शी-शु पालन

Submitted by DJ. on 3 October, 2018 - 07:26

गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्‍या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा. काकी, १ महिन्याच्या तान्ह्या बाळाला लंगोट/नॅपी पॅड घालताना त्या लंगोट/नॅपी पॅड मधे एक टिश्यु पेपर ची घडी ठेवतात जेणे करुन बाळाने 'शी' केली फक्त तेवढा टिश्यु पेपर बाजुला काढुन टॉयलेट मधे टाकुन फ्लश करायचा आणि लंगोट धुवायला टाकायचा. Light 1

मला प्रा. काकींनी बाळाच्या शी साठी योजिलेली ही युक्ती एकदम भनाट वाटली.. Proud Proud Proud

हे इथे मांडावयाचे कारण असे की बाळाच्या शी/शु चे मॅनेजमेंट करण्यासाठी प्रा. काकींच्या 'टिश्यु पेपर' सारखे अजुनही काही पर्याय इथे कुणी वापरलेत काय..? आपले मायबोलीकर जगभरात वावरत असताना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे पर्याय सापडले असतील तर ते इथे सांगावेत.. जेणेकरुन काही नवपरिणित जोडाप्यांना भविष्यात ते उपयोगी पडतील. Proud Proud Proud

Group content visibility: 
Use group defaults

Submitted by मोक्षू on 22 July, 2020 - 12:17 >>>>>
बरं वाटलं ? ..... छान झालं.....लहान बाळाना त्रास नको वाटतात.

किल्ली म्हणतात तसे बाळशोपा याचे पाणीही देतात. (बडीशेप नव्हे) पण गॅस, अपचनसाठी. जुलाबासाठी नाही बहुतेक.
तुम्ही बाळकडू / गुटी उगाळता तर त्यातच जे वाढवायचे ( इथे जायफळ) त्याचे २-३ वेढे / वळसे जास्त देतात. वेगळे नको घालायला.
मग कदाचित गुटीत पोट साफ व्हायचे औषध जास्त मात्रेत गेले असावे. ते कमी करावे लागेल. मला नाव खात्रीने नाही आठवत पण सोनामुखी बहुतेक. घरी मोठ्यांना विचारा.
आणि एक सांगितले वहिनीने, पोट विकारासाठी कडू, तुरट चवीचे खाणे पोटात जावे. तर बाळासाठी तुमच्या आहारात कडू, तुरट चवीचा समावेश करायचा.

माझे एक महिन्याचे बाळ आधी दिवसातून किमान दहा वेळ तरी शी करायचे पण गेले दोन दिवस त्याने बिलकुल शी केली नाहीये. त्याच्या पेडीची अपॉइंटमेंट सोमवारची आहे.
मला प्लिज सांगाल त्याचे पोट साफ व्हायला काय करू?

मी वापरलेली ट्रिक.. बाळाला छान मसाज करा.. पोटावर हलक्या हाताने प्रश्नचिन्ह काढल्याप्रमाणे मसाज करा..त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ घाला..आंघोळीच्या वेळेस जास्त पाणी पोटावर ओता.. पोटाला शेक मिळाला की बऱयाचदा पोट साफ व्हायला मदत होते.

व्हिबी, काळजी करू नका, तान्ह्या बाळांना असे होणे खूप नॉर्मल आहे, त्याला फक्त गॅस झाले नाही हे बघा, त्यांच्या सगळ्या गोष्टी सेट होत असतात, त्यामुळे हे बदल होतात.

नुसत्या ब्रेस्ट फीड वर असलेल्या बाळांना 3 दिवसांत एकदा शी पण चालते
शू मात्र दिवसाला मिनिमम 3

थँक्स म्हाळसा, सुहृद , मी अनु

सु करतो तो व्यवस्थित, गॅस झालाय खरा त्याला पण शी पूर्ण बंद आहे.

