| कुंदा |

Submitted by अक्षता08 on 9 January, 2021 - 23:26

कुंदाचा सुगंध मोगऱ्याची आठवण करून देतो. ह्या फुलांचा सुगंध मंदपणे दरवळतो, घमघमाट नसला तरी मंद सुगंध येत राहतो. कुंदाच्या फुलांचे गुच्छ फुलले असल्यास सुगंध जास्त प्रकर्षाने जाणवतो.
परंतु, कुंदाची खासीयत त्याच्या सुगंधात किंवा उमलेल्या फुलात नसून त्याच्या कळ्यांमध्ये आहे. कुंदाच्या कळ्यांना गुलाबी रंगाच्या छटा असतात हे फूल समोरून जरी शुभ्र कांती असल तरी फुलाचा मागील भाग गुलाबी छटांचा असतो.

कुंदा मुख्यत्वे हिवाळ्यात फुलते. ह्या फुलांचा बहर अप्रतिम दिसतो.ह्याची जास्त काटछाट करू नये. कुंदाच्या झाडाला मनसोक्त वाढू द्याव (मुख्यत्वे त्याच्या बहराच्या काळात). कुंदा हे फुलझाड फारस त्रास देत नाही. मात्र, ह्याच्या पानांकडे लक्ष द्यावे, पानांना लवकर कीड /बुरशी लागते. हे फुलझाड नर्सरीमधुन घरी आणल्यावर कदाचित पटकन वाढणार नाही किंवा फुलही लवकर येणार नाहीत. परंतु, थोडी वाट बघितल्यावर व आपल्या घरात कुंदा सेटल झाल्यानंतर कुंदाच्या बहराचे दर्शन घडते. (It will surely bloom and will bloom in abundance).
कुंदाला फुलण्यासाठी उत्तम सूर्यप्रकाश, १५-२० दिवसांतुन एकदा खत, दररोज पाण्याची आवश्यकता आहे. कुंडी साधारण मध्यम किंवा मोठ्या आकाराची घ्यावी.

फूल किंवा सुगंधाच्या बाबतीत कुंदा अव्वल नसली तरीही तिची खासियत आणि सौंदर्य तिच्या कळीत दडलं आहे.

4.jpg3.jpg1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती आणि सुंदर फोटो. माझं आवडतं फुल आहे.

माझ्याकडे अगदी छोटं रोप आहे. छोटं म्हणजे वीतभर पण नाही. पान 8-10 आणि ती अजून कुंडीतील मातीत टच होतात इतकं छोटं रोप. रोप लावल्यापासुन गेल्या 3-4 महिन्यात त्याची उंची अजीबत वाढत नाहीए. पण दोन आठवड्यापूर्वी त्याला सरप्राईजिंगली एक फुल आलं.

मला तर हा कुंदा, चमेली आणि जाई -जुई मध्ये काय फरक आहे नेमका ते अजून कळाले नाही. अजूनेक तिरंगा असतो बहुतेक.
बादवे मला एकदा एक आयुर्वेदिक तेल कढवायचे होते तर जुई-चमेली फरक न कळाल्याने नाही बनवता आले.

@मीरा..
धन्यवाद Happy
व्वा मस्तच !!
(पण दोन आठवड्यापूर्वी त्याला सरप्राईजिंगली एक फुल आलं.)

@जाई.
धन्यवाद Happy

@लावण्या
धन्यवाद Happy
हाहाहाहा Lol
(फूलं तोडायला कंटाळा येतो इतका....)

@किशोर मुंढे, @Shreya_11 @देवकी
धन्यवाद Happy Happy

@mabopremiyogesh
धन्यवाद Happy
(खत म्हणजे काय घालायचे)
कांद्याच्या सालांच पाणी, शेणखत, सुकवलेली चहा पावडर, निर्माल्य, seaweed liquid खत, जीवामृत, compost, इ. ह्यापैकी कोणतंही..

@जिद्दु
(मला तर हा कुंदा, चमेली आणि जाई -जुई मध्ये काय फरक आहे नेमका ते अजून कळाले नाही.)
दूरून ही सर्व फूलं एकसारखी भासतात. परंतु, प्रत्येक फुलाचा आकार आणि पाकळ्यांची रचना वेगळी आहे आणि गंधही...