साखळी

Submitted by द्वैत on 5 January, 2021 - 23:11

साखळी

चंद्र उगवतो जाणे कोणत्या गावात
वाट पाहे तिथे कुणी शुभ्र चांदण्यात

तारा तारा तुटताना नाव घेई कुणी
हसता हसता येते डोळ्यामध्ये पाणी

डोकावती पाण्यामध्ये झाडांच्या सावल्या
जुन्या आठवणी साऱ्या तळाशी साचल्या

पक्षी अनामिक घाली साद अशावेळी
मन धावे वेडे, माझ्या पायात साखळी

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users