Submitted by अनन्त्_यात्री on 2 February, 2021 - 05:48
उल्कापाताच्या आतषबाजीने
दिपून जातोय मी आज
पण कधीतरी
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात
अंतर्बाह्य उजळायचंय मला
शब्दांच्या समृद्ध अडगळीत
हरवून जातोय मी आज
पण कधीतरी
शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात
निरुद्देश पोहोचायचंय मला
नीटनेटक्या रंगरेषा
रेखाटतोय मी आज
पण कधीतरी
अमूर्ताचं असीम अवकाश
अनवट रंगांनी भरायचंय मला
त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
व्यामिश्र वितान
व्यापून थोडं उरायचंय मला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेहमीप्रमाणे खूप सुंदर
नेहमीप्रमाणे खूप सुंदर शब्दरचना..!!
धन्यवाद रूपाली.
धन्यवाद रूपाली.
अफाट सुंदर...
अफाट सुंदर...
जबरदस्तच....
जबरदस्तच....
व्यामिश्र वितान
व्यापून थोडं उरायचंय मला >>>>
हे मी असं वाचलं....
व्यामिश्र वितान
व्यापून पूर्ण विरुन जायचंय मला
भुईकमळ, शशांक मन:पूर्वक आभार
भुईकमळ, शशांक मन:पूर्वक आभार
चंद्रमाधवीच्या अद्भुत
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात >> म्हणजे कवी ग्रेस यांच्या कवितांत ?
>>>>म्हणजे कवी ग्रेस यांच्या
>>>>म्हणजे कवी ग्रेस यांच्या कवितांत ?>>>
नाही. चंद्रप्रकाशात न्हालेल्या प्रदेशात.
सुंदर !
सुंदर !
सुरेख
सुरेख
अस्मिता, rmd धन्यवाद
अस्मिता, rmd धन्यवाद
सुंदर.
सुंदर.
छान आहे..
छान आहे..
सामो, निरु धन्यवाद.
सामो, निरु धन्यवाद.