बांद्रा वेस्ट - लास्ट

Submitted by मिलिंद महांगडे on 6 December, 2020 - 11:37

बांद्रा वेस्ट लास्ट

ती बँडस्टँडवर एकटीच बसली होती. तिची नजर अजुनही त्याच्या वाटेवर लागली होती. त्याची नेहमीच उशीरा येण्याच्या सवयीमुळे ती त्याच्यावर चिडायची. रागवायची, पण तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं. त्याने कितीही उशीर केला तरी ती आधी रागवायची पण तो राग प्रयत्न करुनही जास्त टिकत नसे . उशीरा का होईना पण तो येईल ह्या आशेवर ती बराच वेळ बसुन होती. पण तिच्या एका मनाने तिला समजावले. तिच्या हातात आजचा पेपर होता. त्यातल्या पहील्याच पानावर ती बातमी होती.

बांद्रा फोर्ट येथे उशीरा रात्री गोळीबार … !!!

काल रात्री बांद्रा फोर्ट येथे मध्यरात्री पोलिस व कुख्यात गुंड पापा खडांगळे याच्या टोळीच्या मधे गोळीबार झाला. वैनीसाहेब म्हणुन ओळखल्या जाणारी महिला ही गुंड पापा खडांगळे याची पत्नी आहे . पापा सध्या जेलमधे असल्याने ही महीला सदरच्या टोळीची प्रमुख झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. वैनीसाहेब व त्यांची टोळी बांद्रा फोर्ट येथे येणार असल्याची खबर सहायक पोलिस निरीक्षक श्री जामसंडे यांना मिळाली व ते केवळ दोन हवालदारांसह त्या टोळीला पकडण्यासाठी गेले. त्या गोळीबारात त्यांनी सर्वांना कंटस्नान घातले परंतु ह्या हल्ल्यात श्री जामसंडे व त्यांचे दोन हवालदारही शहीद झाले. त्यामधे दोन मृतदेह आढळले आहेत परंतु त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. वैनीसाहेब व त्यांची टोळी बांद्रा फोर्ट मधे कोणत्या कारणासाठी गेली व स.पो.नि. जामसंडे केवळ दोन हवालदारांसह तिथे कसे काय गेले ही अनुत्तरीत प्रश्ने आहेत. परंतु ह्या निमित्ताने मुंबईमधे अजुनही बऱ्याच गुंडांच्या टोळ्या सक्रीय आहेत असे समजते. मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तिने ती बातमी वाचली . बातमीत दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे लिहीले होते. त्या एका वाक्यात तिला सगळं कळुन आलं. रॉड्रिकच्या मोबाईलवर तिने सकाळपासून शंभर फोन केले असतील… ! पण प्रत्येक वेळी त्याचा फोन ‘ आउट ऑफ कवरेज एरिया ’ असल्याचे सांगत होता . काल माऊंटमेरीला भेटल्यावर रॉड्रीक पोलिस आणि कुठल्यातरी गँगबद्दल बोलत होता आणि त्यांना भेटण्याविषयी म्हणाला होता. तिला ते जरा विचित्र आणि काळजी करण्यासारखंच वाटलं होतं. तिने त्याला हे असं करण्यापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्नही करुन पाहीला, पण रॉड्रीकला हे टाळता येणार नव्हतं. त्याने ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधलाय असं तो म्हणाला होता. पण आता हे काहीच्या काही होऊन बसलं होतं. आजुबाजुला बरेच लोक होते पण त्यात आपलं म्हणावं असं कोणीही नव्हतं. कधीकधी माणुस गर्दीतही एकटा असतो. एलिनाला तो एकटेपणा सहन झाला नाही . तिने त्या पेपरने आपलं तोंड झाकुन घेतलं आणि अचानक तिला रडु आलं. ह्या सगळ्यात रॉड्रीकचा काय दोष होता ? तो कशासाठी ह्या प्रकरणात अडकला ? हे मात्र तिला कळत नव्हतं. आणि रॉड्रीकनेही तिला कधी काही सांगितलं नव्हतं. सगळं काही नीट पार पडल्यावर तो तिला सांगणार होता . ती हमसुन हमसुन रडु लागली. ती तशीच रडत असताना तिच्या खांद्यावर मागुन कुणीतरी हात ठेवला. तिने मागे वळुन पाहीलं आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो रॉड्रीक होता. आणि तिच्याकडे पाहुन मंद स्मित करत होता. आपल्याला भास होतोय का? ती तिचे डोळे चोळुन पाहु लागली. रॉड्रीक तसाच समोर उभा होता … अगदी खरा ! ” रॉडी, रॉडी …. आर यु ओके …? आ … आय थॉट… ” असं म्हणुन ती पेपरच्या बातमीकडे आणि त्याच्याकडे आळीपाळीने आश्चर्याने पाहु लागली

” रिलॅक्स एलिना …. मी जिवंत आहे … डोंट वरी ” रॉड्रीक तिला समजावणीच्या सुरात म्हणाला.