Bm सोडून त्याला कॅल्शियम अन मल्टी व्हिटॅमिन ड्रॉप्स अन एक थेंब घुटी देतो.

आज पहिल्यांदा त्याने अंघोळी नंतर दुधाची उलटी केली, त्यात नववर्षमुळे पेडी पण नाहीये अन माझी मम्मी सुद्धा, काहीच कळत नाहीये काय करू

डॉ भेटले फोनवर की विचार
तोवर आपले घरगुती उपाय, तव्यावर ओवा पुरचुंडी शेकून हातावर आधी तापमान बघून बेंबी भोवती शेक करता येईल.गॅस साठी फायदा होतो.
एक शेपार्क म्हणून औषध आहे बडीशोप चं.अर्थात जरा आजूबाजूला अनुभव विचारून दे.(त्यात ओवा रिऍक्शन ने सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असू शकेल)

बाळाला सोसेलएवढ्या गरम पाण्यात थोडे हिंग विरघळवून किंवा रूम टेंपरेचरच्या तेलात हिंग कालवून बेंबीभोवती घड्याळाच्या डायरेक्शनने चोळा.
थोड्या वेळाने बेंबीपासून खाली मसाज करा.
पॅनिक नका होऊ.

इतक्या लहान बाळाला मल्टी व्हिटॅमिन ? आई जर मल्टि व्हिटॅमिन घेत असेल तर बाळाला फिडिंग मधून सगळे व्हिटॅमिन्स पोहचतातच...
त्यात आयर्न आहे का? त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकते...

दोन दिवस त्याने बिलकुल शी केली नाहीये. त्याच्या पेडीची अपॉइंटमेंट सोमवारची आहे.
मला प्लिज सांगाल त्याचे पोट साफ व्हायला काय करू?
>> upto 2 weeks also its okay per our pedi if baby is breastfed.
My baby's record is 14 days, when we lost patience and used repository. Happy

I had taken iron supplements when this happened.

डिलिव्हरी नंतर आईला आयर्न , कॅलशियम आणि बाळाला मल्टी व्हिटॅमिन आणि कॅलशियम सुरू असतात. त्यामुळे असं होतं.

बाळाच्या बेंबीला एरंडेल तेल चोळा.

VB, नक्की काय ते तुमचे पेडी सांगतीलच पण एक अनुभव नमूद करते.

माझ्या बाळाला 1 ते दीड महिने अजिबात शी होत नव्हती. असं तब्बल 8 महिने चाललं. आम्ही डॉक्टरला नको नको करून सोडलं होतं. डॉक्टर म्हणायचे - तो नीट दूध पितोय, खेळतोय, झोपतोय तर काहीही काळजी करण्याचं कारण नाही पण 'बाळ शी करत नाही' ही गोष्ट आम्हा कोणाला पचनीच पडत नव्हती.

आमच्या पेडीने सांगितलेलं की ब्रेस्टफीड करणारी काही काही बाळं आईशी इतकी attached असतात की ते सगळं दूध पचवू शकतात आणि त्यांना त्यातली काहीही गोष्ट टाकून द्यायची गरज नसते. तेंव्हा हे ऐकून 'कसला मूर्ख डॉक्टर आहे, असं कुठे असतं का' असं वाटलेलं.
आता वाटतंय डॉक्टरांचं ऐकलं असतं तर किती तरी काळजीचे दिवस आनंदात गेले असते.

सो असं सांगेन की काळजी करू नकोस फार. बाळ जर हसत खेळत असेल आणि दूध व्यवस्थित पीत असेल तर हे खूप नॉर्मल आहे.

सगळ्यांचे आभार, तुमच्या सल्ल्याने मदत झाली, थँक्स☺️

खरतर तेव्हाच लिहिणार होते पण वेळच मिळत नव्हता.
आता करतोय तो शी , सु सगळे.

मी केलेले उपाय सांगते, म्हणजे झालातर फायदा होईल कोणाला.

