बारुद अंमळ ठासून भरलय
लावा बिगीबिगी काडी !!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस
हाती घ्या ना सुरसुरबत्ती!
काढा जाळ
ठिणग्या ठिबकती !!
कवाच बसलाय टिकल्या फोडत
लडी म्हागनं लागू दया लडी !!1!!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस
व्हट माजं लक्ष्मीतोटा !
वात काढा
भिडा राया खेटा !
बॉम्ब फोडा ना आवळ -जावळ
आग वकती पेटती भुईनळी !!2!!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस
मी झाड मोहरलं टंच!
फळफळू दे
होऊ दया की खर्च !
नेम धरुनश्यान राकेट उडवा
पाडा दमदार सरीवर सरी !!3!!
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस
बारुद अंमळ ठासून भरलय
लावा बिगीबिगी काडी
पेटवा राया इशकाची फुलझडी !!धृ!!
(पेटवा आता इशकाची फुलझडी -2)- कोरस
सुप्रिया मिलिंद जाधव
वेगळीच कविता तुमच्याकडून.
वेगळीच कविता तुमच्याकडून. म्हणून छान फटाके बाज.
होय अमा, पहिला प्रयत्न आहे
होय अमा, पहिला प्रयत्न आहे असा
मनःपूर्वक धन्यवाद
आवडली लावणी!
आवडली लावणी!
त्या मीटरमध्ये वाचून पाहीली
थँक्यू आसा
थँक्यू आसा