” पण ह्या पेपरमधे ….? ” तिला पुढचं बोलता येईना.

” मी तुझ्या समोर उभा आहे. अँड यु स्टिल बिलीव इऩ धिस स्टुपिड न्युजपेपर ? ” तो तिच्यासमोर हसऱ्या चेहऱ्याने उभा होता. तिने तो पेपर फेकला आणि त्याला मिठी मारली. तिला जोरजोरात रडावसं वाटत होतं. काही क्षणांपुर्वी तिने जो भयाण एकटपणा अनुभवला होता तो ती विसरु शकत नव्हती आणि आता एखादा चमत्कार व्हावा तसा तो तिच्या समोर अनपेक्षीतपणे उभा राहीला. दोघेही एकमेकांच्या मिठीत किती वेळ होते त्यांचं त्यांनांही कळलं नाही . थोड्या वेळाने रॉड्रिक भानावर आला . त्याने आजूबाजूला पाहिलं , बरेच लोक त्यांच्याकडे पहात होते.

“ एलिना , लोक पाहतायत आपल्याकडे … ” त्याला एवढ्या लोकांसमोर लाजल्यासारखं वाटत होतं . एलीनाने आजूबाजूला पाहिलं आणि झटकन ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली . त्याबरोबर काही लोकांचा हसण्याचा आवाज कानी आला . ती आणखीनच लाजली . दोघेही तिथून पळाले अन आत समुद्रातल्या एका मोठ्या खडकावर बसले .

“ रॉडी , टुडे आय एम दि हॅपीएस्ट पर्सन एव्हर … ”

रॉड्रिक तिच्याकडे पाहून समाधानाने हसला . अन म्हणाला , “ सुटलो बाबा एकदाचा … ! पण एक मायनर प्रॉब्लेम झालाय . कालच्या त्या गोळीबारात मॉन्ट्याच्या शोल्डरला गोळी लागली . “

“ ओह माय गॉड …! मग आता कसा आहे तो ? कुठे आहे ? ”

“ हॉस्पिटलला आहे … बट ही इज आउट ऑफ डेंजर नाऊ … सकाळपासून त्याच्याबरोबरच होतो. ”

“ थान्क गॉड ! आता काही प्रोब्लेम नाही ना ? ”

“ आता , नो प्रोब्लेम …! ” रॉड्रिक समोरचा बुडणारा सुर्य पहात म्हणाला … काळे ढग जाउन लक्ख निळाशार आकाश समोर दिसावं तसं सगळं काही साफ झालेलं दिसत होतं . जीवावर बेतलेलं प्रकरण निस्तरलं होतं . आज पहिल्यांदाच तो खुषीत दिसत होता . एवढी मोठी रक्कम गमावूनही तो आनंदात होता . त्या गेलेल्या पैशाचं त्याला काहीच दुखः वाटत नव्हतं . खरं तर ते पैसे त्याच्या जवळच असणार होते . पण समोर दिसत असूनही त्याचा उपभोग त्याला घेता येणार नव्हता . नावाला तर तो करोडपती होता , पण सध्या तरी रोडपतीच होता . पैसा नसला तरी ह्या पैशाच्या पाठलागाने त्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या होत्या. एखादी गोष्ट जर सहजासहजी मिळाली तर समजावं कि तिची किंमत चुकती करणं अजून बाकी आहे , हे सत्य त्याला उमगलं होतं . एवढं सगळं होऊनही त्याच्या चेहऱ्यावर नुकतीच परीक्षा संपून सुट्टी लागलेल्या लहान मुलाचा आनंद होता . तो आरामात हात मागे टेकून समोरच्या लालबुंद सूर्याकडे पहात गाणं गुणगुणू लागला . अचानक त्याला काहीतरी जाणीव झाली . एलिना त्याच्या बाजूलाच बसली होती . त्याने तिच्याकडे पाहिलं . तिनेही त्याच्याकडे पाहिलं .