मी कोरडाच हिंग हलक्या हाताने बेंबी भोवती चोळून मसाज केला अन माझ्या पाठीला लोडचा आधार घेऊन तिरकी बसून त्याला उपडे घेतले माझ्या पोटावर अन हलक्या हाताने clockwise त्याच्या पाठीला चोळत राहिले. असे जवळपास पंधरा मिनिटे करून त्याला झोपवलं. पुढच्या अर्ध्या तासात त्याने शी केली.

पॅनिक नाही पण टेन्शन आले होते मला त्यात त्याने उलटी केली म्हणून जास्त घाबरले होते.

पेडी पण बोलले की हे नॉर्मल आहे कारण तो फक्त दूध घेतो.

परत एकदा सगळ्यांचे आभार

majhi mulgi ata 13 months chi ahe pan gelya 15 divasapsun tila shi cha tras hotoy mhanje neet hot nahiye. jast tras hotana alikade adhichya suppositories madhil 1 hoti ti thodi thodi vaparli. tila parva shi zali pan ratri radtana suppositories vaparli pan thodich zali tyanantar ajun zali nahi . javalchya pedi ni kal milk of magnesium navachi aushad dile kal 2.5 ml 1 dose in night. pan gharguti kai karta yeil.
her diet - 1. morning cerelac 2. ghari banvlele dal tandul badam kaju che pith milk + water madhe shijvun 3. dudh bhakari / chapati mixila barik karun 4. cerelac / juice ase aste. sorry for english typing . barach prayant kela pan marathi neet ale nahi mhanun .

(मी डॉ नाही, फक्त आहार वाचून वाटतं ते सांगतेय)
आहार बघून वाटतं आहे की पीठं/कार्ब बर्‍यापैकी आहे.
हळूहळू वरण भात्/खिमटी मध्ये थोडा फ्लॉवर मिक्स करुन, दुसर्‍या दिवशी टॉमेटो मिक्स करुन, तिसर्‍या दिवशी गाजर, चौथ्या दिवशी लाल भोपळा (हे उकडून, आणि थोड्या प्रमाणात्,एकच फ्लोरेट, एकच गाजर तुकडा, भोपळ्याची उकडून अगदी छोटीच फोड, एकावेळी एकच भाजी) असे करुन रफेज वाढवता येईल.
मग पोट साफ होईल असे वाटते. एकावेळी एकच भाजी मिक्स केल्यास थोडा चव बदल पण होईल (काही वेळा रिस्क असेल न आवडण्याची, लाल भोपळा ला वगैरे. प्लॅन बी तयार असूदे.)

इथे कुणी reusable cloth diapers वापरलेत का बाळासाठी? Superbottoms चे किंवा इतर कुठल्या कंपनीचे. माझ्या मुलीला pampers वापरून झाले, तेव्हा आधी माहिती नव्हती अशा डायपर्सबद्दल.
आता बहिणीला मुलगी झालेय. १.५ महिन्याची आहे. फक्त रात्रीसाठी वापरायचा आहे. बाकी वेळ लंगोटी वापरतात. ते cloth diapers इतक्या लहान बाळाला घालता येतात का? बाकी ते साफ करणं वगैरे सोपं असतं का? आणि मुळात बाळाला रॅशेस् वगैरे येतात का?

मी माझ्या पहिल्या मुलीसाठी तिसऱया महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत वापरलेले .. रात्रीसाठी रेकमेंड नाही करणार.. सू झाली की ती बाहेर येत नाही पण बाळाला ओलावा जाणवतो आणी ते उठतंच त्यामुळे रात्रीसाठी पॅम्पर्सच वापरा .. दिवसा वापरायला हरकत नाही पण ते आकाराने मोठंच असतं.. मुल ३ महिन्याचं झालं की त्यानंतर वापरू शकता.. बाहेर जाताना न वापरलेलंच बरं

Pages