच!
कदाचित एखादी "ती" खरेच वाईट, खरेच क्रूर असेलही, काही विघातक करत असेलही - त्याकरता स्त्री म्हणून सूट देऊ नका.
पण स्त्री म्हणून तुम्ही लादलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून तीला चेटकीणही ठरवून नका.
केवळ शारिरीक फरकामुळे - तुमच्या कल्पनेतल्या साच्यात तिला बसवू नका.. तिचा घाट तिचा तिला शोधूदेत!
त्याकरता तिच्या हक्काची मोकळीक तिला द्या, इतकेच.

महिलादिनाचा पोळा होऊ नये इतकीच अपेक्षा!

~ शिरीष
------------------------------------------

अनेक गृहीतकांना झुगारून स्वतःच्या स्वप्नांकरता झटणार्‍या , घुंगट झुगारून शेतकरी आंदोलनात सहभागी होणार्‍या, रायफली चालवणार्‍या, कुस्ती खेळणार्‍या, इतर खेळ, साहित्य, शिक्षण, गुंतवणूक ,कला, गणित,भाषा, इतिहास, शास्त्र, युद्ध - आणि इतर अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्‍या सगळ्या महिलांना, रोजच्या आयुष्यात झगडावं लागलं तर ते झगडून आपलं स्वातंत्र्य मिळवणार्‍या - घरातल्या घरातच मिनि क्रांती घडवणार्या सगळ्या बायकांना , स्वतःची मत असणार्‍या बायकांना, कदाचित ह्यातलं काहीही न करताही आपलं स्वत्व शोधणा र्‍या वा ते गवसलेल्या बायकांना आणि बाई म्हणजे आपल्या इतकीच माणूसच आहे , तिला स्वतः च्या आवडी आहेत, स्वतःचे प्रेफरन्सेस आहेत आणि त्याही जन्माने आपल्या इतक्याच स्वतंत्र आहेत हे कळलेल्या पुरुषांनाही स्त्रीदिनाच्या शुभेच्छा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अजिंक्य.. छान reply..
मला जे करायचे आहे ते मी करू शकतो, त्यासाठी मीच accountable + रिस्पॉन्सिबल आहे, आणि कुणालाही answerable नाही>> काही ठिकाणी याला स्वैराचार मध्ये गणतात.. आणि कोणाला answerable राहायचं नाही तर लग्नाच्या नात्याला काय अर्थ वगैरे वगैरे असतं...

नेहेमीप्रमाणेच छान लिहिलंय, शिरीष ! सामीचा writeup ही आवडला. माझ्या कॉलेजकन्येने ती हायस्कुलमध्ये असतांना Student Press magazine साठी असेच एक आर्टिकल लिहिले होते ( महिला दिनानिमित्त नव्हें, [अमेरिकेतील] राजकारणांतील महिला यांवर ), superintendent च्या मंथली न्यूजलेटरमध्येही त्या आर्टिकलची नोंद घेतली होती. लिंक सापडली तर पोस्ट करते.
महिलादिनाचा पोळा होऊ नये इतकीच अपेक्षा! >> +१

जातधर्मासारख्या पॅट्रीआर्कल व्यवस्थेसाठी जीव तोडून भांडणार्या आणि तरीही स्वतःला स्त्रीवादी समजणार्या बायकांना सुबुद्धी होवो अशी महिलादिनानिमित्त प्रार्थना.

वाह सामी! आवडलं तू लिहीलेलं! आणि कंपनीने हे छापलं हे ही उल्लेखनीय आहे. > मी मेल पाठवल्यावर HR executive ला फोन करून सांगितलेले कि मी पाठवलेला राईटप पब्लिश करू नका, तुमच्या छान सेलिब्रेशन मध्ये उगीच माझा असा मेसेज नको.
पण तो म्हणाला कि मला आवडल आहे. मग म्हटलं ठीक आहे Happy

मंथली न्यूजलेटरमध्येही त्या आर्टिकलची नोंद घेतली होती. लिंक सापडली तर पोस्ट करते.> नक्की पाठव राधिका . वाचायला आवडेल

सामी, चांगली पोस्ट.> Happy थॅन्क्स ग

<< जातधर्मासारख्या पॅट्रीआर्कल व्यवस्थेसाठी जीव तोडून भांडणार्या आणि तरीही स्वतःला स्त्रीवादी समजणार्या बायकांना सुबुद्धी होवो अशी महिलादिनानिमित्त प्रार्थना. >>
-------- सहमत...

