भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://youtu.be/_QLISgNI5qU
हा डॉ शीतल आमटे यांचा भुभु आणि माणूस यावरील सुंदर व्ह्डीओ पहा. आज त्या भुभुला खूप वाईट वाटले असेल.

@mi_anu

'बंदिवान मी या संसारी' >> Lol Lol

हसून हसून लो पो झालो....

>> अतुल तुमच्याकडे एक कुत्रा व एक मांजर आहे ना, सही धमाल येत असेल. कॅट-डॉग व्हिडीओ बघणे मला प्रचंड आवडते.
>> मला वाटतं दोघं बरोबरीने वाढले असले तर कुत्रा मांजरात मैत्री होऊ शकते नाहीतर
>> Submitted by वर्षा on 29 November, 2020 - 21:09

हा प्रतिसाद आत्ता पाहिला.

नाही, हे दोघे बरोबरीने वाढलेले नाहीत. त्या फोटो मधली कोको (मांजरी) हि स्नोई (कुत्रा) पेक्षा बरीच मोठी आहे. ती साडेतीन वर्षाहून जास्त वयाची आहे. फोटो काढला तेंव्हा स्नोई साडेतीन महिन्याचा असेल. कळत नव्हते म्हणून तो इतका शांत आहे. आणि तो इतका लहान आहे म्हणून ती शांत आहे. मला मात्र जाम टेन्शन होते फोटो काढताना. बिथरलेले मांजर फार वाईट असते. मांजर म्हणजे वाघच असतो छोटा. तशीही ती अतिसावध होऊन बसली होती तेंव्हा. कोणत्याही कारणाने बिथरली असती तर एका फटक्यात स्नोईच्या डोळ्यावर पंजा मारून पसार झाली असती.

कोको तशीही येऊनजाऊन असते. पण आता स्नोई बराच मोठा झालाय. कोकोचा नुसता सुगावा लागला तरी भयंकर उग्र होऊन गुरगुरत व भुंकत तिच्या दिशेने धावून जातो. एकत्र वाढले नसतील तर हे त्यांच्यातले नैसर्गिक नाते. त्यामुळे कोको येताना दिसली कि तिचे खाणे खाऊन ती जाईपर्यंत आम्ही स्नोईला अन्यत्र बांधून घालतो.

सांगून, ओरडून, आर्जव करूनही ऐकत नसेल
तर काय करतात बाकीचे पालक
नेटवर पाहिले तर positive reinforcement करा म्हणतात ते कसं करायचं कळत नाही

ओडीन आज टीनेज मुलासारखा वागत होता, हट्टी आणि दुराग्रही
आधी त्याचं चिकन साफ करत होतो तर कच्चे पळवले
तेव्हा एकदा ओरडा खाल्ला
मग ग्राउंड वर गेलो तर दुसऱ्या कुत्र्यासोबत मारामारी केली, बाजूला करतोय तरी परत पळत पळत येऊन अंगावर उड्या मारून मस्ती करत होते
त्याला कॅनाल मध्ये पोहायला जाम आवडत आणि गेले बरेच महिने दुरुस्ती मुळे कॅनाल बंद होता ते काल पाणी सोडले पण सगळा गाळ होता वाहत आलेला, कचरा पण याला पाणी बघून वेड लागत आणि गेला पळत पळत आणि उडी मारली
मी इतक्या विनंत्या, अर्जवे, धमक्या दिल्या कशाला दाद देईना
मी चाललो घरी म्हणलं तरी डुंबत बसला
मग आणला कसा तरी खेचून
एरवी इतका उद्दाम वागत नाही मग दोन फटके देऊन वरती बांधून ठेवला
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर खायला दिलं, पुसलं आणि खाली घेऊन आलो तर येऊन सोनपापडी च्या बॉक्स मधली एक चोरली
इतका आधाशीपणा मला खपतच नाही, मग अजून एक फटका खाल्ला
कळतंय की हा त्यांचा नॅचरल पणा आहे पण असा हुडपणा कमी करायला किंवा त्या परिस्थितीत त्याला डायव्हर्ट करायला काय करावं?