“ एलिना , विल यु मॅरी मी ? ” तो तिच्या गहिऱ्या डोळ्यात पहात म्हणाला . तो असं म्हणाला अन वीज चमकावी तसे तिचे डोळे लकाकले . तो असं काही विचारेल ह्याची तिला कल्पनाच नव्हती .

“ व्हॉट ? ”

“ आय एम आस्किंग यु … विल यु मॅरी मी ? ”

ह्या प्रश्नाची तर ती गेले कित्येक दिवस वाट पहात होती . ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली . तिच्या डोळ्यांतून पाणी केव्हा आलं तिचं तिलाही कळलं नाही .

“ हे … आय एम सॉरी इफ आय हर्ट यु ”

“ स्टुपिड … किती दिवस लावलेस हे विचारायला ! ” म्हणत तिने त्याला मिठी मारली . रॉड्रिकला आता आपण आनंदाच्या शिखरावर उभे आहोत असं वाटलं . तोही तिच्या मिठीत विसावला . ‘ तिच्या होकारातून मिळालेल्या आनंदाला जगातल्या कुठल्याही आनंदाची सर येणार नव्हती ., अगदी ते नव्याण्णव करोड मिळाले असते तरी ! ‘ रॉड्रिक मनातल्या मनात विचार करू लागला .

जीवघेण्या प्रसंगातुन तो वाचला होता. जीवाला जीव देणारा मित्र मॉन्ट्या, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी गर्लफ्रेंड एलिना, माणसाला आणखी काय पाहीजे ? आणि आता लवकरच त्याचं एलिनाशी लग्नही होणार होतं. रॉड्रीक कल्पना रम्य वातावरणात असतानाच त्याच्या कानाच्या मागुन ठक… ठक.. असा टाळ्यांचा आवाज आला. त्या आवाजानेच त्याची तंद्री भंग पावली. त्याने चमकुन मागे वळुन पाहीलं … ” ओह…! नॉट अगेन ….! “

” ए राजु … दे रे … ” मागुन एक छक्का त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होता

” डोंट टच मी …. ” तो वैतागुन म्हणाला, ” एलिना, त्याला दे काहीतरी … जाऊ दे त्याला … आय रिय़ली स्केअर्ड ऑफ दिज गाईज… ” एलिनाने आपली पर्स तपासली. पण सुट्टे पैसे मिळेनात… ती पन्नास रुपयांची नोट काढते न काढते तोच,

” मै देती छुट्टा … लाव…. ” म्हणत त्या छक्क्याने ती नोट हिसकावली सुद्धा …!

त्याच्या चार बोटांमधे दहा रुपयांच्या उभ्या घडी घातलेल्या बऱ्याच नोटा होत्या. त्यातल्या चार नोटा त्याने एलिनाला परत केल्या.

” ये एक नोट बदली करके दो…. ये नोट नही चलेगा… ” तीने एक नोट पुन्हा त्या छक्क्याकडे परत दिली.

” ये क्या हुआ बेबी … चलेगा क्यू नही ? … दौडेगा…. ”

” नहीं … तुम ये बदलके दो… “

त्या छक्क्याने ती नोट उलटी पालटी करुन पाहीली … ” ठिक है… देती …. साला ये नोट कोई लेताच नय… ” म्हणत त्याने ती बदलुन दुसरी दिली आणि तो गेला.

” सम पीपल आर रियली स्टुपीड…. नोटा कशाला खराब करतात, गॉड नोज….! ”

” का ? काय झालं ….? ”

” त्या छक्क्याने दिलेल्या चेंज मधल्या एका नोटेवरच्या गांधींचे स्पेक्स् रेड कलरचे केले होते… कॅन यु एक्सेप्ट सच काईंड ऑफ नोट…? ”

” काय ? ” रॉड्रीक ते ऐकुन उडालाच… ” कुठे आहे तो छक्का …? ”

” तो तर गेला … डोंट नो व्हेअर….! बट व्हॉट हॅपन्ड ? ”

