साक्षरता अभियान, बर्लिनची भिंत अन व्यवस्थेतला खोटेपणा....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बर्लिनची च्या भिंतीचा पाडाव अन त्या अनुशंगाने झालेल्या घटनांवर आधारीत अनेक चित्रपट / लघुपट गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन दुरचित्रवाणीवर दाखवले गेले.
बर्लिनची भिंत का बांधली गेली इथपासुन तर आज बर्लिनच्य भिंतीचे तुकडे जगभर कुठे विखुरलेले आहेत, अन कुठल्या संग्रहालयात आहेत कि बाजारात काय भावाने विकले जात आहेत्... ही सर्व माहिती छान सांगितली.
यापैकी द लाईफ ऑफ ऑदर्स... http://en.wikipedia.org/wiki/The_Lives_of_Others या चित्रपटात, स्वतांत्र्याचा पुरस्कार करणारा असा संशय असलेल्या एका लेखक- कलाकार जोडप्यावर गुप्तपणे लक्ष ठेवण्यासाठी पुर्व जर्मन सरकार (गुप्तचर संस्थे )मध्ये कामाला असलेला कनिष्ठ सरकारी अधिकारी त्या जोडप्याला मदत करतो, अन स्वतःच्या वरिष्ठाला खोटी माहिती देतो. खरी माहिती लपवण्यासाठी काळजी घेउनही तो रंगभुमी कलाकार असलेल्या महिलेला शेवटी आत्महत्येपासुन रोखु शकत नाही. शेवटी वरिष्ठाला खालच्या अधिकार्‍याने जाणुन बुजुन केलेली गफलत समजते. अर्थात, वरिष्ठ देखील मिळालेल्या माहितीचा गैरवापरच करणार असतो! पुढे पुर्व अन पस्चिम जर्मनी एकत्र झाल्यावर त्या जोडप्यातील पुरुष लेखक झाल्या प्रकारावर एक पुस्तक लिहितो अन ते त्या कनिष्ठ अधिकार्याला अर्पण करतो..... अर्पण पत्रिका अन शेवटचा क्षण अगदीच...अनपेक्षित!
***
दुसरा एक मराठी चित्रपट पाहिला... निशानी डावा अंगठा.... देशी शासकीय यंत्रणेने अत्यंत तडफेने चालवलेल्या प्रवुढसाक्षरता अभियानाची ही कथा..... मकरंद अन अशोक सराफ ह्यांचे मस्त काम! न केलेल्या कामाचे भले मोठे रिपोर्ट अन त्यावर सरकारी पुरस्काराची मोहर.... प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट असे वाटावे अशी कथेची केलेली हाताळणी!
***
दोन सिनेमातील एक समान धागा म्हंजे, शासकीय यंत्रणेतील कनिष्ठांनी वरिष्ठांची केलेली फसवणुक्......एके ठिकाणी दुसर्‍याचा जीव वाचवायला स्वतःचा जीव धोक्यात घातलेला तर दुसरीकडे, स्वतःची नोकरी वाचवायला एका योजनेचा जीव दिलेला!

जै हो! Happy

प्रकार: 

चंपक, दोन गोष्टि. दुसरी म्हणजे, 'निशाणी ..." पुस्तक देखिल वाच. जास्त परिणामकारक आहे. पहिली विसरलो.