कॅनॉल वर मस्ती केली म्हणून घरी आल्यावर शिक्षा केलीत ? नका हो असं करू Happy मधे काही मिनिटे गेली तरी मग नंतर त्यांना कळत पण नाही कशाबद्दल शिक्षा केली ते. ( खोटं कशाला बोला, मला हे असे दुसर्‍यांच्या कुत्र्यांनी नॉटीपणा केलेले किस्से वाचून भयंकर हसू येतं , किती क्यूट असं वाटतं. आपल्या दिव्य बाळाने ते उपद्व्याप केले की कळतं किती त्रास होतो निस्तरायला)
ओडिन चे टीन एज आहे ना, करतातच मग अशी मस्ती . माउई पण दुसर्‍या कुत्र्यांच्या अंगावर अग्रेसिवली धावून जाणे वगैरे गुण दाखवू लागला आहे, एकदा बाहेर बॅकयार्डात गेला तर आत येतच नाही. लोकांनी सांगितलेय की न्यूटरिंग केल्यावर जरा काम डाउन होतात. बघू कळेलच Happy

हो मलाही जाणवलं की शिक्षा नको होती पण काय करू ऐकचे ना
इतकं घाण पाणी होतं, सगळा गाळ, निर्माल्य, प्लॅटिक, बाटल्या म्हणलं आपण नंतर येऊ, गोडी गुलाबी दाखवून झाली, ट्रीट चे अमिश झाले
पण तो म्हणजे मी नाहीच ऐकणार जा अशा मोड मध्ये होता
मग माझा पारा चढला
नंतर जाणवलं इतकं चिडायला नको होतं पण त्यावेळी कंट्रोल झाला नाही हे खरं
नंतर मग लगेच पाय चाटून, हात चाटून सॉरी वगैरे म्हणून झालं
मीही मग ठिके आता यापुढे असं करायचं नाही वगैरे म्हणत लाड केले

न्यूटरिंग केल्यावर जरा काम डाउन होतात. बघू कळेलच>>>>
हो मलाही व्हेट ने सांगितलं आहे
त्यांचं मेटिंग किंवा न्यूटरिंग केलं की मस्ती करत नाही,नुसता आळशी लोळत राहतो म्हणून याल
आणि आता हार्मोन्स हाय आहेत अल्फा मेल व्हायची, डोमीनेट करायची वृत्ती वाढायला लागली आहे
एकदम ट्रीकी वय आहे
पौंगडवस्था म्हणतात तसलं
पोरगा आणि ओडीन एकाच वेळी माझे उरले सुरले केस पांढरे करणार म्हणजे Happy

खोटं कशाला बोला, मला हे असे दुसर्‍यांच्या कुत्र्यांनी नॉटीपणा केलेले किस्से वाचून भयंकर हसू येतं , किती क्यूट असं वाटतं. आपल्या दिव्य बाळाने ते उपद्व्याप केले की कळतं किती त्रास होतो ..... हे आवडलं.तुमचा maui क्यूट आहे.

ओडींनच्या खोड्या आणि तुमचा वैताग वाचून मजा आली.बाकी ओडीन ने एक sohanpapadi खाल्ली. मेलं आमच्या 2-३ खाल्ल्या जातील.एक क्षण वाईट वाटले.बिचारा आपण त्याला पाळले म्हणजे आपल्या मनाने जे देऊ ते त्याने खाल्ले पाहिजे.पण मग मैत्रेयी ची पोस्ट पटली.
असेच छान लिहीत जा.

वाईट एक सोनपापदी खाण्याचे नही चोरून आणि कशातही तोंड घालून खाण्याचा आहे
एरवी तो देवसंमोरचा नैवेद्याचा लाडू पळवतो, किचन मधून खोबऱ्याची वाटी
तेव्हा त्याला ओरडत नाही फक्त असं करू नको सांगतो
आम्ही काही खात असताना आमच्या घासातला घास काढून देतोच, आइस्क्रीम सुद्धा
पण हे अस ताटात, भांड्यात, बॉक्स मध्ये तोंड घालून खाणं accept केलं जाणार नाही हे त्याला कळायला हवंच, काहीही कसाही वागलं तरी चालताय ही समजूत होऊ देणं नंतर त्रासदायक होईल म्हणून केवळ

kalyanib ,फुंतरुचा दात विचकलेला फोटो पाहून खूप हसले होते,प्रतिसाद उशीरा देतेय.

बराच गोंधळ घातला कि ओडीनने!
पण त्याला असं एकटं बाहेर जाता कसे येत ??

