शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, आणि कोण कोण आहात? अशी हजेरी घ्यायची म्हणजे किती जणांनी उतारा वाचला / सोडवायला हजर, इच्छुक आहेत त्याचा अंदाज येतो. सगळी नावे उत्तर-प्रतिसादांत झाली की मूळ उत्तर देता येईल.
किंवा कोड्याच्या कठीणपणावर. सोपे २-३ तास; अस्मितांसारखे असेल तर थोडा अधिकचा वेळ.

मला वाटते सोपाच होता. तुम्ही सगळ्यानी सोडवला आहे.
हा उतारा श्री कृ कोल्हटकर यांच्या सुदाम्याचे पोहे मधिल होता. सगळ्यांनी मला सांभाळून घेतले यासाठी धन्यवाद.

आता मूळ उतारा
आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या जानव्यात अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करुन त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातल्या किल्ल्या. वरील अनर्थ गुदरल्यापासून साधी बाजारी कुलुपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करु लागले.

ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधीनिषेध बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली,खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी नुसत्याहिसक्यानेच ती उघडत असत.

त्यांची अशी वसुधैवकुटुंबकम वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजारपाचशेचे डबोले घेऊन पळून गेला.

सापडला का शब्द?
व, ब देणार्‍या शब्दांची शोधसूत्रे काय आहेत? ती अक्षरे बदलली तर?

वळब = ओबडधोबड घडवलेला दगड आहे शब्दरत्नाकरमध्ये.
मला वरंभा आठवत होता.......पाणी साठवण्याची खाच शोधताना बघितल्यासारखा आठवतोय. बांध या अर्थी. आता सापडेना. तो पुन्हा शोधताना हा मिळाला.

खूप दिवसांनी एक गूढकोड्याचा प्रयत्न. सगळे शब्द ५ अक्षरी. उत्तराबरोबर त्याची उकलही द्यायची आहे.
* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो.
काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे.

१. मनसोक्त खा वारंवार पण नेमलेल्या निरूंद जागीच
२. सुरेख जागेसी जडे अभाव चिन्ह जेथे, प्रज्ञा-सत्त्व-धीर वसे तेथे
३. इवलेसे कुणी याचा वास येताच संशय येऊन मेले *
४. ना तेल ना पाणी ओतून घे भाजके रूचकर ओथंबलेले
५. व गुंतव नि मागे बघ काय गदळ उरलय जाळीवर
६. आवडीने घे; हुशारी आली? मग चालू लाग की वटवट्या *
७. गलबल्याचा ल कौशल्याने हटवा म्हणजे छान दिसेल
८. दिसतो तसा नसतो त्याला याने चोपा भारीच नखरेल भासेल
९. जर कैदी नाही तर हालचालीवर कडा पहारा का? *
१०. इथे गानरसिक, गानलुब्ध लोक रहातात

सदावर्तात, नाही. त्याचे भोजनालय ऐसपैस असते की.... ही जागा निरूंद पण अर्थ व्यापक आहे

नाही
खानावळीत मनसोक्त कुठे खातात ? जीव जगवायला खातात.
आज्ञार्थी, परवानगी देण्याच्या सुरात खायचेय

नाही, शब्द खाण्याशी निगडीत आहे जागेशी नाही
ही जागा निरूंद पण शब्दाचा अर्थ व्यापक, अमर्याद, अनंत आहे.
आज्ञार्थी, परवानगी देण्याच्या सुरात खायचेय

@ सियोना, तुमचे पहिलेच गूढकोडे असेल तर मागची बघा. भाग ३ व २ मध्ये.
शोधसूत्रात, उत्तराच्या शब्दाचे भाग, त्यांची जुळवाजुळव, त्यांची तोड-जोड कृती याची झलक असते.
कधीतरी शब्दाचा अर्थ, समानार्थी शब्द असतो.

उदा -- फेरफार शब्द असेल तर --
१. फेर फार असा तोडून -- किती वेळा उलटसुलट बदलायचे ते -- असे शोधसूत्र होऊ शकेल.
किती वेळा = खूपदा = फार
बदलायचे = फेर
उलटसुलट = फार आणि फेर यांची जागा बदलून अंतिम उत्तर तयार होणार आहे.

२. फे रफार -- फेसातील सूर धुऊन अक्षरावरचा तुरा लावा --- असे काहीसे होईल
फेसा (वजा) सा = फे + रफार

एखादे सुटले की अंदाज येईल कशी फोड करायची.

नाही.... इतके हाय प्रोफाईल, अतिपौष्टिक खाणे नाही. घरातले टीनएजर लक्षात घेतले तरी पुरे. पण हो टाईप तोच.

चरा -- मनसोक्त खा , पुन्हा तोच
चरात अरुंद जागेत

खा की

उत्तर बरोबर, उकल?
पुढचे घ्यायला ९-१०-७-३-६ उतरत्या क्रमाने सोपे आहेत.
मी आता भाप्रवे ९:०० नंतर येईन. तोवर कोणी सोडवले तर एकत्रच बघेन. सॉरी, मध्ये क्ल्यू द्यायला नसेन.

कुमार सर,

१० इतरेजन नाही....

चराचरात + उकल बरोबर

नजरबंदी बरोबर; उकल --
जर कैदी नाही = न जर बंदी
तर
हालचालीवर कडा पहारा = नजर-बंदी

मंजूताई, वाचता वाचताच यायला लागतात. बघा अजून १-२ प्रयत्नात येऊन जाईल हे पण.
गलबल्याचा ल कौशल्याने हटवायचेय;

गुबगुबीत नाही;
उ वाढवलात, ब, त वाढवलात, त्याची सूचना कुठे होती?

गलबल्याचा ल हटवा; अगदी शब्दशः नका घेऊ.
थोडे आजूबाजूला भाईबंद पण चाचपा.
बघा यावरून सुचते का. नाहीतर अजून क्ल्यू देते.
हे कराल तुम्ही फत्ते.

गुबगुबीत नाही;
मग गुटगुटीत ?
हे नसणार पण दिशा ?

गलगलाट >>> गरगरीत

नाही; यापैकी नाही. नाजूक छान दिसायला हवे
छान दिसण्याचे भाईबंद आहेत तसे गलबल्याचेही असतील ना...
५---> २.५ ---> ५ अशी दिशा आहे
सगळी हिंट वापरा. हटवा कशातून, काय, कशाने; काय मिळायला हवे.

Pages