पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुताई, प्रमाण तर माहीत नाही. पण १-२ वर्षापूर्वी एका मैत्रीणीच्या आईने टिप्स दिल्या होत्या. ते बटाटे स्वच्छ धुऊन किसुन घ्यायचे. बटाटा किसल्यानंतर पाण्यात बटाट्याचे जे सत्व ( स्टार्च ) उरते ज्याला आपण तवकील पण म्हणतो, त्या तवकीलामध्ये भिजवलेला साबुदाणा शिजवुन घ्यायचा, म्हणजे साबुदाणा पापड्या हलक्या व खुसखुशीत होतात.

मंजूताई,
उकडलेल्या बटाट्याचा गोळा एक कप झाला तर त्याला अर्धा कप साबुदाणा पीठ घ्यायचे. यात अर्धा चमचा पापड खार आणि आवडीप्रमाणे जीरेपावडर, तिखट -मीठ घालून छान कुटून घ्यायचे . गोळा चिकट झाला पाहिजे.

मँडोलिन स्लाइसरने बारीक चकत्या करायच्या. बीट, मुळा , काकडी यांच्या चकत्या प्लॅटरमधे वर्तुळाकृती लावायच्या. फुरसत असेल तर प्रत्येक स्लाइसवर गोट चीझ / फेटा, त्झात्झिकी / हमस असे काहीतरी ठेवायचे थोडे थोडे. नसेल तर मीठ . चाटमसाला लिंबाचा रस असे शिंपडायचे.

मुळ्याचे दोन किंवा चार भाग करून ऑलिव्ह ऑइल, मीठ, मिरपूड शिंपडून ओव्हन मधे किंवा ग्रिलवर रोस्ट करायचे. फेटा चीझ, अरुगुला मिक्स करुन सॅलड करायचे.

रंगी बेरंगी गाजरं आणि मुळे एकत्र रोस्ट केले तर साइड डिश म्हणून पास्ता वगैरे च्या सोबत मस्त लागतात.

आभा, लाल छोट्या मुळ्यांना शक्य्तो शिजवू नये असं एका न्युट्रिशनिस्टनं काही वर्षांपुर्वी सांगितलं होतं. कारण विसरले किंवा फक्त माझ्या प्रकृतीसाठीदेखील असेल. पण तुम्ही एकदा खात्री करून घ्या. वरची ग्रीलची आयडिया फारच टेम्प्टिंग आहे.
एंजोञ. Happy

शेल / डोकं इंटॅक्ट असलेली कोळंबी आणली आहे. रस्सा किंवा कालवण करताना डोकं आणि शेल काढुन टाकायचा का? जागुताईच्या धाग्यावर फोटो मध्ये शेल आणि डोकं आहे अस वाटतंय पण मग काळा धागा तसाच ठेवायचा का? सॉरी बेसिक आणि खुप प्रश्न आहेत पण नेहमी डिशेल्ड फ्रोझन आणते त्यामुळे आता विचारते आहे. धन्यवाद!

आभा,
कोलंबी ताजी फडफडीत असेल तर साल काढायचे, पाठीवर चीर देवून काळा धागा काढून टाकायचा आणि डोके ठेवून शिजवायचे. काहीजणांना नंतर रश्श्यातील कोलंबीचे डोके काढणे आवडत नाही म्हणून डोकेपण काढून टाकतात.

पण मग काळा धागा तसाच ठेवायचा का?
<<
काळा धागा = कोळंबीचा डायजेस्टिव्ह ट्रॅक. यातील कन्टेन्ट् सकट खाणारेही लोक आहेत, वेगळी अन छान चव लागते म्हणतात. पण ते काढून टाकणेच बरे.

अरे मीविसरुनच गेले होते ... रश्मी व स्वाती धन्यवाद!
रश्मी, बटाट्याच्या किसाचे काय करायचे ?
स्वाती, पापडखार न वापरता करायच्या आहेत....