आमच्या पिल्लूच वाढदिवस होता म्हणून आम्ही त्याला पिझ्झा आणला होता (आपला नाही डॉग साठी वेगळा मिळाला डॉग शॉपी मधून ) पण त्याने त्याचे पोट बिघडले . इथे सांगायचे कारण एवढेच कि कोणी आपल्या पिल्लाना देताना विचार करून द्या
btw भू भू साठी स्पेशल बिअर -पण होती

एकटा कुठं, मी होतो की सोबत
त्याला रोज गाडीवर बसवून ग्राउंड ला नेतो पाच साडेपाच वाजता
ग्राउंड एकदम मोकळं आहे
तिथं भटकी आणि ही परदेशी अशी बरीच भुभु मंडळी बागडत असतात
तिथं आम्ही रनिंग करतो, बॉल खेळतो, पकडा पकडी आणि बाकी भुभु सोबत मस्ती
त्यावेळी त्याला लीश नसतो बांधलेला

अस करून तास दीड तासाने परत येतो चांगले दमून
ग्राउंड ला लागूनच जॉगिंग ट्रॅक आहे आणि तिकडे पोलीस शी वाद झाल्यापासून जायचं बंद केलं।आहे
पण भटकी कुत्री ट्रॅक वर हिंडत असतात त्यांना बघून
ओडीन सुद्धा उडी मारून तिकडे जायला लागला की मी फक्त नो नो म्हणलं तरी माघारी येतो
ट्रॅक वरून भरपूर लोकं जात असतात
ते कधी तिथं थांबून गंमत बघतात खेळताना ची किंवा मग घाईघाईने निघून जातात
सुदैवाने तिथं खेळायला अजून कोणी आक्षेप घेतला नाहीये

ट्रॅक ओलांडला की तारेची जाळी आहे त्याला तीन चार ठिकाणी जाळीच नाहीये ती ओलांडून एकदम तीव्र उतार आणि मग कॅनाल
असा आहे ते

बिग बास्केट वर दिवाली गिफ्ट म्हणून कुत्र्यांसाठी खास बारकी अन्नाची पाकिटे उपलब्ध आहेत. आज आमच्या स्ट्रे बाळांनी फिश आव्डीने खाल्ले. परत पिशवीचा वास घेउन वात आणला. ह्यांची एक लीडर बहीण आहे राणी. तिला मी गुड गर्ल म्हणून तिचे लाड करते दोन तीन मिनिटे तर तिला आता तिचे नावच गुडगर्ल वाटायला लागले आहे. आमच्या शेजार्‍यांची नात स्वतंला गुड गर्ल गुड्डल म्हणत असे तेच तिचे निक नेम झाले होते ते आठवले. हिचे डोळे व स्किन एका अजब मिक्स रंगाची आहे. जमले तर फोटो टाकते.

हरणी हिची बहीण बाळंत होउन पिल्ले दिलेली आहेत पण कुठे लपवली आहेत कोण जाणे.

लॉक डाउन मध्ये एक किटी अगदीच लहान होती आता पिशवी वर उड्या मारून खाउ मागून घेते.

आज ब्राउनी व काजल नी फिश खाल्ले मग गुड्डल ला उरलेच नाही. रवीवारी पापलेट मागवले आहे त्यातले तिला देइन . मला म्हातारीला काय कराय्चे पापलेट.

आमच्या पिल्लूच वाढदिवस होता म्हणून आम्ही त्याला पिझ्झा आणला होता""
अरे हा एलॉन चा तिसरा वाढदिवस नाही का
खूप खूप शुभेच्छा त्याला
Happy

हे आमचे स्पॉटी व कॉफी बहिणभाऊ. गावठी कुत्रे आहेत. दोघे मेल म्हणून आणले होते पण नंतर लक्षात आले की स्पॉटी 'ती' आहे.

कॉफी अगदी मंद आहे, बहीण काय करते याचा अंदाज घेऊन वागतो. स्पॉटी एकदम स्मारटी आहे. दोघांना वेगवेगळे जेवायला देते. कॉफी स्वतःच्या ताटातले जरासे खाऊन स्पोटीच्या ताटात तोंड घालतो. स्पोटी त्याला डोक्यानेच उडवून लावते, स्वतःचे भरभर खाते आणि जाऊन कॉफीचेही फस्त करते. दोघे दिवसभर भांडत असतात...

काय हँडसम आहेत स्पॉटी आणि कॉफी.
एक अवांतर शंका; इथे ज्या भूभूज चे फोटो आहेत ते सगळे तपकिरी शेड मधलेच आहेत. कोणी काळे किंवा काळे पांढरे भुभू फोटो नाहीत का?
तपकिरी वालेच जास्त मिळतात का ब्रिडर कडे?

