भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सगळ्यांना. उशी दाइसो जिंदाबाद. जपानी ब्रीड असल्याने दाइसोमध्ये कधीतरी मिळुन जातं. आधी ह्याचं नाव मिसो ठेवायचं होतं. मिसो सुप सारखं. पण बारकीचा हट्ट ऑस्करचा होता. मज्जानु लाईफ. मुलं खरंच खुप एन्जॉय करतात. आज बड्डे पार्टीला 2 भूभू आणि 10 मुलं. खूप मज्जा केली सगळ्यांनी.

अरे वा ! हँडसम आहे ऑस्कर! मला हे ब्रीड फार क्यूट वाटतं. स्वीट फेस!
ओडिन चा किस्सा खरंच मजेशीर आहे. तुम्ही म्हटला होतात तसा तो मनाने अजून इनोसन्ट बॉय च असावा Happy पण एकूण हे सगळे प्रकरण सोपे नव्हे हे लक्षात आले. मेल पेक्षा फीमेल डॉग च्या पेरेन्ट्स ना अजून जास्त व्याप असणार!!

हो एकूण सगळा प्रकार वाचून वाईटच वाटलं.
फीमेल डॉग्जसाठी जास्त, कारण त्यांना 'जबाबदारी नको' असं म्हणून कोणी प्रेमाने पाळत नाही. फक्त ब्रीड करणारं मशीन म्हणून ब्रीडर्स वापरून घेत असतील पिल्लं विकून पैसे कमवायला. भारतीय context मध्ये अर्थात.

हो ना, मला असाही प्रश्न पडला की पिल्ले झाली आणि विकता आली नाहीत तर? कोणी फॅमिलीज मिळाल्या नाहीत तर त्या बिचार्‍या पिलांचे भविष्य काय?

हो खरंच वाईट आहे
वरती अनु यानी म्हणल्याप्रमाणे कन्सेनट कोण घेत नसेल त्यांचा
अर्थात अग्रेसिव्ह ब्रीड ची फिमेल याला भीक घालत नाही
कारण नुकताच समजलेला किस्सा अशीच ब्रिडिंग ला नेलेली पीटबुल ची फिमेल आणि तिला मेल आवडला नाही का काय झालं माहिती नाही, तिने कचकन मानेजवळ दात रुतवले, बरीच हाणामारी झाली मग दोघात
दोन्ही पालक लोकं पण एकमेकांना ओरडायला लागले
बरेच रामायण झालं
या उलट एक आहे अगदी बघण्यात दोन लॅब आहेत अगदी पिल्लं असल्यापासून एकत्र खेळतात ग्राउंड वर, दोघांच मस्त जमतंय
सो पालकांनी ठरवून ठेवलं आहे वयात आले की हेच पार्टनर
पाळण्यात लग्न ठरवतात तो प्रकार झालाय

पण ओव्हराल फिमेल वर बाळंतपण लादलं जातं इतकं मात्र जाणवलं आणि जेन्यूईन पालक असतील तर ते व्यवस्थित काळजी घेतात पण धंदेवाईक ब्रीडर जास्त पैसे कमवायला एकापाठोपाठ एक बाळंतपण लादतात, यात फिमेल ची तब्येत ढासळतेच पण खेरीज पिल्लेही अशक्त आणि सारखी आजारी पडतात
त्यामुळे घेताना ब्रीडर कोण आहे याची माहिती करून घेणे फार महत्वाचे
ओडीन ची आई एका फॅमिलीत वाढली आणि दोन वर्षांची झाल्यानंतरच पहिल्यांदा त्यांनी ब्रिडिंग करवले
ते आता पुढचे एक वर्ष दीड वर्ष परत करवणार नाहीयेत
तयामुळे ओडीन सकट सगळी तिची प्रजा गुटगुटीत आहे

आभा, तुमच्या भुभुला हॅपी बड्डे !......+1.

आणि हो त्या ब्रीडचे नाव माहीत नव्हते.आवडायचे ते ब्रीड

कुत्र्यांचे 'तसे' काही व्हिडीओज असतील तर ओडीन ला दाखवता येतील >> तो टिव्ही बघत नाही ना, नो स्क्रिन टाइम
ओडी,निरागस आहे हो !
ऑस्कर नाव मस्त आहे,
बालमैत्रीणीच्या आत्याकडे एक कुत्रा होता, ते सुट्टित आले की त्याला आणायचे की तिच्याकडे १ आठवडा जाणे बन्द! ब्रिड काय माहित नाही पण भलाथोरला होता त्याच नाव "मोगॅन्बो "ठेवल होत,भयन्कर भुन्कायचा.

