चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचे अभिनंदन.

Submitted by सचिन पगारे on 23 February, 2021 - 11:50

AAZAD.jpg

टाईम मासिकाने १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीमध्ये भिम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण ह्यांना स्थान दिले आहे.
ट्विटरच्या प्रमुख वकील विजया गड्डे, युनाइटेड किंगडमचे अर्थमंत्री ऋषी सुनक, इन्स्टाकार्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, डॉक्टर आणि ‘गेट अस पीपीईच्या’ कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि अपसॉल्व्हचे संस्थापक रोहन पावुलुरी या भारतीय वंशाच्या व्यक्तींनाही भीमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत यावर्षी टाईम मासिकाच्या १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.

'रावण' यांना दलित शब्द मान्य नाही ते स्वताला आंबेडकरवादी म्हणवतात. युपिसारख्या राज्यात आंबेडकरवादी तरुणांचा ओढा त्यांच्याकडे आहे.जवळपास सात राज्यांत त्यांची संघटना कार्यरत आहे. दलित नेत्या म्हणुन मायावती ह्या अग्रणी आहेत. पण युपी वा देशात घडलेल्या दलित अत्याचाराविरोधात त्यांनी मौनव्रत घेतलेले असताना रावण मात्र आपल्या पध्दतीने संघर्ष करत आहे. त्यांची दखल जगाने घेतली यातच सारे आले. आपल्या देशात दलित चळवळीला, नेत्यांना कमी लेखले गेले. अभिजन वर्ग हा दलित चळवळीच्या नावाने नाके मुरडतो. तर अशा दलित चळवळीतील नेत्याला हा मान मिळाल्याने बर्याच अभिजन वर्गाच्या भुवया उंचावल्या असतील.

रावण यांच्या अभिनंदनाचा हा धागा. समस्त मायबोलीकरांकडुन रावण यांचे अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीसाठी व नव विचारांचा भारत घडवण्याच्या प्रयत्नात शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>
सिता या रावणाची कन्या होती, आणि सितेला त्या काळात धोका होता (कुणापासून ? - पुन्हा एक उपकथा आहे) म्हणून पिता असलेल्या रावणानीच तिला सुरक्षित स्थळी हलविले.

Happy Happy

>>{रावणाने सितेला स्पर्शही केला नव्हता...
नुकताच सुप्रीम कोर्टाने असाच काहीसा निकाल रद्द केला
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/news/national/supreme-cour...

स्पर्श न करता किडनॅपिंग? म्हणजे रावणाने रिव्हॉल्वरचा धाक दाखविला होता की काय?

<< स्पर्श न करता किडनॅपिंग? म्हणजे रावणाने रिव्हॉल्वरचा धाक दाखविला होता की काय? >>

------- त्यात आष्चर्य वाटण्यासारखे काय आहे ? रावण यांनी " कन्ये माहेरी चल " असे म्हटले असेल आणि सितामाई पाठोपाठ आली असेल.

रामायण हे महा(न)काव्य आहे, आणि कवी च्या कल्पनेला सिमा नसतात. ब्र्ह्मास्त्र होते (पण विज नव्हती !), संजिवनी होती, द्रोणागिरी पर्वत उचलणे झाले, सलग सहा महिने झोपा काढणारे कुंभकर्ण होते... वाय फाय / इंटरनेट पण इथेच (महा काव्यात) कुठेतरी मिसळायला हवे होते- पण ते तिकडे महाभारतात घुसडले.

१. माझ्या विचारसरणीला जे अनुसरून आहे तो भाग वगळता बाकी सर्व रामायण काल्पनिक आहे.

२. सगळेच रामायण काल्पनिक आहे.

यात निवड करायची झाल्यास मी दुसरा पर्याय निवडेन.

रामायण होतेच असं ठामपणे म्हणणे योग्य नाही असं वाटत असेल तर ते काल्पनिकच होते असं ठामपणे म्हणणेही योग्य नाही.

असो, या विषयात इंटरेस्ट असेल तर हे व्हिडिओ बघा :

Mahabharata और Ramayana का काल निर्धारण (Timeline) - Nilesh Oak : https://www.youtube.com/watch?v=ObdGKFkSJTw

Sugriva's Atlas- Part I Nilesh Oak : https://www.youtube.com/watch?v=hQ_zkOA2T3A&t=2966s

Sugriva's Atlas - Part II | Nilesh Oak : https://www.youtube.com/watch?v=XcBUiEp6PZA

मामी, विषय भरकटेल म्हणुन जास्त लिहीत नाही.

रामायण घडले / नाही घडले / त्यात कितपत वास्तव आणि काय काल्पनिक वगैरे एक मुद्दा.

आणि जे आपल्याला फावते तेवढे रामायणातले घेऊन बाकी वेळ आली की ते तर काल्पनिक आहे म्हणणे हा दुसरा मुद्दा.
माझी वरची पोस्ट या मुद्द्याबद्दल आहे.

जातीपाती, समाजाचे नाव घेऊन राजकारण/समाजकारण करणारा कितीही भारी असला तरी आपल्या लेखी असल्या लोकांची किम्मत शून्य!

Pages