अज्ञातवासी! - भाग २६ - खेळ सुरू!

Submitted by अज्ञातवासी on 13 February, 2021 - 11:21

भाग २५
https://www.maayboli.com/node/78052

'मी जीव देईन, पण तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करणार नाही...'
'शरू...' तो झोपेतून दचकून जागा झाला.
त्याला दरदरून घाम फुटला होता.
आणि त्याच्या डोळ्यातून दोन मूक अश्रू खाली ओघळले.
◆◆◆◆◆
"अब्बू, मोक्ष कुठे आहे." सकाळीच झोया खानसाहेबांकडे आली.
"प्रॅक्टिसला गेलाय."
"मला न विचारता?"
"तो लहान बाळ नाहीये झोया."
"बंदुकांबरोबर खेळणारा लहान मुलगाच आहे तो." ती गाडीकडे धावली व सुसाट वेगाने गाडी काढली.
इब्राहिमच्या हवेलीत अक्षरशः गोळ्यांनी रणकंदन माजलं होतं.
उझी, एके ५६ आणि रिव्हॉल्वर असा क्रम मोक्षने आरंभला होता.
"अरे, काय चालवलं आहेस. बंद कर."
झोया ओरडली...
"झोया..." मोक्ष गडबडला.
"खेळणं आहे का ते? धडाधड गोळ्या चालवतोय. काय झालं????"
"काही नाही. सॉरी..." तो गडबडून म्हणाला.
"चल, निघुयात परत." ती त्याला ओढतच म्हणाली.
दोघेही परत निघाले.
'शरू... शरू...'
त्याच्या डोक्यात हाच विचार घोळत होता.
◆◆◆◆◆
'तात्यासाहेब जाधव... आपल्या बाजूने.
अस्मिता राणे- शेलार... आपल्या बाजूने, खात्री करून घ्यायला हवी
राऊत... कायमच आपल्या बाजूने
ज्ञानेश्वरकाका - आपल्या बाजूने
जगताप - संबंध येणार नाही.
विश्वासराव - आपल्या बाजूने
शेखावत - आपल्या बाजूने
सिंग - विरोधात
पांडे - माहिती नाही
सायखेडकर - आपल्या बाजूने होऊ शकतो
डिसुझा - माहिती नाही
जाधव - माहिती नाही
खान - विरोधात'
सगळी मांडणी करून झाल्यावर अप्पासाहेबांच्या चेहऱ्यावर हसू विराजलं.
"संग्राम, खुर्ची तुझीच होणार. बहुमताने तरी." ते समाधानाने हसले.
संग्रामच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं.
"संग्राम, पुण्यतिथीची तयारी चालू करा. अगदी जोशात सगळं झालं पाहिजे. मी जमलं तर सरळ मुख्यमंत्र्यांना आणतो.
नवा राजा येतोय... जल्लोष व्हायला हवा." अप्पा समाधानाने उद्गारले.
◆◆◆◆◆
"वेडेपणा असावा, पण इतका नको. तुला काही झालं असतं तर?"
"तर काय झोया???"
"तर..." झोया गडबडली.
"झोया." मोक्ष म्हणाला...
"हम्म."
"नको इतकी काळजी करुस. मी लायक नाहीये..."
"ते मला शिकवू नकोस. आमचा थोड्याच दिवसांचा मेहमान आहेस, काळजी घ्यायला हवी."
"तू जे म्हणशील ते." मोक्ष विषण्ण हसला.
तेवढ्यात खानसाहेब वर धावत आले.
"मोक्षसाहेब, एक खूप मोठी बातमी आहे."
"काय?"
"दोन आठवड्यांनी जगनअण्णांची पुण्यतिथी आहे. तेव्हाच संग्रामला खुर्चीवर बसवायचा घाट घातला जातोय."
मोक्ष सुन्न झाला...
आणि नंतर समाधानाने हसला.
"चला, अज्ञातवास लवकर संपणार..."
खानसाहेब त्याच्याकडे बघतच राहिले.
◆◆◆◆
खाली पबमध्ये गाणी चालू होती, आणि वर एका बंदिस्त खोलीत सहाजण बसले होते.
"महत्वाचा क्षण आहे, आपण सहाजण आजपर्यंत कधीही एकमेकांच्या विरोधात गेलेलो नाही."
"कारण आजपर्यंत आपल्याला दादासाहेबांनी बांधून ठेवलं होतं शेखावत." सिंग उद्गारला.
"मग काय कायम शेलारांची गुलामी करायची?" पांडे गरजला.
"कुणी काहीही म्हणो, मी कायम शेलारांशी एकनिष्ठ राहील. त्यांचे डोंगरएवढे उपकार आहेत माझ्यावर." जाधव म्हणाला.
"मलाही त्यांच्याविरुद्ध जाता येणार नाही." सायखेडकरही म्हणाला.
"बघितलं शेखावत? शेलारांना महादेवाचं वरदान आहे. त्यांच्याविरुद्ध जाण्यात काहीही हशील नाही. उलट तू स्वतःची राख करून घेशील."
शेखावत शांत बसला, आणि नंतर जोरजोरात हसू लागला...
"राख बघायचीय तुला??? महिना दे मला. प्रत्येक शेलाराची राख तुला दाखवतो."
तो भेसूर हसू लागला.
"शेखावत, तू पुढे हो. आम्ही आहोत तुझ्यासोबत . काय पांडे..." डिसुझा म्हणाला.
पांडेनेही होकार भरला.
"ठीक आहे. आजपासून सहा भुते स्वतंत्र. फक्त तुम्ही तिघे आमच्या जीवावर उठू नका." सायखेडकर म्हणाला, आणि तिथून निघाला.
त्यापाठोपाठ सिंग आणि जाधवही बाहेर पडले...
...दूरवर हे बोलणं ऐकणाऱ्या व्यक्तीने हेडफोन काढून ठेवला...
व शांतपणे मागे मान टेकवली...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग..!
कथेसाठी खूप मेहनत घेत आहात... खरचं प्रशंसनीय..!!

छान भाग..!
कथेसाठी खूप मेहनत घेत आहात... खरचं प्रशंसनीय..!!-- +111

छान भाग..!
कथेसाठी खूप मेहनत घेत आहात... खरचं प्रशंसनीय..!!-- +111111 मस्त चालू आहे कथा

छान चाललीये पण खुपच छोटे छोटे भाग असतात.

आख्खी कॅडबरी खायची ईच्छा असते न एका बाईटवरच समाधान मानाव लागतयं. Happy