ओडीन चा इंस्टा वरचा फोटो लैच फेमस झालाय
त्याला आता अजून दोन जणांकडून विचारणा झालीये
आम्ही मात्र घडल्या प्रकाराने शहाणे होऊन यंदा कर्तव्य नाही म्हणतोय
Happy

इथले सगळेच बाळ छान आहेत..मी हा धागा नेहमी वाचते पण माझ्याकडे पेट नसल्यामुळे कधी रिप्लाय केला नाही.
आज भाऊ एक छान ससा घेऊन आलाय. त्यामुळे इथे टाकावं म्हंटले आपण पण त्याचे फोटो..पण हा धागा भुभू आणि माऊ बाळांसाठी आहे तरी आधी विचारून घ्यावं म्हंटले टाकू की नको.

आमच्या ससुल्या ला आजच आणलाय घरी..त्यामुळे तो खूप घाबरत आहे. एका टेबल खाली जाऊन बसलाय नुसता. थोडा रिलॅक्स झाला की छान जवळ घेऊन काढते फोटो. बाकी इथे कुणी आधी ससा आणला असेल घरी तरी कृपया थोड guidance करा. मला त्यांच्याबद्दल खूप कमी नॉलेज आहे

अमृताक्षर - वेट कडून किंवा चांगल्या साइट वर वाचून माहिती करून घ्या डाएट, इतर केअर वगैरे बद्दल. माझ्या मैत्रिणीकडे होता ससा (सशी). त्यांनाही नीट माहिती नव्हती. त्यांना वाटायचे की खायला दिले की अगदी झपाझप खातेय म्हणजे ती भुकेली असावी. अन ते मग अजून अजून खायला द्यायचे. त्याने उलट पोट बिघडलं होतं तिचं! खरं तर अगदी ठराविक अमाउंट फूड रोज त्यांना द्यायचे असते. प्रिडेटर्स खूप असल्यामुळे नैसर्गिक रित्या ससे भित्रे असतात, फूड दिले की शक्य तितके पटकन खायचे अशीच त्यांची सवय असते म्हणे.
फोटो टाका तुमच्या ससुल्याचे. नाव काय ठेवलं?

आमच्याकडे २ गिनीपिग्स होते. गाजराचा नुसता सुगावा जरी लागला, तरी अतिशय एक्साईट होत असत. गाजर अतिप्रिय. मुख्य गवत हेच खाद्य. एकदा फार लुसलुशीत गवत मिळाले होते वॉलमार्ट का कुठेतरी. इतकं आवडलं की विचारु नका. नंतर मात्र ते कधीच दिसलं नाही. पशुखाद्य दुकानात त्यांच्या ट्रीटस असत. पण सगळ्याच आवडत नसत.
पैकी आलफी न्यु यॉर्क बँकर होता तर पाँचु कंट्री बॉय होता. आल्फी स्वाव्ह होता खरच अतिशय देखणा, राजबिंडा होता. पाँचू जरा ठिकठाकच होता. फोटो सापडला तर डकविन.
एकदा उन खाउन आल्फी चक्कर येउन पडला होता, ब्लड प्रेशर वाढलं. मग एक रात्र इमर्जन्सीत होता. इमर्जन्सीत विचारतात की हार्ट अ‍ॅटॅक आला तर, कृत्रिक श्वासोच्छ्वास द्यायचा का? आम्ही नाही सांगीतले होते कारण फासळी वगैरे तुटण्याचा धोका असतो. Sad
माहीतच नव्हतं आल्फी वाचेल की मरेल, पण सकाळी पोचलो तर व्हेट ने सांगीतले आता धोक्याच्या बाहेर आहे. इतकी रडले होते मी Sad

- हे याच धाग्यावर ऑलरेडी लिहीलेले असण्याची दाट शक्यता आहे.

आमच्या ससुल्या चे नाव जेरी आहे. टाकते अजुन फोटो. धन्यवाद मैत्रेयी..वेट कडे घेऊन जाते उद्या त्याला..चालू असेल तर..कारण इकडे lockdown झालंय..

परवा फेबुवर एक मजेशिर ट्रेन्ड व्हिडीयो बघितला, तुमच लाडक पेट डॉग तुमच्या शेजारी असताना त्याच्याकडे न बघता त्याच्या नावाने हाका मारायच्या, काही डॉगी एवढे क्युट रीअ‍ॅक्ट होत होते काही कन्फ्युज होवुन स्वतःलाच शोधत होते.

हो आम्ही केलाय
ओडीन आधी हाक मारल्यावर जवळ येतो
तरीही लक्ष न देता हाक मारली तर समोर येऊन बसतो
तरीही इकडे तिकडे बघत हाका मारत राहिलो तर येतो आणि पंजा हातावर नैतर पायावर ठेऊन सांगतो मी इथे आहे
बिच्चारा फार क्युट वाटतो
व्हीडिओ सापडला तर टाकतो

तरीही इकडे तिकडे बघत हाका मारत राहिलो तर येतो आणि पंजा हातावर नैतर पायावर ठेऊन सांगतो मी इथे आहे >>> किती क्यूट! अगदी डोळ्यासमोर आला Happy

Pages