स्वप्नांचा आयुष्यावर होणार परिणाम

Submitted by बोकलत on 10 February, 2021 - 01:02

मी आजकाल एका विचित्र समस्येने ग्रासलो आहे. स्वप्नात मला काही दुखापत झालेली दिसली कि ती सकाळी उठल्यावर प्रत्यक्षात झालेली असते. काही दिवसांपूर्वी स्वप्न पडलं कि हातावर कोणीतरी ओरखडे काढतंय सकाळी उठलो तेव्हा बोटांवर खरंच ओरखडे होते. एकदा धावताना पाय मुरगळल्याचं स्वप्न पडलं उठल्यावर खरोखरच पाय मुरगळला होता. कालच एक स्वप्न पडलं मी खूपच लहान सायकल चालवत होतो. मला चालवताना खूपच खाली वाकायला लागत होतं. त्यानं माझ्या मानेजवळ चमक भरली. आता सकाळपासून तिथे दुखतंय. हे असं भरपूर वेळा होतं जसं कि स्वप्नात ती गोष्ट मी प्रत्यक्षात करत होतो. असा अनुभव कोणाला आला आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>निरर्थक, विषयाला सोडून प्रतिक्रिया देणे बंद करून बघा>>>

>>>

झपाटलेल्या झाडांना विचारा, पछाडलेल्या वाडयांना विचारा.
मध्यरात्री दोन कानाखाली खाणाऱ्या पिंपळावरच्या मुंज्याला विचारा,>>>>
या बोकलत यांच्याच लाइनी आहेत

Kahi evdhe tension ghenayache Karan nahi ,,, hot as kdhi kdhi ,, aapan real life madhe zopet kahitri krto or aaplya body/sharirasobat kahitri hote te same kahitri logic sobat Dream madhe diste,,, .ek example deto, lahanpani zopet su kelyach aathavaty ka . Aapan zopet/dream madhe mst washroom/toilet or zadakhali or mokalya ground madhe su krto pn pratakshayat antharan ole hote.. Ajun ek example ghya, zopet Jr hat anga khali aala tr hatala mungya yetat an zopet aapan dusryach kahitri bghto jr jag aali tr mg arth bodh hoto are hatala mungya aaltya dream madhe dusarach kahitri suru hot.

Same agdi tasach zal asel tumchya gharat CAT DOG or lahan mulga asel tyane tumhala jakhmi kela asel same tumhi dream madhe vegla logic lavun baghu tla asel n jag yetach hatavr Jakham,, itk sopa aahe te, pn samadhan mhnun tumhi ajun dusre kahi pratyna kru shakta

हे असं भरपूर वेळा होतं जसं कि स्वप्नात ती गोष्ट मी प्रत्यक्षात करत होतो. असा अनुभव कोणाला आला आहे का?
>> हो मलाही काल असाच अनुभव आला..
मी तर काल स्वप्नात एकदमच डाऊन द मेमरी लेन म्हणजे थेट बालपणात गेले. मी मस्तपैकी मऊमऊ अशा दुपट्यावर लोळत पडलेले.. आणि पायाचा अंगठा चोखत होते.. सहा महिन्याची होते बहुतेक.. अंगठा चोखून चोखून कंटाळले होते म्हणून मग दुपट्याचा कोपरा तोंडात घालून पाहिला. बरा लागला म्हणून मग तो चोखू लागले..दुपट्याचं कॅाटन आणि तोंडातली लाळ यांचं मिश्रण असलं भन्नाट लागत होतं म्हणून सांगू..सारखी ब्रह्मानंदी टाळी बसत होती. पण तेवढ्यात कुणी एका कठोर बाईने खसकन् ते तोंडातून ओढून घेतलं. “मेले,दुपटं कसलं खाते?? गिळायला चांगलं दूधतूप मिळतंय ते पुरत नाही का??” असे कठोर शब्द कानावर आदळले. मी खालचा ओठ काढला, डोळे मिटले आणि रडण्याची ॲक्टिंग केली पण तरीही कोणाला कीव आली नाही.. उलट माझी दुपटं खायची सवय सुटावी म्हणून दुपट्याच्या त्या कोपऱ्यावर कुठला तरी हिरवट खडबडीत प्रकार घासण्यात आला.. तो कोपर चाटताच मी ओक्साबोक्शी रडू लागले आणि मला जाग आली .. मग कळलं की हे स्वप्न होते.. पण खाली येऊन किचन मधे गेले..बघते तर काय.. आईने कधी नव्हे ती कारल्याची भाजी केली होती

धागा विनोदी दिसतोय पण कॉलेजमध्ये असताना मित्राकडून ऐकलेली खरी घटना आहे. त्याच्या वडिलांचे आम्ही लॉच्या दुसऱ्या वर्षाला असताना अकाली निधन झाले होते. काही दिवसांनी त्याच्या आईच्या स्वप्नात वडील येऊन त्यांच्या कोणा मित्राची देणेदारी देऊन टाका असे सांगायचे. तिला ते गृहस्थ माहीत होते पण पैशांबद्दल काही कल्पना नव्हती. असे स्वप्न बऱ्याचदा पडल्याने तिने त्यांना शेवटी विचारले काय व्यवहार झाला होता तुमच्यात ? तेव्हा त्यांनी सांगितले की यांनी माझ्याकडून सहाशे रुपये उधार घेतले होते पण त्यांचा मृत्यु झाल्याने मला ते तुम्हाला मागणे योग्य नाही वाटले. स्वप्नप्रकरण कळाल्यावर नंतर त्यांनी ते मित्राची इच्छा म्हणून स्वीकारले. ही १९९३ सालातली घटना आहे.

Pages