Submitted by मुग्धमानसी on 5 January, 2021 - 08:44
या भेटीच्या नंतर थबकून
जाईल हा बनवास ऋतूविण
या झाडांना, फुला-फळांना
बघशील तू निव्वळ भांबावून
या भेटीच्या नंतर उधळील
माती भिरभिर वादळ इवले
असण्या-नसण्याच्या काठाशी
बसताना घे मिटून डोळे
या भेटीच्या नंतर जे जे
उगवून येईल त्या वाटांवर
ते ते सारे घुटमळेल पण
देऊ नको तू त्यांना उत्तर
या भेटीच्या नंतर अलगद
पुसून घे तू सगळी अडगळ
हिरव्या तांबूस उग्र क्षणांचा
टाक पिऊन तो उत्कट आगळ
आणि तरी शुद्धीत रहा तू...
देऊ नको हे पुन्हा निमंत्रण
बघता बघता एका साध्या
धूळभेटीचे होते बंधन!
या भेटीच्या नंतर केंव्हा...
कधीतरी फारा दिवसांनी
तळव्यावरच्या फिक्या खुणांतून
निर्झरेल सौख्याचे पाणी!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा, सुरेख!
वा, सुरेख!
सुरेख!
सुरेख!
धन्यवाद!
धन्यवाद!
सुरेख आणि गेय कविता. मस्त !
सुरेख आणि गेय कविता. मस्त !
अप्रतिम
अप्रतिम
मस्त!
मस्त!
अतिशय आवडली कविता !
अतिशय आवडली कविता !
खूप सुन्दर
खूप सुन्दर
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर. मी काव्य संमेलनात
सुंदर. मी काव्य संमेलनात म्हणतात तशी म्हणून पाहिली.....:-)