जातधर्मासारख्या पॅट्रीआर्कल व्यवस्थेसाठी जीव तोडून भांडणार्या आणि तरीही स्वतःला स्त्रीवादी समजणार्या बायकांना सुबुद्धी होवो अशी महिलादिनानिमित्त प्रार्थना. >> आमेन!
फार छान मुद्दा मांडलात..
पण बायकांनाच का! जिथे तिथे जात आणणार्‍या, जात पाहून लेबल लावणार्‍या, हेतूंचे विपर्यास करणार्‍या , केवळ गृहितकांवर आधारित द्वेष करणार्‍या सर्वांनाच सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, वर्णाच्या, लिंगाच्या लोकांकडे आपल्यासारखीच दुसरी व्यक्ती म्हणून बघता येवो अशी प्रार्थना करुयात!

लेख छानच आहे. प्रतिक्रियाही छान आहेत.

यानिमित्ताने माझी महिला दिना दिवशीची ब्लॉग पोस्ट इथे शेअर करतेय..
...

Women's Day? really?

Two distinct infants of opposite sex are born on the same day in the same hospital. One set on the journey of becoming a boy, then a Man. And the other on an inevitable journey of becoming a girl and thereafter a ‘Woman’.

The infant who’s given the curriculum of being a Man, grasps things fast on natural basis. As if it has been given a syllabus that’s easy or for that matter very natural for it’s breed. He learns that somehow, by some social order he has an upper hand in the society. He learns this from the surrounding, from the phenomenon called family. Where, the ones who call them ‘Men’ have a louder voice, louder laughter, free will to follow things, they can sometimes or even most of the times bemean their opposite sex called as ‘Women’. They also learn that Women are given the duty to cook for ‘men’. As if that’s their obvious duty. So, this infant gradually, over the period of time, becomes a ‘Man’ who thinks he is stronger, more intelligent, who can go out and come in at whatever time he wants, he doesn’t have to follow any traditional norms or one can say, he is not going to be judged on that basis. He can be as wild as he can be. And he doesn’t have to do any chores household work since he is a Man. In case if he does, he will either be looked down upon or will be praised depending upon the societal conditions he is living in. He just has to earn money, do a business or a job and that’s it. If he does this efficiently, successfully then he will be hailed, respected and becomes a decision maker. And eventually becomes a ‘Man’.

Now let’s see how the other infant of opposite sex grows. It learns that it has to follow certain regulations to survive. It soon understands that there is some concept like ‘Man’ and it is somewhat more powerful or at least pretends to be powerful. As the time goes the infant who’s now become a ‘girl’ realizes that her curriculum of growing is somewhat different from that of the boys. There are more don’ts than the do’s in her syllabus. Gradually she finds that it’s getting more and more difficult. And somewhat unnatural too. She finds it difficult to adjust. She Struggles. But the force is so hard that with passing time she learns to ‘adjust’. She observes that other ‘women’ (one of whom she is about to become) are most of the time in the kitchen. Some of them are working outside too. But cooking is compulsory. She too is being programmed for the same. That someday she must be cooking for a phenomenon called family. She should raise her children. Most of the times she must not be worried for earning money. That some ‘Man’ would do that for her. And in case she wants to follow her passion she must first take care of the phenomenon called her ‘family’. In short, she understands that being a ‘woman’ is really a hard business. She grows up listening to the bemeaning of other women. Sometimes it is enveloped in good behaviour. but bemeaning is something that’s compulsory for every woman, In one or the other form. She also gets programmed to handle egos with a lower voice. If she does that efficiently then she will be a ‘good Woman’ otherwise she will be called arrogant, over smart, or in short a ‘bad woman’. And according to her basic human nature she becomes one or the other. And finally turns up into a ‘Woman’!

The process of becoming a ‘Man’ or a ‘Woman’ despite being born as ‘Human’ is somewhat unnatural. Infants born belong to the ‘Human’ race. So, they must become humans someday. But on the opposite side, they go on becoming man and woman. The process, in turn ends up in the suppression of the Woman. Levels of suppression may differ from mild to harsh. But suppression continues.

The root cause here is before becoming ‘Humans’ we become ‘Men’ or ‘Women’. We must first become humans and Treat others as humans as well regardless of their gender. Here, I’m not inferring ‘equality’ of men and women. What I’m inferring is being human naturally. We shouldn’t put ourselves or upcoming generations in those unequal moulds of becoming a man or a woman and then let them fight for their position or rights or equality for that matter. Gender is just a biological factor. We are messing up considering it as a psychological and social factor.

I would like to celebrate a ‘Human’s Day’ instead of a ‘Women’s Day’. because, I strongly believe that there are some basic errors in this ‘Men’ and ‘Women’ programming system!

If Becoming a woman is something so unnatural then Damn being a woman, its celebration and the beautiful pink rapping of Women's Day as well!

- Sanjeevani

नानबा,
फार सुरेख लिहिले आहे.

सांज , सामी, तुमचे राईट अप पण खूप छान आहे.

सामी तुमचा उतारादेखील आवडला. खरे आहे. देवी म्हणूच नका. मानवच राहू द्या. म्हणजे मग चूकाही करता येतील आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. नको ते निर्जीव देवपण.

Pages