काय म्हटले की तुम्हाला काय आठवते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 December, 2020 - 02:44

म्हणजे बघा, हं
सनी म्हटले की कोणाला सुनिल गावस्कर आठवतो, कोणाला सनी देओल आठवतो, तर कोणाला सनी लिओनी आठवते.

राहुल म्हटले की एखाद्याला राहुल द्रविड आठवतो तर एखाद्याला राहुल गांधी..... मला मात्र शाहरूख आठवतो

अगदी राम म्हटले तरी मी नास्तिक असल्याने रामायणाच्या रामाआधी मै हू ना मधील राम झालेला शाहरूखच आठवतो

अभिषेक म्हटले की ज्युनिअर बच्चन आठवत असेल लोकांना, पण मला किनई तुमचा अभिषेकच आठवतो Happy

सचिन म्हटले की सचिन तेंडुलकरच डोळ्यासमोर येणारे करोडो असतील, पण माझ्यासारखेही शेकडो असतील ज्यांच्या डोळ्यासमोर महागुरू सचिन पिळगावकर देखील सोबतच येतात.

डॉन म्हटले की अमिताभ की शाहरूख या वादात न जाता आजही माझ्या डोळ्यासमोर दाऊद ईब्राहीमच येतो.

हे झाले व्यक्तींचे,
वडा म्हटले की काय येते तुमच्या डोळ्यासमोर... बटाटावडा की मेंदूवडा...?
मला आमचे मालवणी वडे आठवतात जे गावरान कोंबडीसोबत खाल्ले जातात Happy

ती आमीरखानची जाहीरात नाही का, थंडा बोले तो कोकाकोला... म्हणजे मिनरल वॉटर म्हटले की जसे कित्येकांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा बिस्लेरीच यायची तसे थंडा म्हटले की लोकांना कोकाकोलाच आठवायला हवे हा त्या जाहीरातीमागचा फंडा.

बर्र ऑमलेट म्हटले की काय आठवते? अर्थात, मला तरी अंड्याचे ऑमलेट आठवते. शाळेत असताना एकाने ऑमलेट खाणार का विचारत डब्यातून बेसनाचा पोळा काढलेला तेव्हा अशी सटकलेली माझी.... तोपर्यंत या प्रकारालाही टोमेटो ऑमलेट बोलतात याची कल्पना नव्हती.
हेच पोळी बोलून पुरणापोळीच्य जागी चपाती देणार्‍यांबाबतही व्हायचे. आणि यात चूक ना त्यांची ना माझी..

असो,
मेट्रो म्हटले की आजही डोक्यात पहिले मेट्रो ट्रेन न येता मेट्रो टॉकिजच येते, कारण जुन्या मुंबईशी नाळच तशी जुळली आहे Happy
आणि हि फार्र मोठी लिस्ट आहे...

दरवेळी एखादे नाव वा शब्द कानावर पडताच आपल्याला त्या नावाची सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती वा वस्तूच आठवावी असे गरजेचे नसते, कारण आपला मेंदू म्हणजे काही गूगल सर्च नाहीये.
बरेचदा आपले वैयक्तिक संदर्भ वा आवडही एक असते ज्यानुसार ते ते पहिले डोक्यात येते.
वस्तू, मनुष्य, पशू पक्षी, स्थळ, काळ, घटना वगैरे बरीच आणि विविध प्रकारची सूची बनेल...
ईथे तेच करूया, धागा विरंगुळा ग्रूपमध्ये आहे, तर कोणी काय म्हटले की तुम्हाला पहिले काय आठवते ते लिहूया आणि थोडा विरंगुळा मिळवूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया तेंडुलकर म्हटले की रजनी मालिका
सीआयडी म्हटले की शिवाजी साटम
हॅलो इन्स्पेक्टर म्हटले की रमेश भटकर

मेट्रो म्हटले की आजही डोक्यात पहिले मेट्रो ट्रेन न येता मेट्रो टॉकिजच येते, कारण जुन्या मुंबईशी नाळच तशी जुळली आहे.....+1.

वरती भक्ती बर्वे-इनामदार यांचा उल्लेख आलाय. हे जरा वाईट आहे. पण मला भक्ती बर्वे-इनामदार म्हटले कि जसे फुलराणी आठवते तसे द्रुतगती मार्गावरचा भातण बोगदा सुद्धा आठवतो (आणि विरुद्ध सुद्धा). किंबहुना भातण बोगद्यातून जेंव्हा केंव्हा गेलोय तेंव्हा त्यांच्या अपघाताची बातमी आठवतेच. तेंव्हा तो बोगदा नवीनच झाला होता. आणि अपघात इतका भीषण व दुर्दैवी होता कि त्याची खूप चर्चा झाली होती.

हो मलाही ती चर्चा अंधुकशी आठवतेय...मला भक्ती बर्वे म्हटलं कि घरकुल मालिका आठवते, सह्याद्री वर..आई आणि आजी बघायच्या.. पण भक्ती बर्वेंच्या अकाली जाण्याने सुहासिनी मुळ्ये यांनी मालिकेत त्यांना रिप्लेस केलं होतं हे आठवतंय.