” ओह गॉड….! ” म्हणत रॉड्रीक त्याला शोधायला धावला ……

… समाप्त …

https://kathakdambari.com

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा वाचली नाही.
अर्धे अपभ्रंश व अर्धे देवनागरीत लिहिलेले इंग्लिश शब्द, शीर्षक म्हणुन असलेली व मराठीत ईतर भाषंची भेसळ असलेली कथा काही तितकीशी चांगली नसणार असा माझा अंदाज.
ज्या लेखकाला, साधे शीर्षकही त्या भाषेत लिहिता येत नाही, इंग्लिश हिंदीच्या कुबड्या घेतल्याशिवाय चार सलग वाक्ये लिहीता येत नाहीत, तर तो कथा काय लिहिणार.
United Kingdom व U.S.A. ईथे जन्मलेले लेखक ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे असे अनेक जण चांगले लिहितात. मी असे अनेक दर्जेदार कथा/पुस्तके वाचलेली आहेत. एकतर मूळ इंग्लिशमधे किंवा दुस-या भाषेत असेल तर, विषयाशी सुसंगत काहीतरी कल्पक असे शब्द योजुन शीर्षक दिलेले चांगले दर्जेदार लेखन असते त्यांचे.
तसेच, कथेतली पात्रं जरी दुस-या समाजातली/भाषा बोलणारी असली तरी, इंग्लिश कथा लिहिताना वाचकासाठी सगळे इंग्लिशमधेच लिहिलेले असते.
उगाच एखादे पात्र जापनीज आहे म्हणुन वाचकालाही जापनीज येत असेल असे गृहीत धरुन, इंग्लीश पुस्तकात त्या पात्राची सगळीच वाक्ये जापनीज मधे नसतात.
आजकाल हिंदीतुन दर्जेदार पुस्तके लिहिणारे अनेक आहेत. त्यापैकी किती जण, मराठी पात्राच्या तोंडी मराठी वाक्ये लिहितात? असो.
मराठीत लेखन करण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.

मिलिंद, खुप छान लिहिलं आहे. मी आज एका दिवसात सगळं वाचुन काढलं. एवढी उत्कंठा एकेक भाग आज-उद्या असं वाचण्यासाठी परवडली नसती. छान लिहिता. असंच लिहित रहा.

सर्वांचे आभार .....
.
@अभि _नव .... कथा न वाचल्याबद्दल धन्यवाद

सर्वांचे आभार .....
.
@अभि _नव .... कथा न वाचल्याबद्दल धन्यवाद
१११११
कथा न वाचता काहीतरी ज्ञान देण्यापेक्षा कथा वाचून त्यातील काही असेल तर चुका सांगणे लेखकास पुढील लेखनासाठी प्रोत्साहित करणे सारखे आहे असे मला वाटते.

कथा न वाचता काहीतरी ज्ञान देण्यापेक्षा कथा वाचून त्यातील काही असेल तर चुका सांगणे लेखकास पुढील लेखनासाठी प्रोत्साहित करणे सारखे आहे असे मला वाटते.
नवीन Submitted by सुजाहरि on 8 December, 2020 - 09:25
>>
सांगीतले होते. पहिल्या भागात. त्यांनी उद्धटपणे सुधारणा करण्यास नकार दिला.

मला कथा आवडली, थोडी लवकर संपवळीत असे वाटले, आणि शेवटी बराचसा अपेक्षितच होता..
पण आवडली..

सगळे भाग वाचले. आवडले.
काही भाग लहान होते की माझा interest जास्ती असल्यामुळं मी भराभरा वाचले हे कळेना.
असंच काहितरी हलकं फुलकं लिहित रहा.

अभि_नव आपल्यला सावरकरी मराठी मध्ये लिहिणे अपेक्शित आहे काय? मुम्बई मध्ये किति लोक तुम्हाला वान्द्रे पश्चिम असे म्हणताना सापडतील ही एक शन्काच आहे!

उत्तम कथा! धन्यवाद!

अभि_नव आपल्यला सावरकरी मराठी मध्ये लिहिणे अपेक्शित आहे काय? मुम्बई मध्ये किति लोक तुम्हाला वान्द्रे पश्चिम असे म्हणताना सापडतील ही एक शन्काच आहे!

उत्तम कथा! धन्यवाद!
नवीन Submitted by abhijat on 8 December, 2020 - 14:49
>>
abhijat, तुम्हाला मराठी वाचता येत नाही काय? सावरकरी मराठी काय असते? द्वेष करण्याजोगी एखादी गोष्ट आहे का ती? की मराठी पेक्षा वेगळी भाषा आहे? की मराठीतच नवे शब्द तयार करुन वापरण्याची पद्धत आहे? त्यात चुकीचे काय आहे?