>>स्वाती, पापडखार न वापरता करायच्या आहेत...>
https://nishamadhulika.com/en/565-how-to-make-aloo-papad-at-home.html
यात पापडखार, साबुदाणापीठ दोन्हीचा वापर नाही. थोड्या प्रमाणात करुन बघा कसे होतात ते.

स्वाती, करून बघते थोडेसे ... खूप फूलणार नाहीत असं वाटतंय ... बघू>> बटाटे उकडून मॅश करुन्/किसुन किवा पुरणयत्रातुन काढायचे त्यात मावेल तेवढ साबुदाणा पिठ्,मिठ्,तिखट्,जिरे पुड घालुन मळुन घ्यायचे.दोन प्लॅस्टिक मधे गोळा ठेवुन लाटायचा किवा प्रेस यन्त्रात दाबायचा, पापड अलगद काढुन वाळवायचे,पापडखार नाही घातला तरी चालत,साबुदाण्याच पिठ आहे ना त्यामूले फुलतिलच.

काळी द्राक्ष आंबट आहेत फारच ( कोल्हा झालाय माझा. हौसेने आणली खरि , पण कोणी खात नाहीये शिवाय उत्साहाने इतरही फळ आणली आहेत. ) त्याचे पन्चामृत वगैरे होउ शकेल का ? एका पेशवाई काळातल्या मेनुच्या यादीत पूर्वी 'द्राक्षाचे सार ' असे काहीतरि वाचल्याचे आठवतेय. यापैकी किन्वा असेच काही पदार्थ असतील तर रेसिपी कळवा प्लीज.

पंचामृत करुन पहा...... द्राक्षं अर्धी अर्धी चिरुन मोहरी, हळद, हिंग, लाल मिरच्या, मेथ्या, मिरे अशी फोडणी करुन त्यात टाका व बरोबरीने गूळ टाकून पाकावर येईपर्यंत शिजवा...फार वेळ लागणार नाहीच शिजायला. नंतर चवीनुसार मीठ घाला.
अथवा गोड आंबट चट्णीही करता येईल..... कढीपत्ता, मिरच्या, एखाद दोन लसूण पाकळ्या, जिरे...असे वाटून!

रश्मी, मलाही दिनेशदांची हीच भाजी आठवली.
प्राजक्ता , मागच्या वेळेस अंदाजाने सा.पीठ टाकले होते... थोडेसे बघते तू सांगितल्याप्रमाणे करुन

कुठलीही द्राक्षे जास्त आंबट असतील तर मी मुरांबा करते. अगदी सोपं आहे. ती धुऊन, काड्या वगैरे काढून टाकून एका पातेल्यात पाणी साखर घालून आटवत ठेवते. नंतर त्यात एक दोन लवंगा, असेल तर वेलची पूड, जायफळ पूड किंवा एव्हरेस्ट मिल्क मसाला घालते. किंचित पाक झालेला वाटेपर्यंत करते. आंबट असल्याने साखर जास्त लागते. हे असले प्रकार नवऱ्याला पोळीबरोबर आवडतात.

अन्जू, साखर आणि पाण्याचे प्रमाण काय? मी कधीच मुरांबा केला नाहीये तेव्हा काहिच अन्दाज नाही.
धन्यवाद Happy

प्रमाण नाही सांगता येणार मला (यासाठी sorry खरंच), माझं अंदाजपंचे दाहोदरसे असते सर्व म्हणून मी पाककृती स्वतंत्र धागा काढून कधी लिहित नाही. पाणी साधारण द्राक्षे बुडतील इतकं.

उद्या भाजी किंवा / आणि मुरांबा करेन >> भाजी छान होते त्या रेसिपिने पण, तेल मात्र तेवढ घालु नका.

प्राजक्ता , द्राक्ष संपली . आज चटणी करावी म्हणून मिक्सर ला फिरवली तर ते फारच पातळ झालं, इतर काहि त्यात घातलं नव्हत, म्हणून मग ते गाळून तूप, जिरे , मिरची , कढीपत्ता या फोडणी वर घालून उकळल. मीठ , साखर, थोडं पाणी घातलं, फार सुरेख रंगाच सार झालं होत; चवीला ही अप्रतिम!!

Pages