अध्याय निहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

Submitted by शशिकांत ओक on 6 March, 2021 - 13:38

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते. वाचताना थांबून न कळलेल्या शब्दांचे अर्थ, संकल्पना, आपल्यावर अशी वेळ आली तर प्रसंगी कसे वागायचे, यावर विचार करायला बंधन येते. पोथीतील कथनाबाबत प्रश्न पडले तरी विचारायची सोय नसते. विविध कारणांनी वाचन तसेच पुढे चालू राहते. असो.
माझ्या लेखनातील त्रुटीं जरूर सादर कराव्यात. मी म्हणतो तसेच पायी प्रवास सातशे वर्षांपुर्वी घडले असा माझा दावा नाही. अधिक माहितीपुर्ण नकाशे, पायवाटा, रंजक माहिती संकलित करायला इच्छुकांनी पुढाकार घ्यावा अशी माझी भूमिका आहे.
हे पुस्तक किंवा ईबुक पारायण करताना किंवा आधी किंवा नंतर, ‘स्थाली पुलक’ न्यायाने म्हणजे संपूर्ण जेवण लहानशा ताटलीत देतात तसे, त्या त्या दिवसाच्या अध्यायात काय म्हटले आहे? काही संकल्पना, गावे, मंदिरे, ऐतिहासिक व्यक्ती, अन्य माहिती फोटो यावरून सातशे वर्षांपूर्वीच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक रचनेची थोडक्यात कल्पना यावी असा विचार करून सादर केले आहे. यामध्ये आणखी भर घालून वाचकांची सोय करावी ही विनंती.

अध्यायनिहाय मिपासाठी सादरीकरण अ १ पान १.JPGअध्यायनिहाय मिपासाठी सादरीकरण अ १ पान २.JPGअध्यायनिहाय मिपासाठी सादरीकरण अ १ पान ३.JPGअध्यायनिहाय मिपासाठी सादरीकरण अ १ पान ४.JPGअध्यायनिहाय मिपासाठी सादरीकरण अ १ पान ५.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर मित्रांनो, बऱ्याच काळाच्या अंतरानंतर इथे प्रकट होत आहे. आपल्या पुढील ५२ अध्याय वाचायची इच्छा असेल तर सादर करेन.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र कोण्या सुहृदाने भेट दिलेले आहे. पण इतके चमत्कृतीपूर्ण आहे की विश्वासच बसत नाही. अर्थात श्रद्धा ही पडताळत बसण्याची गोष्ट नव्हे.
ओक यांचे विश्लेषण वाचायला आवडेल.

वा वा शशिकांत ओक साहेब अतिशय स्तुत्य उपक्रम. मुळातच श्रीपाद स्वामींचे चरित्र इतके चमत्कृतीपूर्ण आहे की विश्वासच बसत नाही परंतु वाचत राहावेसे वाटते. आपण त्याला सध्याच्या आधुनिक तंत्राची जोड दिल्याने ते अधिकच छान वाटते. पुढील भागांची प्रतीक्षा ... सुरु राहू द्या कृपया

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे वैशिष्ठ्य
म्हणजे चरित्र नायक श्रीपाद (हे त्यांचे आडनाव) श्री वल्लभ अगदी बालपणाच्या काळात अशा गल्ली बोळातून फिरत कि जिथे उच्च वर्गातील लोक जात नसत. म्हणून धोबी घाटावरचे तिरुमलदास सौम्य शब्दात असे करणे आपल्याला बरे दिसत नाही म्हणून समजावतात.
पोथीत श्रींच्या १६व्या वर्षात ते पंचम जातीच्या वसाहतीत जातात. गावाच्या बाहेर वस्तीत दत्त संप्रदायाची दीक्षा फुटक आणि एका बैठकीत देतात. याचा गहजब होऊन गावातील प्रतिष्ठित राजू, श्रेष्ठी वर्मा, सर्मा यांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकले जायची वेळ येते. तेंव्हा श्रींच्या आई वडिलांना माहीती असूनही ते तू घरातून बाहेर जाऊ नकोस म्हणून मागे लागतात. आणि वचन भंग झाला म्हणून आणि आपले पीठापुरम चे कार्य संपन्न झाले म्हणून तडक काशीला निघून जातात.
यातून आणि अन्य घटनांतून ते या अवतारात समाज सुधारक म्हणून जास्त प्रकर्षाने समोर येतात. नरसिंह सरस्वती अवतारात ते कर्मकांडावर भर दिले म्हणून जाणवतात. तर स्वामी समर्थ अवतारात ते स्वेच्छाचारी वागणुकीतून आपले व्यवहार करताना दिसतात.
याच तिरुमलदासांचा मुलगा नंतर कृष्णा नदीच्या पात्रातून बुट्टी नावेतून भाविकांना कुरवपूर बेटावर नेण्याचे काम करत असतो. असेच एकदा तो एक मुस्लिम राजा नौकानयन करून राहायला आपल्या लवाजम्यासह दिसतो तो सोहळा पाहून नावाडी रवीदासाला पुढील जन्मी तू हे ऐश्वर्य उपभोगायला जाशील म्हणून म्हटले तो नंतर बीदरचा बादशहा झाला वगैरे वगैरे...

>>>>>नरसिंह सरस्वती अवतारात ते कर्मकांडावर भर दिले म्हणून जाणवतात.
नृसिंह सरस्वती अवतारात मी सन्यासाश्रमाचे पुनरुत्थान करेन - असे त्यांनी म्हणजे श्रीपादांनीच त्यांच्या याच पोथीत, म्हटलेले आहे.