या म्हणतो की बोलतो वर एक धागा काढायला हवा सेपरेट. किंवा कुठल्या आधीच्या व्याकरणाच्या धाग्यात याची चर्चा करता येत असेल तर कोणी लिंक देईल का अश्या धाग्याची?

बाकी मला बर्वे म्हटले की मुक्ताच आठवते.
आणि सोबत स्वप्निलही जोडीने येतो Happy

धनंजय माने म्हटले की अशोक सराफ
लक्ष्या म्हटले की लक्ष्मीकांत बेर्डे
सचिन म्हटले की सचिन पिळगावकर
डैम इट म्हटले की महेश कोठारे

जर्सी 10, तेंडल्या म्हटले की आपला सचिन तेंडुलकर
मोहिनी म्हटले की आपली माधुरी दिक्षित

हिंदी मीडिया त्यांना कितिही सचिनजी, माधुरीजी म्हणू देत आम्ही त्यांना एकेरी नावानेच आपले म्हणतो.

हे सगळे आपले म्हटले की ते जवळचे.

धनंजय माने म्हटले की अशोक सराफ
लक्ष्या म्हटले की लक्ष्मीकांत बेर्डे
सचिन म्हटले की सचिन पिळगावकर
डैम इट म्हटले की महेश कोठारे>>>>>>>> +१००

सियोना, मला पण सेम हेच आठवते Happy

यमाची बहीण यमी ही प्रत्येक भाऊबीजेला ऐकलेली / वाचलेली कथा असताना मुद्दाम त्यांच्यात नवरा बायकोचे नाते असल्याचे भासविणे.

यामी गौतम गेल्या सात एक वर्षांपासून इंडस्ट्रीत असल्याने तिचे नाव वर्तमानपत्रांतून अनेकदा झळकत असतानाही ते चूकीचे लिहिणे.

करण जोहर चे आडनाव उगाचच जोहार असे लिहिणे. हूमायून नेचर ते जोक्स द अपार्ट अशा असंख्य चूका जाणून बुजून करणे.

या सर्व कारणांमुळे ऋन्मेष = ढोंगी हे समीकरण डोक्यात घट्ट बसले आहे. कुठलाही एक शब्द दुसर्‍याची आठवण करुन देतो.

याला synesthesia म्हणतात.काहींना ठराविक आवाजामुळे चवीचा भास होतो.

मला बिर्याणी म्हटले की मायबोलीवरील कथा आठवते
त्यात एक नामवंत शेफ ओळख लपवून लेखकाच्या सोसायटीसमोर राहात असतात. आणि लेखकांना बिर्याणी खाऊ घालतात.
कुणी त्या कथेची लिंक देईल का प्लिज. ( मला लेखकाचे नाव आठवत नाहीये. )

कुणी त्या कथेची लिंक देईल का प्लिज. ( मला लेखकाचे नाव आठवत नाहीये. )
Submitted by _गार्गी_>>
हरिहर यांची कथा होती अशी. 'अल अझीज' असं काहीतरी नाव होते कथेचे.

हा कार मध्ये मुलांबरोबर खेळायचा आवडता खेळ आहे. हा एक आणि हु एम आय? पर्सन गेसिंग गेम.
ओम्नी म्हटलं की मला अजूनही आपले चेसुगु टोल नाक्यावर विरुद्ध बाजूने येताना दिसतात.

Submitted by उपाशी बोका on 27 December, 2020 - 20:29>> धन्यवाद. सुंदर कथा. खुप दिवसांपासुन शोधत होतो.

जुमला शब्द ऐकला/वाचला की माझ्यासकट असंख्य लोकांच्या डोळ्यासमोर एकच तेजपुंज मुर्ती येते.

कसलं मस्त
कुठे आहे ती सोसायटी

Submitted by mi_anu >>>> वरील कथा वाचा. Happy

मला बर्वे म्हटले की, चांदा, डोंगर म्हातारा झाला, थँक यू मिस्टर ग्लाड हे आठवतात.

हे बर्वे आठवले की (त्यांच्या मुलाचा म्हणून) 'तुंबाड' चित्रपट आठवतो आणि तुंबाड म्हटले की श्री ना आठवतात.

वानखेडे म्हटले की स्टेडियम आणि लगेच ती त्या माकडाला सुंदर अशी थप्पड लगावणारे काका आठवतात!

मी ती मिस्टर ग्लाड लहानपणी वाचली होती.एका नक्षलवाद्याला इतकं का लाडावून ठेवायचं वगैरे प्रश्न त्यावेळी त्या वेळच्या अकलेनुसार पडले होते
परत वाचायला हवी एकदा.
"कॉम्रेड, मैने तुम्हारे सिने पे गोली चलाई है, पीठ पे नही"

Pages