आमच्या समोरच्या घरात लुना नावाची मिनी गोल्डन डूडल आहे माउईच्याच वयाची. सुपरवाइज्ड प्ले डेट्स होतात बर्‍याचदा त्यांच्या. पण खिडकीतून ताक झाक सारखी सुरू असते. ती बाहेर असली की माउईचा घरात दंगा सुरु होतो चला बाहेर तिच्याकडे म्हणून. आत्ता परवा थॅन्क्स गिव्हिंग च्या दिवशी मजाच केली त्याने. माउई घंटि वाजवून बाहेर बॅकयार्ड मधे गेला. माझा जंगी कुकिंग चा दिवस त्यामुळे त्याला दार उघडून देऊन ५ मिनिटाने पुन्हा बोलवावे म्हणून मी आत आले, लीश नव्हतीच. बॅकयार्ड फेन्स्ड आहे त्यामुळे तसे करतो आम्ही बर्‍याचदा. तर तेवढ्यात माउईला फेन्स च्या पलिकडे ती लुना तिच्या दादासोबत ३ घरे सोडून पलिकडच्या घराच्या बॅकयार्डात माउईला दिसली ! झाले! याने तिथे नुसती धाव पळ करून फेन्स मधली एक लूज फळी बरोबर शोधली ( किंवा त्याला आधीच माहित असावी!) आणि ती सरकवून निसटला, अन धावला ना लुनाला भेटायला! हे सगळे उद्योग २-३ मिनिटात, मला आत पत्ताच नाही! मी ५ मिनिटाने याला बोलवावे म्हणून बाहेर हाका मारतेय तर याचा पत्ताच नाही! असली घाबरले मी! माउई लहान आहे आकाराने. आमचं घर गल्लीच्या शेवटी, पुढे झाडी आणि वॉकिंग ट्रेल. पलिकडे तळं. ट्रेल च्या आजू बाजूने भरपूर झाडी असल्याने हरणं , सशांबरोबरच कोल्हे, कायोटीही सर्रास असतात. त्यात अंधारही पडायला लागला होता. घाबरून मुलांना हाका मारून त्यांना पिटाळले कुठे गेला शोधायला. तेवढ्यात लुना चा दादा उचलून घेऊन आला माउईला. एकदाचे हुश्श झाले !

बापरे, लैच उद्योग
प्यार दिवाना होता है म्हणजे लैच होता है म्हणायचं

ट्रेल च्या आजू बाजूने भरपूर झाडी असल्याने हरणं , सशांबरोबरच कोल्हे, कायोटीही सर्रास असतात>>> बापरे

>> हे आमचे स्पॉटी व कॉफी बहिणभाऊ. गावठी कुत्रे आहेत.

खूपच छान. आता माझ्याकडे घरी ब्रिडवाले असले तरी खरे सांगायचे तर मला स्वत:ला अजूनही गावठी कुत्रेच मस्त वाटतात. पेडीग्री फूडच हवे, अमुकच हवे, तमुकच हवे, इतक्याच वेळी द्यायचे, एवढेच द्यायचे, झोपायला असेच हवे, पांघरायला तसेच हवे वगैरे वगैरे नाटके नसतात त्यांची. लो मेंटेनन्स मस्त टकाटक असतात.

ओडीन गुंड्या झालाय की एकदम. लहान मुलांसारखंच हे हट्ट करणं.
माऊईचा किस्सा कसला गोड. मैत्रिणीला भेटायला तडक गेला! पण घाबरायला झालं असेलच तो दिसला नाही तेव्हा.
ते वरचे गावठी बहीणभाऊ पण क्युट आहेत.
हा धागा खरंच स्ट्रेसबस्टर आहे.

आता माझ्याकडे घरी ब्रिडवाले असले तरी खरे सांगायचे तर मला स्वत:ला अजूनही गावठी कुत्रेच मस्त वाटतात.>>>>
अगदी अगदी मलाही
आम्ही ओडीन घ्यायच्या आधी मी गावठी घेण्यासाठीच प्रयत्नशील होतो
एकदम मस्त गार्ड डॉग, तिखट, खायचे प्यायचे चोचले नाहीत
पण घरचे ऐकेचना म्हणून मग हे फर बेबी आणलं
त्याचे उन्हाळयात हाल होताना बघून वाईट वाटत की आपल्या हौसेपायी त्यांच्यावर अन्याय करतोय म्हणून
तरी आता लॅब बरेच रुळलेत आपल्या हवामानाला

सगळ्यांचे किस्से मस्त आहेत एकदम. ओडीनला भेटावं वाटतय अगदी.
आमच भूभू बाळ पण घरी शेजारी पाजारी एकदम लाडोबा आहे. हल्ली लोक आमच्या आधी त्याचीच आधी विचापुस करातात. Happy

Pages