मुम्बई मध्ये किति लोक तुम्हाला वान्द्रे पश्चिम असे म्हणताना सापडतील ही एक शन्काच आहे!
>>
त्याच मुंबईमधे किती हजार लोक जेल मधे आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यामधे? मग तुम्ही पण जाता का गुन्हा करुन आत? नै म्हणजे एवढे सगळे लोक जेल मधे आहेत म्हणजे जेल मधे जाणे बरोबरच असले पाहिजे, तुमच्या तर्काप्रमाणे नाही का?

नसतील बोलत तर जागृती करायला हवी. कोणी करत असेल तर सहकार्य करायला हवे.
आपण मराठी लोक, कमीतकमी आपापसात बोलताना तरी वांद्रे म्हणु शकतो की नाही?
समोरासमोर बोलताना बोलीभाषेत थोडे वेगळे शब्द असु शकतात. त्यावर आक्षेप नाही.
प्रत्येक्ष बोलताना कोणी बांड्रा, बांद्रा, बँड्रा बोलत असेल तर किती आक्षेप घेणार याला मर्यादा आहेत.
पण अधिकृतरित्या लिखाणकाम करताना अधिकृत नावे/शब्द/स्पेलिंग वापरले पाहिजे. त्यापेक्षा वेगळे नाव वापरायचे असेल तर त्यामागे काहीतरी कलात्मक कारण/उद्देश हवा. वांद्रे वेस्ट ही चालले असते की?

कदाचित कथेचा नायक ख्रिश्चन असल्यामुळे अन तो कार्टर रोड वरील घरात रहात असल्याने त्याच्या आजुबाजुला वांद्र्याला बांद्रा, बँड्रा म्हणणारे जास्त असु शकतात त्या अनुषंगाने कथेला 'बांद्रा वेस्ट' असं नाव दिलं असावं आणि ते समर्पक देखील वाटतं.

बाकी मी बोलीभाषेतही वांद्र्याला वांद्रे पुर्व्/पश्चीम असंच म्हणतो एवढंच काय सायन ला देखील शीव म्हणतो..

कदाचित कथेचा नायक ख्रिश्चन असल्यामुळे अन तो कार्टर रोड वरील घरात रहात असल्याने त्याच्या आजुबाजुला वांद्र्याला बांद्रा, बँड्रा म्हणणारे जास्त असु शकतात त्या अनुषंगाने कथेला 'बांद्रा वेस्ट' असं नाव दिलं असावं आणि ते समर्पक देखील वाटतं.
नवीन Submitted by DJ.. on 8 December, 2020 - 14:58
>>
असा कथा नायक व त्या अनुषंगाने हे नाव नक्कीच असु शकते. काही चुकीचे नाही त्यात.
पण मग तसच, मूळ मराठी नाव न वापरता, अमराठी लोकांनी मोडतोड केलेले नाव वापरुन तेच खरे नाव आहे या अफवेला आणखी पसरवुन व ते नाव आणखी रुढ करण्यात एकप्रकारे योगदान देऊन वर मी केलेली सुचना नाकारुन तशीच कथा पुढे दामटल्याने, कथा न वाचताच नकारात्मक प्रतिसाद देणारा माझ्यासारखा सामान्य मराठी वाचकही असु शकतोच की? पुढच्यावेळेला मूळ मराठी नाव वापरावे, असे लेखकाला सुचवणारा मराठी वाचकही असु शकतोच की?
हे तुम्हीही समजुन घ्या?

बाकी मी बोलीभाषेतही वांद्र्याला वांद्रे पुर्व्/पश्चीम असंच म्हणतो एवढंच काय सायन ला देखील शीव म्हणतो..
नवीन Submitted by DJ.. on 8 December, 2020 - 15:00
>>
धन्यवाद.

जबरदस्त झाली आहे कथा. पण मला लोकल डायरी जास्त आवडली.
लोकल डायरीचा दुसरा सिझन अजुन वाचायचा बाकी आहे. वाचेनच आता.

खरंतर तुमच्या सगळ्या कथा मला आवडतात. सुरेखच असतात. लेखन शैली जबरदस्त आहे.