Submitted by सांज on 7 January, 2021 - 09:22
कवितेच अभिवाचन खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://chaafa.blogspot.com/2021/01/blog-post_7.html
ऊन्हातल्या अंगणाला
सावलीचा भार
आसवांच्या तळ्याकाठी
सुखाचाच सल
कुठे कधी कशी सरली
जाणीवांची ओल
वाढणाऱ्या वयाला रे
खुंटण्याचा शाप
गाव गेलं मागे, त्याची
वाट सुनसान
हिरव्या आठवांचं मनी
हलणारं पान
गंध मोगऱ्याचा आता
साहवेना फार
काट्यांतल्या बाभळीची
फुंकर ती गार
वेगळाचं ध्यास, त्याचं
वेगळंच वेड
वेड्या गोष्टींमध्ये आता
आयुष्याचं सार
ऊन्हातल्या अंगणाला
सावलीचा भार
आसवांच्या तळ्याकाठी
सुखाचाच सल
~ सान्ज
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता!!
सुंदर कविता!!
अभिवाचन हि छानच!!
धन्यवाद रूपाली
धन्यवाद रूपाली
गंध मोगऱ्याचा आता
गंध मोगऱ्याचा आता
साहवेना फार
काट्यांतल्या बाभळीची
फुंकर ती गार
ही ओळ खूप आवडली
धन्यवाद
धन्यवाद
छान कविता
छान कविता