( सर्व वाचक रसिक, मित्र, मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. )
स्वागत करण्या नववर्षाचे
करू तयारी निघावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची
जे सरले, गंगेत मिळाले
नको बेरजा वजावटीही
आळवूत या नवीन गाणे
नवे ताल अन् सुरावटीही
असोत स्वर वादी संवादी
सुरेल गोडी जपावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची
नको फुलांचे अन् पानांचे,
तोरण लाऊ माणुसकीचे
"फक्त जगावे अपुल्यासाठी"
धोरण बदलू वागणुकीचे
नको मुखवटे, आस जागवू
सभ्य माणसे बनावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची
डोळ्यामध्ये तेल घालुनी
सावध सारे सचेत राहू
अत्त्याचारा विरुध्द लढण्या
स्फुरण पावू दे सदैव बाहू
हिंमत होवो कधी न कोणा
कळ्या कोवळ्या खुडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची
मी न कधीही ईशकृपेचा
केला गाजावाजा आहे
कुठे पोंचलो? काय जाहलो?
शिल्पकार मी माझा आहे
भाळावरची नशीब रेषा
उगाच का मग बघावयाची?
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची
कधी फुलांची शेज नव्हे हे,
जीवन म्हणजे एक लढाई
सदैव तत्पर संकटावरी
निर्णायक करण्यास चढाई
बघावयाची वाट कशाला?
पुन्हा नौबती झडावयाची
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
सुंदर कविता!
सुंदर कविता!
सुंदर
सुंदर
छान..
छान..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
नवीन 'साली', हे नवीन मेव्हणी
नवीन 'साली', हे नवीन मेव्हणी असं वाटलं कविता उघडण्यापूर्वी. वाचून बघितल्यावर उलगडा झाला.
छान काव्य. नवीन सालीच्या
छान काव्य. नवीन सालीच्या हार्दिक शुभेच्छा
>>> नवीन 'साली', हे नवीन
>>> नवीन 'साली', हे नवीन मेव्हणी असं वाटलं कविता <<<
+११११
नवीन साली,मिळो उभारी! असे
नवीन साली,मिळो उभारी! असे स्वल्पविराम देऊन वाचले जात आहे.
नवीन साली मिळो उभारी
नवीन साली मिळो उभारी
नव्या दमाने उडावयाची>>> इथेच हसून फुटलोय!
सर्वांच्या सेन्स ऑफ ह्यूमरला
सर्वांच्या सेन्स ऑफ ह्यूमरला सलाम माझा. मनापासून आभार सर्वांचे प्रतिसादासाठी.
>> नवीन 'साली', हे नवीन
>> नवीन 'साली', हे नवीन मेव्हणी असं वाटलं कविता <<<
अगदी अगदी..