मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग १०

Submitted by कविता१९७८ on 11 February, 2021 - 13:20

माणुस हा सामाजिक प्राणी आहे. जन्मल्यापासुनच तो नाती निर्माण करत असतो. आई , वडील , भाऊ , बहीण , आजी , आजोबा , काका , काकु , मामा , मामी , आत्या , मावशी अशी अनेक नाती त्याच्याबरोबर आपोआपच जोडली जातात. ती निवडण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतो. तर काही नाती तो आपल्या मर्जीने निवडतो. असे असले तरीही बर्‍याचदा काही ना काही कारणाने नात्यांमधे वितुष्ट येतं. , अपेक्षाभंग होतो. नाती दुरावतात.© Copy Right by Kavita Patil सख्खी माणसे वैर्‍यासारखी वागली की त्याचा आपल्या मनावर खोलवर परीणाम होतो. तो सल सतत मनात बोचत असतो , आपली घुसमट होते. बर्‍याचदा विश्वास घात झाल्यामुळे आपला चांगुलपणावरचाच विश्वास उडतो. नेहमी चुक समोरच्याचीच असते असे नाही पण प्रत्येकाला आपलीच बाजु बरोबर वाटते कारण प्रत्येकाचे विचार आणि तत्वे वेगळी असतात.

दुखावलेला माणुस तळमळत असतो, कुणीतरी छातीत खंजीर खुपसल्याची वेदना त्याला होत असते. चुक कुणाचीही असो पण आपल्याला या दुष्टचक्रातुन बाहेर पडणे गरजेचे असते नाहीतर आपण सतत दुसर्‍याची वागणुक सर्वांना सांगुन राग , द्वेष , जळफळाट यासारखी नकारात्मक उर्जा आकर्षित करु लागतो, अहंकाराला खतपाणी घालतो. आपलं मन अशांत करतो. मी मेडीटेशन घेताना नेहमी या सर्व गोष्टी आपल्या मनातुन जाव्यात यासाठी नेहमी प्रयत्नशील असते, समोरुन मला तसे प्रतिसादही येतात.© Copy Right by Kavita Patil तर मेडीटेशन बरोबरंच आपण रोज क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशनद्वारे ही आपल्या मनाला काही प्रमाणात शांत ठेऊ शकतो. यासाठी ज्या व्यक्तिने आपल्याला दुखावले आहे ती व्यक्ति आपल्याशी प्रेमाने वागते आहे, ती व्यक्ति आपली माफी मागते आहे आणि आपणही त्या व्यक्तिला मोठ्या मनाने माफ केले आहे असे सतत पाहत राहावे. यासाठी पुढील सकारात्मक विधान फायदेशीर ठरेल,

"मी (त्या व्यक्तीचे नाव) ला माफ केले आहे व ती / तो आता माझ्याशी प्रेमाने वागत असुन आमचे नातेसंबंध सुधारले आहेत"

हे कठीण जरी वाटत असले तरीही अशक्य नाही. समोरचा आपल्याकडे येउन माफी मागेल तर मी माफ करेन हा अहंकार बाळगुन काही होणार नाही, चुक नसतानाही जर नातेसंबंध सुधरवायला माफी मागितली तर त्यात काहीच गैर नाही.© Copy Right by Kavita Patil आपण स्वत:हुन पुढाकार घेतला तर समोरची व्यक्तिही जवळ यायला जास्त वेळ जाणार नाही आणि जर संबंध ठेवायचेही नसतील तरीही आपल्यातील नकारात्मता , राग , द्वेष संपवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. पटकन कुठलीच गोष्ट साध्य होत नाही पण जमता जमता नक्की जमेल.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — ९

https://www.maayboli.com/node/78075

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मी (त्या व्यक्तीचे नाव) ला माफ केले आहे व ती / तो आता माझ्याशी प्रेमाने वागत असुन आमचे नातेसंबंध सुधारले आहेत">>> समजा हे त्या व्यक्तिला समजले व ती व्यक्ती भांडायला आली की तू कोण मला माफ करणारा लागून गेला? तर Happy Happy